इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

रा.से.यो. शिबीर!!!

 युवकांनो  , आजच्या वर्तमानातील वर्तन हेच आपले भविष्य असते- प्रा. डॉ. माधव रोडे


परळी : - दिं . २२ जानेवारी २०२५  तालूक्यातील  सिरसाळ येथील श्री . पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करेवाडी आयोजित विशेष युवक - युवती शिबीराचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे  प्रा. डॉ.  माधव रोडे हे म्हणाले युवकांनो  संपर्क नाही अन् त्यामुळे संवाद नाही भावना नाहीत त्यामुळे नाती नाहीत, नात्यामध्ये संवाद घडतो तेव्हा एकोप्याने निर्णय घेतले जातात . संवाद ही मनाची मुलभुत गरज आहे. युवकांनो  हे लक्षात ठेवा सौंदर्य कपडयात नाही कामात आहे , नटण्यात नाही विचारांमध्ये आहे , भपक्यात नाही साधेपणात आहे , बाहेर कशात नाही , तर आता मनात आहे. आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्यची निर्मिती करता आली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे मौनातून अभिव्यक्तीच्या दिशेने प्रवास   प्रगती करणे गरजेचे आहे. युवकांनी संवादातून नाती जापावी, थोर संत महात्म्याचे विचार आत्मसाथ करून स्वतःचा शोध द्यावा . आजच्या वर्तमानातील वर्तन हे आपले उद्याचे भविष्य आहे याची लक्षात ठेऊन जगण्यात आणावे असे प्रा. माधव रोडे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  संस्थेचे सचिव योगेश व्यंकटराव कदम तर म्हणुन प्रमुख उपस्थितित  विद्यापीठचे अधिसभा सदस्य  प्रा. डॉ एम. बी. धोंडगे , करेवाडीचे सरपंच कमलबाई कावळे , उपसरपंच श्यामलताई घाटुळ , प्रा. एच. पी. कदम आदि होते.

  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे प्रा दयानंद झिंजुर्डे डॉ वाळके अरुणा यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सोळंके यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!