परळीत गळफास लावून एका युवकाची आत्महत्या

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     आनंदनगर, पद्मावतीगल्ली भागात संत नरहरी महाराज मंदिर परिसरातील रहिवासी एका युवकाने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा.घडली आहे.याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

     पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा. सुमारास मयत युवकाने घरातीलच लोखंडी हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.मनोज मारोती काळे वय ४१ वर्षे असे मयताचे नाव आहे.दारुच्या नशेत त्याने ही आत्महत्या केली असल्याचे कारण पोलिसात दिलेल्या प्रथम खबरीत देण्यात आलेले आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सफौ सौंदनकर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !