महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीची नवोदयसाठी निवड

परळी / प्रतिनिधी

        परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.तेजस्विनी नीलकंठ सलगरे हिची नवोदय विद्यालयाकरिता निवड झाली आहे. 


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. शाळेतील इयत्ता 9 वि वर्गात शिक्षण घेत असलेली कु.तेजस्विनी नीलकंठ सलगरे हिची नवोदय विद्यालयकरिता निवड झालेली असून तेजस्विनी सलगरे ही इयत्ता 5 वि आणि 8 वि वर्गाची स्कालरशिप परीक्षा, 8 वि वर्गाची एनएमएमएस या सर्व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. या शैक्षणिक वर्षात शाळेतील दोन विद्यार्थिनी नवोदय विद्यालय प्रवेशकरिता पात्र झाल्या असून स्कालरशिप, एमटीएस, एनएमएमएस यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेत शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश  संपादन केले आहे. कु.तेजस्विनी सलगरे हिच्या या यशाबद्दल तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, सर्व संचालक मंडळ, शाळेचे प्राचार्य मुरलीधर बोराडे, शालेय प्रशासन, स्पर्धा परीक्षा विभागाचे सर्व सदस्य यांनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !