पोलिसांचे आवाहन!!!!!

कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्यास पोलिसांच्या वतीने बक्षीस जाहीर केज :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या आणि मकोका असे गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी टोल नाक्यावरून अपहरण करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्या गुन्ह्यातील सबंधित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मात्र या गुन्ह्यातील कृष्णा शामराव आंधळे, वय (३० वर्ष), व्यवसाय-शेती व मुकादम, रा. मैदवाडी, ता.धारुर यांच्या विरुद्ध केज जि. बीड पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६३८/२०२५ भा. न्या. सं. १०३(२), १४०(१), १२६, ११८(१), ३४(४), ३२४(४)(५), १८९(२), १९० गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी निष्पन्न असून तो खुना सारखा गंभीर गुन्हा केल्या पासुन फरार आहेत. त्यास पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालु आहेत. पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, फोटो मधील आरोपीचे ठाव ठिकाण्याची कोणास माहिती कि...