उपोषणावर उद्या मार्ग काढणार.....!

ना. पंकजा मुंडेंनी जालन्यात उपोषण कर्ते दीपक बोऱ्हाडे यांची घेतली भेट धनगर समाजाच्या आरक्षणावर आमच्या मनात संवेदना ; समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका जालना ।दिनांक २७। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आमच्या मनात संवेदना आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देऊन उपोषण सोडण्याची विनवणी केली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मागच्या ११ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरु आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी इथे आलेले आहे. त्यांनी केलेल्या मागण्या मागच्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात ...