अभिष्टचिंतन लेख >>>> ✍️राहुल विलासराव ताटे

परळीतील जनप्रिय नेतृत्व: बाजीराव भैय्या धर्माधिकारी जनतेच्या मनातील नेता – माननीय बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष, सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहराध्यक्ष) परळीचे नाव घेतले की अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे पुढे येतात. परंतु त्यामध्ये एक नाव असे आहे जे नेहमीच लोकांच्या मनात घर करून राहिले आहे – माननीय बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी. आपल्या प्रामाणिक, कर्तृत्ववान व लोकाभिमुख कार्यामुळे त्यांनी परळीकरांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केले आहे. “परहितार्थं यदि कर्तव्यमेव, जीवनस्य तदर्थं प्रयत्नः करोमि” (परहितासाठी केलेला प्रयत्न हेच खरे जीवन आहे राजकीय व सामाजिक वारसा त्यांचे आजोबा, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी – परळी शहराचे माजी उपनगराध्यक्ष – हे सामाजिक जाणीव व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. मलिकपुरा, माणिक नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, छत्रपती शिवाजी नगर अशा अनेक वस्त्यांमध्ये विविध जाती-धर्मातील नागरिकांना अत्यल्प दरात जागा उपलब्ध करून देऊन वसाहती उभारल्या. परळी पंचायत समिती, पोलिस कॉलनी, प...