पोस्ट्स

तीर्थक्षेत्र विकास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आराखडा नियोजन विभागाकडे होणार वर्ग

इमेज
श्री.वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा आता 286 कोटींवरून होणार 351 कोटींचा! आराखडा नियोजन विभागाकडे  होणार वर्ग धनंजय मुंडेंनी मांडली अभ्यासपूर्ण माहिती; दादांचे मानले आभार बीड (दि. ०७) - पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिर व परिसराच्या विकास कामांचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेण्यात आला. यावेळी विकास आराखड्याच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या व नव्याने हाती घेण्यात येणाऱ्या विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.  मंदिर व परिसराचा विकास करताना पौराणिक महत्त्व अबाधित राखून अभूतपूर्व विकास कार्य करण्यात यावे, अशा सूचना अजित दादांनी सर्व संबंधितांना दिल्या.  वाहनतळ, मेरुगिरी पर्वत परिसरातील कामे, दर्शन मंडप, नंदी, शिव प्रतिमा, उद्यान, प्रवेशव्दारे यांसह लागणाऱ्या अधिकच्या जमीन अधिग्रहण करण्याची जबाबदारी यावेळी धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करत आराखडा कामातील बारकावे सर्वांच्या लक्षात आणून दिले. वाढीव जागेसह विविध कामांच्या पूर्ततेसाठी...