MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

 परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी

दुचाकी व एसटी बसमडध्ये  धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...

       परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज  झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी  एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.


 धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


    दरम्यान, पुढील उपचार करण्यासाठी जखमीला अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार