ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दिपक रणनवरे यांचे जालना येथे आमरण उपोषण

 ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दिपक रणनवरे यांचे जालना येथे आमरण उपोषण


................

नांदेड दिनांक 21 नोव्हेंबर प्रतिनिधी

समस्त ब्राह्मण समाज समिती यांच्यावतीने ब्राह्मण समाजाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दिपक रणनवरे हे जालना येथील गांधी चमनबाग मध्ये आमरण उपोषण दिनांक 28 नोव्हेंबर मंगळवार पासून सकाळी 11 पासून आमरण उपोषणास बसणार आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या ब्राह्मण समाजाला शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे ही ब्राह्मण समाजाची मुख्य मागणी आहे.

 स्वातंत्र्य पूर्व काळात ब्राह्मण समाजाचे शिक्षणाचे प्रमाण हे इतर समाजाच्या तुलनेत व्यापक होते

त्यामुळे ब्रिटीश सरकार मध्ये किंबा इतर तत्सम संस्थानात नौकरीचे प्रमाण अधिक होते. ही सत्यता

असून नाकारता येत नाही. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षाचा आढावा घेतला असता असे दिसून येते की,      शैक्षणिक क्षेत्रात देशातील सर्व समाज जवळपास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे.

शैक्षणिक उन्नतीच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या सर्व स्तरातील सामाजिक घटकांना शासकीय

सेवेतील संधी उपलब्ध झालेल्या आहेत. संधी उपलब्ध होण्यामागे दबलेल्या समाजवर्गातील घटकांना शैक्षणिक आरक्षणातून संधी मिळाल्यामुळे ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकले. या

उलट आज ब्राह्मण समाजातील सामाजिक स्तराचे विश्लेषण पाहता ब्राह्मण समाजातील दुर्बल

घटक दबलेला आहे. त्याला शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणे गरजेचे असून त्या

माध्यमातून त्याच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटू शकेल अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. कारण एका बाजूला उच्च शिक्षित, उच्च पदस्थ वर्ग तर दुसऱ्या बाजूला एक मोठा दबलेला वर्ग अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे.या परिस्थितीतून दबलेल्या वर्गाला सामाजिक न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हिताच्या

दृष्टीकोनातून शैक्षणिक आरक्षणाच्या माध्यमातून तसेच, त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची

निर्मिती होणे गरजेचे आहे. ज्यामुळे या दबलेल्या सामाजिक घटकाला शैक्षणिक आरक्षणाच्या संधी

सोबत जर स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तेव्हा त्याला या महामंडळाच्या अर्थसहाय्याने

स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभा करता येऊ शकेल व समाजातील बेरोजगारीसारखा प्रश्‍न

सोडवण्यास मदत होईल. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग वाढण्यास मदत होईल. म्हणून

या वर्गासाठी आर्थिक विकास महामंडळ असणे आवश्यक आहे. तसेच जातीवरून हिणवले जाऊन

विषमतेच्या त्यांची हेळसांड सामाजिक विषमतेच्या दृष्टीकोनातून त्याचा हेळसाड करण्याचा प्रयत्न भारतीय समाजातील इतर घटक करत असतात. ही वास्तविकता नाकारता येत नाही. म्हणून ब्राह्मण समाजाचे जातीय विडंबन

थांबणे व त्यांच्यात सामाजिक सुरक्षितता निर्माण होणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा नवीन

सामाजिक विषमतेला आपण जन्म घालत आहोत असे दिसून येत आहे. वर्ण व्यवस्थेचा अग्र भाग

जरी ब्राह्मण समाज असला तरी भारतीय लोकशाहीने व राज्य घटनेने धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्थेची

आदर्श संरचना स्विकारली आहे. पण असे असतानाही ब्राह्मण समाजाला जातीय दृष्टीकोनातून इतर समाज पहात असल्याचे चित्र ब वास्तविकता निदर्शनास येते. या सर्व बाबींचा परिणाम हा

समाजाच्या असुरक्षित मानसिकतेत झालेला आहे. समाजाला निर्भयपणे जगता येण्यासाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत समाजघटक म्हणून विशेष सोयी सवलती मिळाव्यात.इ.स.१९४७ च्या नंतर ब्राह्मण समाजात सामाजिक बदल होत गेला. ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज विस्थापित होत गेला. धर्म व्यवस्थेच्या आधारावर भिक्षुकी किंवा धर्मातील पूजा पाठकर्मकांड या बाबीसाठी पुरोहित म्हणून ग्रामीण भागातील ब्राह्मण समाज सामाजिक दृष्ट्या स्थिर

होता. कालांतराने समाजातील धर्म रुढी परंपरा काल बाह्य होत गेल्या व ब्राह्मण समाजाचे ग्रामीण

भागातील असलेले स्थान नाहीसे होत गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाची पुरोहित

म्हणून असलेली व्यवसायाची नाळ तुटल्या गेली ब जीवन जगण्याचे साधन असुरक्षित झाल्यामुळे

त्याला ग्रामीण भागातून विस्थापित व्हावे लागले आहे.

शहरीकरणातून त्याला उपजीविकेच्या शोधार्थ शहराकडे यावे लागले व कारकुनी कामापेक्षा

इतर कुठलेही काम उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे समाजात आज रोजी दोन विभिन्न वर्ग अशी

वर्गवारी समाजात दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून कि काय मोठ्या महानगरात किंवा औद्योगिक

शहरामध्ये केवळ उपजीविका भागवण्यासाठी का होईना एखादी कारकुनी पद्धतीची नौकरी मिळते

काय ? याच्या शोधार्थ समाज विस्थापित झालेला आहे. उच्चशिक्षित व उच्चपदस्थ असलेल्या

घटकांची संख्या अल्प आहे. उर्वरित समाजातील बहुसंख्य घटक हा जगण्याच्या संघर्षासाठी

विस्थापित होत असलेला दिसत आहे. शासनाचा दृष्टिकोन हा सामाजिक आशय डोळ्यासमोर ठेवून

काम करण्याचा असल्याकारणाने सामाजिक पातळीवर ब्राह्मण समाजाच्या परिस्थितीचे दोन वर्गात

कसे ध्रुवीकरण होत चाललेले आहे. 

     राज्यघटनेनुसार मिळालेल्या सर्व स्वातंत्र्याचा उपभोग / उपयोग निर्भयपणे मिळण्यासाठी किंवा

करून घेण्यासाठी त्याला सामाजिक स्तरावर समाजाला सुरक्षितता मिळून देणे ही शासनाची

जबाबदारी आहे. या जबाबदारीचा भाग म्हणूनच महिलांना, अपंगांना समाजातील असुरक्षित

घटकांना विशेष कायदे करून जसे संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे ब्राह्मण समाजास त्याच्यावर होणाऱ्या सामाजिक विडंबनासाठी, त्याना सुरक्षितता देणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कायदा करून संरक्षण देणे आज गरजेचे आहे.वरील सर्व बाबींचा विचार करता समाजाच्या सर्वागीण विकासासाठी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी खालील प्रमाणे मागण्या मान्य होणे गरजेचे आहे.

ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील तरुणांना व्यावसायीक मदतीसाठी

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.  ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह उभारावे / स्थापन करण्यात यावे.

ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५०००/- रु. मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्‍ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.

ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग - 2 मधुन  वर्ग - 1 मध्ये बदल

करण्यात याव्यात. त्यांचा मालकी हक्‍क कायम करण्यात यावा.ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्तता करण्यात यावी.परंपरागत राज्यातील मंदीरे ज्या त्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात यावी जेणेकरुन मंदिराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थितीत अबाधित राहील.

ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची / आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी हे उपोषण 28 नोव्हेंबर पासून जालना येथे ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने वतीने करण्यात येत आहे. या उपोषणाला ब्राह्मण समाज बांधव,युवक, महिला व पुरोहित,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा द्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक धनंजय कुलकर्णी,सौ विजया कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ॲड राजेंद्र पोद्दार, व्यंकटेश जोशी, योगेश जानतीकर, मकरंद कुलकर्णी, विश्वजित देशपांडे ,ॲड भानुदास सौचे ,अशोक वाघ, अनिल डोईफोडे, महेश आकोलकर, संजय देशपांडे ,मंदार कुलकर्णी, मकरंद सोनेसांवगीकर, काकासाहेब कुलकर्णी , विठ्ठलराव   वझुरकर, प्रकाश केदारे, ईश्वर दिक्षित, सुजित शर्मा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !