पोस्ट्स

सप्टेंबर १४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
ना.पंकजा मुंडे यांची ममदापूरला भेट ; नदीत वाहून गेलेल्या शिवराज कदम यांच्या कुटुंबाचे केले सांत्वन परळी वैजनाथ।दिनांक २०। तालुक्यातील ममदापूरचे रहिवासी शिवराज माणिकराव कदम हे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी ममदापुर येथे जाऊन कदम कुटुंबाची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.         मौजे कौडगाव हुडा येथील लिगी नदीत वाहून गेलेल्या शिवराज माणिकराव कदम (वय ३८) यांचा मृतदेह अखेर अथक शोधमोहीमीनंतर आढळून आला. त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. शिवराज कदम हे नदीपात्र ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक व गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. अखेर त्यांचा मृतदेह सापडल्याने शोधकार्य संपुष्टात आले.या दुःखद प्रसंगी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. या दु:खद घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी आम्ही त्...

दत्तकथा.....

इमेज
अखिल विश्वाचे विश्वगुरु भगवान दत्तात्रेय‌ - ह.भ.प. दत्तात्रय महाराज आंधळे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी )परळी शिवाजी नगर माजी सभापती भास्करराव चाटे मामा यांच्या निवासस्थानी त्रिदिवशीय दत्तात्रेय भगवान यांचे कथा चरित्र प्रसंग व्यक्त करतांना दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या मधुर आवाजात प्रसंग व्यक्त करतांना दत्तात्रय महाराज बोलतांना म्हणाले  दत्तात्रेय भगवान हे स्मृतगामी आहेत.संपूर्ण विश्वाचे विश्वगुरु केवळ भगवान दत्तात्रेय हेच आहेत असे निक्षून प्रतिपादन ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.       पितृपक्षात निमित्ताने श्री भास्करमामा चाटे यांनी त्रिदिवशीय  "श्रीदत्तकथा"आयोजित केली असून आज दत्त जन्म कथन केले. यावेळीआज कथेत रेणुका माता जमदाग्नी तसेच सहस्त्र अर्जुन व परशुराम हे आख्यान आज सांगुन दत्त जन्म करण्यात आला. दत्त जन्माचा पाळणा म्हणण्यात आला. या कथेला उपस्थित ह भ प भरत महाराज जोगी, डॉक्टर अरुण गुटेसाहेब, ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे,थोंटे अप्पा, शिवरत्न मुंडे, पाटलोबा मुंडे, दत्तात्रय ढवळे, श्री प्रल्हाद शेळके,बीडगर साहेब,फड, दत्त कथेला साथसंगत ह.भ.प.अम...

नवरात्र महोत्सव निमित्त २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर

इमेज
  श्रीक्षेत्र रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थान येथे नवरात्र महोत्सव निमित्त २२  सप्टेंबर ते ७  ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )      प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी व मूळ जोगाई देवस्थान येथे नवरात्र महोत्सव निमित्त 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री रेणुका देवी व मूळजोगाई देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय आंबेकर व उत्सवाचे चालक-मालक नानाश्री यादव यांनी दिली आहे.      देवस्थानचे मुख्य पुजारी कै. शिवाजीराव आंबेकर त्यांचे सहकारी कै. मुकुंद अप्पा यादव, कै. श्यामलाल मोदी, कै. बी एन सातपुते, कै. ताराचंद परदेशी यांच्या प्रेरणेने व वै. माधव बुवा शास्त्री व ह भ प किसन महाराज पवार यांच्या आशीर्वादाने होत असलेल्या या वार्षिक महोत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता योगेश परदेशी यांच्या हस्ते घटस्थापना व विष्णू शेठ बजाज यांच्या हस्ते गाथा पूजनाने होणार असून या सोहळ्याची सांगता 7 ऑ...

रामराव ढोक महाराजांची राम कथा...

इमेज
घटस्थापनेने होणार श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रामराव ढोक महाराजांची राम कथा अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवास सोमवारी (दि.२२) घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. याची जय्यत तयारी योगेश्वरीच्या मंदिरात सुरू आहे. या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .          योगेश्वरी देवीचा हा नवरात्र उत्सव दसरा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात देवीच्या प्रत्येक माळेला विधिवत पूजन व आरती होते. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, वादन शारदोत्सव असे विविध कार्यक्रम होतात.            सोमवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने या दसरा महोत्सवाला प्रारंभ होतील. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात देवीची शासकीय पूजा होईल. मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात दररोज दुपारी १२ ते सायंकाळी सहा यावेळेत विविध महिला भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम होतील. सायंकाळी सहाच्या नंतर गायन व कीर्तनाच...

पंकजा मुंडेंच्या विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी ...

इमेज
वसंत चव्हाण धडाडीचे कार्यकर्ते होते, त्याच्या जाण्याने वेदना झाल्या - ना. पंकजा मुंडे जळगव्हाण तांडा येथे जाऊन परिवाराला दिला धीर; परळीत फड, बिडगर, मराठे, हरंगुळे  परिवाराचे केले सांत्वन परळी वैजनाथ ।दिनांक २०।  परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा येथील भाजपचे ज्येष्ठ  कार्यकर्ते आणि माजी सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांच्या नातीचे एका दुर्दैवी अपघातात निधन झाले, त्यांच्या निधनाने मी धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दांत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जळगव्हाण तांडा येथे चव्हाण कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.        त्याचबरोबर परळी शहरातील नामवंत व प्रतिष्ठित व्यापारी कै. निवृत्ती फड यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पंकजाताई मुंडे यांनी फड कुटुंबीयांचे सांत्वन केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे परळी शहराध्यक्ष सुशील हरंगुळे यांच्या पुतणीचे नुकतेच दुःखद निधन झाले, त्यांच्या निवासस्थानी जाऊन हरंगुळे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. परळीतील जेष्ठ विधिज्ञ ॲड.प्रकाश मराठे यांचे जेष्ठ बंधू ...

अकाली निधन : भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

इमेज
निरंजन नागेश रामदासी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-परळी येथील निरंजन नागेश रामदासी यांचे अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षी ह्रदय बंद पडून आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर  2025 रोजी सायंकाळी 7 वाजता निधन झाले.        निरंजन रामदासी हे परळी शहरातील सुप्रसिद्ध  वैद्यराज रामदासीदादा यांचे नातू व परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर  रामदासी यांचे पुतणे होते. निरंजन रामदासी यांच्या पश्चात आई, बहीण, आजोबा, आजी,चुलते ,चुलत्या असा मोठा परिवार आहे. अत्यंत वेदनादायक गावभागात सर्वस्तरातून शोकसंवेदना        दरम्यान निरंजन रामदासी हे जुन्या गावभागात सर्व परिचित युवक होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणे, अतिशय नम्र, संयमी व सुस्वभावी युवक म्हणून त्यांचे गणेशपार भागात ओळख होती. त्यांच्या अशा अकाली निधनाने अत्यंत वेदनादायक अशा प्रकारची ही घटना असल्याची शोक संवेदना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. उद्या अंत्यसंस्कार  उद्या रविवार दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता येथील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्क...

जिल्हयातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा घेणार आढावा

इमेज
ना.पंकजा मुंडे उद्या घेणार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक जिल्हयातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा घेणार आढावा बीड।दिनांक २०। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या रविवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असून या बैठकीत जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.    ना. पंकजाताई मुंडे उद्या बीड शहरात येत आहेत. सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन व सर्व संबधित अधिकाऱ्यांसमवेत त्या बैठक घेणार आहेत. आष्टी, शिरूर, पाटोदा, गेवराई, माजलगांव तसेच अन्य तालुक्यात नुकतीच जोरदार अतिवृष्टी झाली, यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तसेच जिवीत व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, अनेकांचे संसार उघडय़ावर आले, यात सर्व नुकसानीचा आढावा ना. पंकजाताई उद्याच्या बैठकीत प्रशासनाकडून घेणार आहेत.  ••••

पोक्सोचा गुन्हा दाखल...

इमेज
शैक्षणिक क्षेत्राला काळिमा:  शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण   केज :- केज येथे एका अल्पवयीन मुलीचे चक्क एका शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा प्रकाराच्या चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.       केज तालुक्यात शिक्षण विभागात एका अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्या असल्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे. शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकारी हा त्याच्या खाजगी गाडीतून एक महिला व त्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात होते. त्या मुलीशी तो अधिकारी तिच्याशी गैरवर्तन करीत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. म्हणून तिने मदतीसाठी संपर्क साधला. त्या नंतर काही युवकांनी त्या मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पाठलाग करून त्यांना अडविले. त्या नंतर सदर नराधम हा त्याचा मोबाईल आणि गाडी सोडून पळून गेला. त्या नंतर ती महिला व ती अल्पवयीन मुलगी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तिच्यावर झालेली आपबिती पोलिस अधिकाऱ्या समोर कथन केली. अखेर त्या गटशिक्षाधिकाऱ्या विरोध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात ...
इमेज
  दोन हजार रु. ची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला ! केज :- घरकुलाचे दुसऱ्या हप्त्यासाठी बेबाकी प्रमाणपत्रासाठी दोन हजाराची लाच घेताना केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात ताब्यात घेतले. केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्याकडून त्याला दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाके प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती परंतु तक्रारदाराला ते द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार  प्रतिबंध विभागाने सापळा रचून आज दिनांक १९ सप्टेंबर, शुक्रवार रोजी दुपारी ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे याला केज पंचायत समितीच्या आवारात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलेला ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुर्दैवी घटना....

इमेज
मूकबधिर शाळेच्या शिक्षकाची आत्महत्या  केज :- केज तालुक्यातील सारणी (सां.) येथे एका मूकबधिर विद्यालयातील शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ घटना घडली आहे. सारणी (सां.) ता. केज येथील अशोक नारायण भंडारे (वय ४६) हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयावर शिक्षक होते. ते केज शहरात वास्तव्यास होते. दि. १९ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या सारणी (सां.) गावी जाऊन स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार उमेश आघाव, सिद्दीक शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. त्यांनी आत्महत्या का केली ? याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

डॉ.किरण पारगावकर यांच्यावतीने सत्कार

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा हृदय सत्कार   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा डॉ. किरण पारगावकर यांच्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला.  डॉ. किरण पारगावकर यांच्या निवासस्थानी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेचे चेअरमन विनोद सामत यांच्यासह सर्व संचालकांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून यथोचित सत्कार  करण्यात आला. यावेळी डॉ. किरण पारगावकर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक  मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  महिला महाविद्यालयात हिंदी दिवस समारोह उत्साहात साजरा अंबाजोगाई-वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित, कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे दि. 18-9-2025  रोजी हिंदी दिवस समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मंचक मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजकुमार कांबळे उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार कांबळे यांनी हिंदी भाषा ही राष्ट्राला जोडणारी व सांस्कृतिक एकतेची प्रतीक आहे असे उद्गार केले. याप्रसंगी डॉ. कांबळे यांनी आपल्या मधुर वाणीतून गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. मंचक मोरे यांनी हिंदी भाषा देशाची राष्ट्रभाषा असून ती सर्वांनी आत्मसात केली पाहिजे असे म्हटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत जाधव यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एल.आर.मुंडे यांनी केले. तर आभार प्रा. सुनिल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्...

डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुरस्कार प्रदान होणार.

इमेज
  भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०२५ डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते तर राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख  उपस्थितीत डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुरस्कार प्रदान होणार अंबाजोगाई – (वसुदेव शिंदे) - यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्याचे अभ्यासक डॉ. वासुदेव मुलाटे यांना महाराष्ट्रातील थोर विचारवंत व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे  अध्यक्ष  डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व बीडचे माजी.आमदार राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव  दगडू लोमटे  यांनी दिली आहे.  शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५  सायंकाळी ५ वाजता  आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. सुसंकृत राजकारणी, साहित्य, क्रीडा, संगीत, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रातील एका मान्यवरास हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी  डॉ. वासदेव मुलाटे यांना हा पुरस्कार...

भावपूर्ण श्रद्धांजली....!

इमेज
  सौ. शोभाबाई विजयकुमार मराठे यांचे निधन परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील विधीतज्ज्ञ ॲड. प्रकाश मराठे यांचे मोठे बंधू विजयकुमार मराठे यांच्या पत्नी व सचिन मराठे यांच्या मातोश्री सौ. शोभाबाई विजयकुमार मराठे (वय ८०) यांचे बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कै. शोभाबाई या अत्यंत मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीच्या आणि सर्वांना आपलेपणाने जपणाऱ्या महिला होत्या. आयुष्यभर कुटुंबातील सर्व सदस्यांना आधार देत त्यांनी आपल्या सुस्वभावी वर्तणुकीने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर तसेच नातेवाईक, परिचित व समाजमंडळींवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर परळी येथील स्मशानभूमीत आज गुरुवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी, समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली.कै. शोभाबाई यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, दीर, पुत...

संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी हरवले !

इमेज
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन – पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला शोक संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी  हरवले ! परळीवैजनाथ, प्रतिनिधी–         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी कार्यकर्ते मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संघपरिवारासह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मधुभाई कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे तपस्वी  हरवले असल्याची शोकभावना त्यांनी व्यक्त केली.          आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेला अर्पण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एका तपस्वी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या त्याग, समर्पण आणि सेवा कार्याला विनम्र अभिवादन.  मधुभाई कुलकर्णी यांनी अनेक दशकं संघाच्या प्रचार आणि विस्तार कार्यात आपले योगदान दि...

Pankaja Munde:आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नका

इमेज
  ना.पंकजा मुंडे यांनी वांगदरीत जाऊन केले भरत कराड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नका लातूर ।दिनांक १८।     राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या निराशेपोटी आत्महत्या केलेल्या भरत महादेव कराड यांच्या कुटुंबाची आज वांगदरी येथे जाऊन भेट घेतली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कराड कुटुंबीयांच सांत्वन करत पंकजा मुंडे यांनी त्यांना धीर दिला. ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच्या निराशेपोटी भरत महादेव कराड यांनी काही दिवसापूर्वी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान भरत यांच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेले उपोषण पंकजाताईंच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले. कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार ------ यावेळी माध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या लेकरांचं ओबीसी आरक्षण जाणार या नैराश्यातून भरतने आत्महत्या केली, ही खूप वाईट घटना आहे. आज मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्याच्या मुलाना कुरवाळलं, त्याच्या पत्नीला धीर दिला. लोकनेते मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मदत करताना या...

जनतेसाठी शिस्तबद्ध नियोजन

इमेज
  ना. पंकजा मुंडेंचा परळी, अंबाजोगाईत हाऊसफुल्ल जनता दरबार ; शिस्तबद्ध नियोजनाने जनतेच्या समस्यांचा जागेवर निपटारा परळी वैजनाथ।दिनांक १८। राज्याच्या पर्यावरण, वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांचा आज परळी व अंबाजोगाई येथे हाऊसफुल्ल जनता दरबार झाला. त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ना. पंकजाताईंनी प्रत्येकाला वैयक्तिक भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकली व त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.     ना. पंकजा मुंडे रात्री बीड येथील कार्यक्रम आटोपून उशीरा शहरात आगमन झाले.  शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी त्यांनी जनता दरबार घेतला. तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी कांबळे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.  आजचा दिवस परळी मतदारसंघातील अभ्यागतांसाठी राखीव ठेवण्यात आल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्या कामाचे पत्र असतील, फोन असतील किंवा वैयक्तिक काम असेल ते त्यांनी जागेवरच सोडविले...

दुर्दैवी घटना....

इमेज
मस्साजोग येथे विजेचा शॉक लागून कंत्राटी ऑपरेटरचा मृत्यू केज :- केज तालुक्यातही मस्साजोग येथे एका कंत्राटी वीज ऑपरेटरचा शेतातील डीपीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथील अमोल तुळशीराम लव्हारे वय (२८ वर्ष) हे मस्साजोग येथील ११ के.व्ही. वीज उपकेंद्रात कंत्राटी तत्वावर ऑपरेटर म्हणून काम करीत होते. दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८:०० वा. च्या सुमारास अमोल लव्हारे यास शेतातील डीपीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती गावात मिळाली. त्या नंतर गावकऱ्यांनी वीज वितरणाचे अधिकारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. अमोल लव्हारे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दुःखद वार्ता....

इमेज
  परळी शहर पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी श्रीकांत राठोड यांचे निधन परळी वैद्यनाथ परळी शहर पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्रीकांत छोटूराम राठोड यांचे रक्ताच्या कर्करोगाने  दुःखद निधन झाले. दि. १७ सप्टेंबर २०२५  रोजी सकाळी ८ वा. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत  मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ३८ वर्षे होते. अतिशय तरुण वयात राठोड यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले श्रीकांत राठोड यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.       श्रीकांत छोटूराम राठोड हे बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरीतांडा येथील रहिवासी होते. गेल्या दोन वर्षापासून परळी शहर पोलीस वाहतूक शाखेत ते कार्यरत होते. गेल्या काही महिन्यापासून रक्ताच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले. श्रीकांत राठोड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. श्रीकांत राठोड यांच्या पार्थिव देहावर बीड तालुक्यातील...

स्मरण: मराठवाडा मुक्तीदिन विशेष लेख...

इमेज
  हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक स्वातंत्र्य सैनिक: चित्रकलेच्या माध्यमातुन राष्ट्रभक्तीची शिकवण देणारे दहिवाळ गुरुजी  मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे दिनांक 12 डिसेंबर 1925 रोजी श्री.कै. दत्तात्रय नारायण दहिवाळ यांचा जन्म झाला. श्री दत्तात्रय नारायण दहिवाळ हे एक प्रसिद्ध चित्रकार असून हैदराबाद मुक्ती संग्रामातील एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सर्वांना सुपरीचीत आहेत. स्वातंत्र्यासाठी चित्रकला आणि चित्रकलेसाठी स्वातंत्र्य हे त्यांचे सुरुवातीपासूनचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी ठरतील. चित्रकलेची सेवा करण्यासाठी पहिली संधी त्यांना त्यांचे गुरु परमपूज्य श्री माधव आश्रम स्वामी महाराज दत्तवाडी नैकोटा यांनी 1936 साली मोहोला येथे दिली. त्यांनी परमपूज्य महाराजांचे चित्र अवघ्या पंधरा मिनिटातच पूर्ण करून त्यांचा आशीर्वाद मिळविला. चित्रकलेसाठीच तुझा जन्म आहे,हे महाराजांचे आशीर्वादपर शब्द प्रत्येक क्षणी स्फूर्तीदायी ठरल्याचा प्रत्यय येत गेला आहे व आजही येत आहे. बालपणापासून चित्रकलेचा छंद पहिली गुरु आपली आईच (जी की मुकी व बहिरी होती) व नाटकातून काम करण्याची आवड यातून समाज जागृती...
इमेज
  खोलेश्वर शिक्षक सहकारी पतपेढी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न अंबाजोगाई :-  येथील खोलेश्वर शिक्षक सहकारी पतपेढी ची ५१ वी सर्वसाधारण सभा जिल्हा कार्यवाह मार्गदर्शक बिपीन दादा क्षीरसागर, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल दादा देशपांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, पतपेढी चे सचिव सतीश वांगे,तर सभेचे अध्यक्ष धनंजय जब्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे पतपेढी सभासदांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.या सभेत माजी सदस्य जयेंद्र कुलकर्णी, सुदीप श्रोत्रे, राम काटे (सेवानिवृत्त शिक्षक ) उपस्थित होते त्यांचेही विशेष स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे पतपेढी सभासद तथा लोकमान्य टिळक विद्यालय पोखरी मुख्याध्यापक अरूण पत्की सर,व लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर सर यांचेही विशेष स्वागत करण्यात आले. सभेमध्ये अहवाल वाचन सचिव सतीश वांगे यांनी केले.यावेळी सभासदांच्या सहकार्यामुळे आपल्या पतपेढीला "अ" दर्जा प्राप्त झाला असून या पुढील काळात असेच आपण सर्वांनी सहकार्य,सूचना, अभिप्...

महत्त्वाची बातमी.....

इमेज
  राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर नवी दिल्ली, 16 : राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ( National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMSS ) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर 2 जून 2025 पासून सुरू आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना प्रथम एक-वेळ नोंदणी (One-Time Registration) करणे आवश्यक असून त्यानंतर निवडलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. नोंदणीसंदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)  https://scholarships.gov.in/studentFAQs  येथे उपलब्ध आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन आठवी नंतर शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करणे आणि त्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. प्रत्येक वर...

परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी

इमेज
  परळी मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार - धनंजय मुंडे परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात, नदीतील दगड गोट्यांचे पंचनामे कसे करणार? स्थानिक आपत्ती मदत, सुरळीत वीज पुरवठा यांसह विविध कामे प्राधान्याने करण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना परळी वैद्यनाथ तालुक्यातील अतिवृष्टी व पुराने झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी केली पाहणी परळी वैद्यनाथ (दि. १६) - परळी वैद्यनाथ मतदारसंघासह बीड जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी व पावसाने मोठे नुकसान केले आहे. ५०% पेक्षा अधिक खरीप पिके पाण्याने नासून गेली आहेत. बहुतांश भागात शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे, तर अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतात दगड गोट्यांचे खच साचले आहेत, अनेक गावांमध्येही पुराचे पाणी शिरून नुकसान झाले असून, घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, धान्याचे नुकसान, पशू धनाची हानी, ग्रामीण भागातील रस्ते - पुल तुटणे किंवा वाहून जाणे, संरक्षक भिंती खचने असे अनेक...

Parli Vaijnath-Beed- Ahilyanagar Railway......

इमेज
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत बीड (Beed) जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग (Railway) प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात आज नव्याने 150 कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग 50 टक्के असून, आजवर शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने...

तयारी नवरात्रोत्सवाची.....

इमेज
  श्री.वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी अक्षय शिंदे, सचिवपदी दीपक नागेश्वर  परळी वैजनाथ....    शहरातील नेहरू चौक तळ भागातील श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष अक्षय शिंदे, सचिव दीपक नागेश्वर, उपाध्यक्ष करण ठाकूर, शिवकुमार राजनाळे, अभिजित कदम यांची निवड करण्यात आली आहे.            शहरातील नेहरू चौक तळ भागात श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाच्या वतीने गेल्या ४७ वर्षांपासून देवीची स्थापना करण्यात येते. यंदाही नवरोत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.श्री. वैद्यनाथ दुर्गोत्सव तरुण मंडळाची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत यंदाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष अक्षय शिंदे, सचिव दीपक नागेश्वर, उपाध्यक्ष करण ठाकूर, शिवकुमार राजनाळे, अभिजित कदम, सहसचिव शिवराज कच्छवा, वैजनाथ कुलथे, कोषाध्यक्ष महादेव तिडके  सह कोषाध्यक्ष अजय ठाकूर, संघटक ...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश!

इमेज
बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी   बीड – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प वसंतून वाहत असल्यामुळे शिरूर पाटोदा आष्टी बीड वडवणी गेवराई अंबाजोगाई परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख दिवसात पेक्षा अधिकच पाणी विसर्ग करण्यात येत आहे तसेच वडवणीच्या उर्दू कुंडलिका माजलगाव मांजरा या धरणातून देखील गेटमधून हजारो की सेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड सह महाराष्...