मोर्चात परळी तालुक्यातील हजारो बंजारा समाजबांधव होणार सहभागी

बंजारा समाजाला ST प्रवर्गातु आरक्षण मिळावे यासाठी बीडला सोमवारी मोर्चा मोर्चात परळी तालुक्यातील हजारो बंजारा समाजबांधव होणार सहभागी परळी वै. ता.१३ प्रतिनिधी बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातुन आरक्षण मिळावे यासाठी सोमवारी (ता.१५) बीड येथिल जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात परळी तालुक्यातील हजारो समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. परळी येथील जिजामाता उद्यानात शनिवारी (ता १३) सकाळी ११:०० वाजता तालुक्यातील बंजारा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटनुसार अनुसुचित जमाती (st) प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सोमवारी (ता१५) बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चाच्या नियोजनासाठी परळी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा अरुण पवार, बाळासाहेब (पप्पू) चव्हाण,कॉ पांडुरंग...