पोस्ट्स

ऑक्टोबर ५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंतर महाविद्यालयीन स्पर्धा...

इमेज
  ज्युडो क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गीत्ते हिस रौप्य पदक  परळी, प्रतिनिधी         डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व जनविकास महाविद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन ज्युडो क्रीडा स्पर्धा दि. १० ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजची विद्यार्थिनी कु.पूनम गोविंद गीत्ते या विद्यार्थिनींने  रौप्य पदक मिळवले.कु.पूनम गीत्ते ही विद्यार्थिनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अग्रेसर असते. या यशाबद्दल जवाहर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या परिषद सदस्य व क्रीडा संचालक डॉ.पी एल कराड उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही गायकवाड, उपप्राचार्य डॉ.डी के आंधळे  उपप्राचार्य हरीश मुंडे, विभाग प्रमुख व्ही व्ही बेंडसुरे, प्रा विजय मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गीत्ते हिचे अभिनंदन केले आहे.
इमेज
गेवराईचे दुय्यम निबंधक संजय गोपवाड निलंबित  गेवराई : उपनोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली असून, या निर्णयामुळे संपूर्ण नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे. नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कातील गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.        मिळालेल्या माह सन २०२० ते २०२१ या कालावधीत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची चौकशी करण्यात आली असता एकूण १४ व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी व अनियमितता आढळून आल्या. या अनियमिततेमुळे शासनाला १ लाख २३ हजार ४०० रुपयांचे महसूल नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.          या प्रकरणामुळे विभागात मोठी चर्चा रंगली असून, नोंदणी विभागातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन महसुलाशी संबंधित व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आता अधिक कडक...

शुल्लक कारणावरून इगो दुखावला, शाळकरी मुलांना बदड, बदड बदडले!!!!!

इमेज
  दोन जणांचा गुरुकुलात धुडगूस:११ विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण तर एका वृद्धाचेही फोडले डोके परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी वैजनाथ शहरातील ४०फुटी रोड सिद्धेश्वर नगर भागात असलेल्या वारकरी शिक्षण संस्था 'नर्मदेश्वर गुरुकुलम्' मध्ये याच भागात राहणाऱ्या दोन इसमांनी धुडगूस घातला. गुरुकुलातील दोन विद्यार्थ्यांना अगोदर रस्त्यात आडवून मारहाण केली,त्यानंतर गुरुकुलात घुसून समोर दिसेल त्याला मारहाण करत सुटले.यात ११ विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली.तसेच संस्थाचालकाचे वयोवृद्ध वडील त्याठिकाणी आले त्यांनाही जबर मारहाण करून जखमी करण्यात आले आहे.या धुडगूस प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       परळी येथील सिद्धेश्वरनगर येथे नर्मदेश्वर गुरूकुलम् नावाची निवासी वारकरी शिक्षण संस्था आहे.या गुरुकुलात ४२ विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेत आहेत. यासोबतच ते शाळेत देखील जातात. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी गुरुकुलातले मुलं शाळेत गेले. या गुरुकुलाचे संचालक ह.भ.प. अर्जुन बालासाहेब शिंदे आहेत. मात्र या घटन...

कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन....

इमेज
मागणी एक,मदत दुसरीच-किसान सभा आक्रमक कर्जमाफीसह इतर मागण्याकरिता किसान सभेचे निदर्शने बीड / प्रतिनिधी....       निसर्गाचा लहरीपणा, सरकारचे शेती विरोधी आयात-निर्यात धोरण आणि शेतमालाला न मिळालेल्या हमीभाव या तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजावर यंदाच्या खरिपात होत्याच नव्हतं करून ठेवलं आहे. नैतिक जवाबदारी असलेल्या सरकारने पोकळ आकड्यांचा खेळ करत मदतीची वलग्ना करत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असून शेतकऱ्यांची मागणी वेगळीच असताना मदत मात्र वेगळी केल्याने शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्याकरिता आज शुक्रवार दि 10 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती बीड किसान सभेने दिली आहे.       यंदाच्या खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले असून निवडणूक पूर्वी सत्तेत येण्यापूर्वी केलेली कर्ज माफीचे आश्वासन पूर्ण करण्याची ही रास्त वेळ असताना सत्ताधारी केवळ आकड्यांचा खेळ करत शेतकऱ्यांच्या हाती भोपळा देण्याचा प्रकार सुरू आहे.पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात यावेळीच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने मदत करण...

मोठ्या संख्येने सहभागी व्हावे...

इमेज
13ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा तालुका सुविधा केंद्रावर मोर्चा - प्रा. बी. जी. खाडे परळी वैजनाथ- प्रतिनिधी....      बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने परळी तालुका सुविधा केंद्रावर बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी१५००० (पंधरा हजार) बोनस द्या या प्रमुख मागणीसाठी 13 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.           गेल्या वर्षी कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रु. बोनस जाहीर करूनही दिला नव्हता. सन 2024-25 वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळावी, लाभांच्या रकमा तात्काळ बांधकाम कामगारांना मिळव्यात, नोटरी स्वयं घोषणापत्राच्या आधारावर बांधकाम कामगारांची नोंदणी करावी, बांधकाम कामगार ज्या ठिकाणी काम करतो तेथील प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणी व्हावी- बांधकाम कामगारांना भांडे सेट ताबडतोब वाटप करावेत , मोबाईल क्रमांक बदल, आधार कार्डात बदल, मुलांच्या नावात बदल इत्यादी सुविधा केंद्रावरच व्हावीत आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केलै आहे. मोर्चा 13 ऑक्टोबर  रोजी दुपारी 12 वाजता बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालया पासून निघून मोंढा...

अभिनंदनीय: कामगार कल्याण मंडळाची स्पर्धा...

इमेज
महिला भजन स्पर्धेत परळीचा संघ प्रथम          कामगार कल्याण मंडळातर्फे भजन स्पर्धा  परळी  (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या  महिला भजन स्पर्धेत परळी येथील  भजनी संघाने  पहिले बक्षीस पटकाविला. निलंगा  द्वितीय तर धाराशिव येथील भजनी संघाने तृतीय बक्षीस मिळविले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. धाराशिव येथील कामगार कल्याण भवनमध्ये मंगळवारी ( दि. ७) या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत लातुर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील ८ भजनी मंडळानी सहभाग घेतला. यामध्ये कामगार कल्याण भवन धाराशिव,  कामगार कल्याण भवन लातुर, कामगार कल्याण केंद्र उदगीर, कामगार कल्याण केंद्र बीड, कामगार कल्याण केंद्र अंबाजोगाई, कामगार कल्याण केंद्र परळी, कामगार कल्याण केंद्र निलंगा, कामगार कल्याण केंद्र कळंब या संघांचा सहभाग होता.स्पर्धेत प्रत्येक मंडळास भजन सादरीकरणासाठी २५ मिनिटांचा वेळ देण्यात आला.  मंगवारी सायंकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...

इमेज
  गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस; 6.75 लाखांचा मुद्देमाल जप्त अंबाजोगाई (प्रतिनिधी) – दिनांक 08 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीच्या आधारे केलेल्या कारवाईत 6.75 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे.           ही कारवाई अंबाजोगाई शहरातील गीता रोड येथे करण्यात आली. एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई करत छापा टाकला. त्या वेळी आरोपीच्या वाहनातून वेगवेगळ्या कंपनींचा गुटखा व पान मसाला असा एकूण ₹6,75,400/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद मधुकर शेप, रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई विरुद्ध गुन्हा क्र. 0496/25 , भादंवि कलम 123, 274, 275, 223 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बीड पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रामचंद्र केकान व पो.कॉ. गोविंद भताने यांनी केली अस...

2 लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा गांजा पकडला....

इमेज
“ऑपरेशन थंडर”अंतर्गत मोठी कारवाई : 12 किलो 186 ग्रॅम गांजा जप्त, एक अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           बीड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मोठी कारवाई करत 12 किलो 186 ग्रॅम गांजा जप्त केला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ₹2,43,720/- इतकी आहे.          घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळील रेल्वे पटरीच्या पुढील भागात 08 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 1:05 वा. ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटनांदूर परिसरात गांजाचा साठा असल्याची खात्री करून पंचासमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 12 किलो 186 ग्रॅम गांजा मिळून आला. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत ₹2,43,720/- इतकी आहे. यासंदर्भात पंचनामा करुन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.: 0334/2025, कलम 8(c), 20(b) NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निहाल रामभाऊ गंगणे, रा. घाटनांदूर, ता. ...

संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे - डाॅ.राजाराम मुंडे

इमेज
परळीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी विजयादशमी पथसंचलन उत्साहात संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे - डाॅ.राजाराम मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी... देशाच्या जडण घडणीत अतिशय महत्त्वाचा वाटा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परळीत   आयोजित शताब्दी विजयादशमी पथसंचलन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पावलांतून पथ संचलनाद्वारे विविध भागांमध्ये राष्ट्रभक्तीची लहर पसरवल्याचे दिसून आले.         चिंतामणी फाउंडेशन स्कूल तोतला मैदान परळी वै. येथून  रविवार 5 ऑक्टोबर दुपारी 4 वा. पथसंचलन प्रारंभ झाले.चिंतामणी फाउंडेशन स्कूल - डॉ हडबे हॉस्पिटल - सोनार लाईन - राणी लक्ष्मीबाई टॉवर -  गणेशपार - नांदूरवेस - सरकारवाडा- आंबेवेस -  तळ नगरेश्वर चौक (आर्य वैश्य ) - चिंतामणी फाउंडेशन स्कूल येथे समारोप झाला.नेहमीप्रमाणेच अतिशय नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पथ संचलन करण्यात आ...

परळीच्या भजनी संघाला दोन बक्षीसे

इमेज
भजन स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र निलंगा प्रथम  परळीच्या भजनी  संघाला दोन बक्षीसे तर बीडच्या संघाला ताल संचलनासाठी तृतीय बक्षीस  परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पुरूष कामगारांसाठी  भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र निलंगाच्या संघाला  प्रथम पारितोषिक मिळाले तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण भवन धाराशिव, तृतीय क्रमांक कामगार कल्याण भवन लातूर या संघांनी पटकाविले. या स्पर्धा कामगार कल्याण भवन धाराशिव येथे सोमवारी संपन्न झाल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरण  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा  दै. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे, आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, गुणवंत कामगार कुलदीप सावंत, कामगार अधिकारी बनेश्वर सरडे, सुरज ऊंदरे आदि मान्यवरांच्या हस्ते झाले. भजन स्पर्धेचा  अंतिम निकाल  उत्कृष्ट वादक: प्रथम क्रमांक  हनुमंत जगदाळे,कळब द्वितीय क्रमांक  उमेश पतंगे उदगीर.  तृतीय क्रमांक स्वप्निल शेटे अंबाजोगाई.  उत्कृष्ट गायक:  ...

अभिवादन सभेत अनेकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना

इमेज
मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी यांना परळीकरांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन  अभिवादन सभेत अनेकांनी व्यक्त केल्या आपल्या भावना  परळी/ प्रतिनिधी-   दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश शेठ बियाणी यांचे दिनांक 12 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात परळीकरांनी श्रद्धांजली अर्पण केली.तसेच  यावेळी उपस्थित मान्यवरासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.     परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्मृतीशेष सतीश शेठ बियाणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाच्या परळी शहराध्यक्ष उमाताई समशेट्टे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते एडवोकेट जीवनराव देशमुख, सुरज बियाणी,सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, दैनिक परळ...

मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश

इमेज
ना. पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून ओंकार ग्रुपची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश मुंबई ।दिनांक ०७।  राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत ओंकार ग्रुपने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्ये माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रूपयांची मदत दिली. ना. पंकजाताई मुंडे व ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला.  आज मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही एक कोटीची मदत सुपूर्द करण्यात आली. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मंत्री दादा भुसे, श्रीमती यामिनी पाटील यांच्यासोबत ओंक...

बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात दिले पत्र

इमेज
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व ना.पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक विदर्भातील ११ आणि मराठवाडय़ातील ८ जिल्हयात राबविणार दुग्धविकास प्रकल्प शेतकऱ्यांना दूध संकलन व चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावर भर मुंबई।दिनांक ०६। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा (NDDB) मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्हयामध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दूध संकलन व चारा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यावर यात भर देण्यात आला.   विदर्भ आणि मराठवाड्यात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा (NDDB) मदर डेअरीच्या सहकार्याने बुटीबोरी नागपूर व इतर ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या दुग्धविकास प्रकल्पाच्या अनुषंगाने आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या समवेत  नवी दिल्लीत  बैठक पार पडली. राज्याचे पशुसंवर्धन सचिव एम रामास्वामी, आयुक्त...

शेतकरी व शेतीसाठी मदत .... अशी मिळणार

इमेज
शेतकरी व शेतीसाठी मदत: राज्य सरकारचे मोठे मदत पॅकेज जाहीर  🧑‍🌾 शेतकरी व शेतीसाठी मदत खरडून गेलेली जमीन: ₹47,000 + ₹3 लाख (मनरेगा) = ₹3.50 लाख/हेक्टर रबी पिकासाठी अतिरिक्त: ₹10,000/हेक्टर (₹6,500 कोटी) कोरडवाहू शेती: ₹18,500/हेक्टर हंगामी बागायती: ₹27,500/हेक्टर बागायती शेती: ₹32,500/हेक्टर विमाधारक कोरडवाहू शेतकरी: ₹35,000/हेक्टर (₹17,000 विमा + ₹18,500 नियमित मदत) विमाधारक बागायती शेतकरी: ₹50,000/हेक्टर बाधित विहिरी: ₹30,000 प्रति विहीर पायाभूत सुविधा दुरुस्ती: ₹10,000 कोटी DPC साठी: ₹1,500 कोटी 🏠 इतर मदती मृत व जखमींना मदत आधीच दिली घर पडझड झालेल्यांना PM Awas मधून नवीन घर अंशत पडझड घरांनाही मदत गोठे व जनावरांसाठी स्वतंत्र मदत NDRF नियमांनुसार: सर्व जनावरांच्या मृत्यूसाठी मदत, मर्यादा हटवली दुकानदारांना ₹50,000 मदत 🎓 इतर उपाय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी वीजपंपांच्या नुकसानीसाठी भरपाई मुख्यमंत्री सहायता निधी व CSR मधून अतिरिक्त मदत 💡 मुख्य मुद्दा: दिवाळीपूर्वी शक्य तितका निधी थेट लाभार्थ्यांच्या हाती देण्याचा प्रयत्न. पहा- मुख्यमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद-  ...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली....!!!!

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक  दिलीप खिरे सर यांचे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयात अनेक वर्ष सेवा बजावलेले व परळी शहरात सर्व परिचित असलेले व्यक्तिमत्व सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप खिरे सर यांचे काल दिनांक सहा रोजी रात्री पुणे येथे निधन झाले आहे.         प्राध्यापक दिलीप खिरे सर हे वैद्यनाथ महाविद्यालयात अनेक वर्ष कार्यरत होते. भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी या महाविद्यालयात आपली सेवा बजावली. अतिशय अभ्यासु, सुसंस्कृत, मितभाषी व समाजसेवेची आयुष्यभर नाळ जोडून काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. वैद्यनाथ महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय व शिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असणारे प्राध्यापक म्हणून दिलीप खिरे यांची परळीला ओळख होती. परळीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये तसेच विद्यार्थी केंद्रित अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभागी असायचे. परळी शहरातील त्यांची कारकीर्द ही शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने अतिशय उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यामुळ...

दहा हजाराचे पाच लाख देण्यासाठी सावकाराचा तगादा ....

इमेज
परळीत खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतमजूराची आत्महत्या परळी वैजनाथ  - आर्थिक अडचणींना कंटाळून आणि सावकाराच्या धमक्यांमुळे एका शेतमजूराने विष घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना परळीत घडली आहे. मयत शेतमजूराचे नाव देविदास एकनाथराव शिंदे, वय 55 वर्षे, रा. कृष्णा नगर, परळी असे आहे.केवळ दहा हजार रुपये उधार घेतले होते पण खाजगी सावकार त्यावर पाच लाख रुपये फेड करण्यासाठी तगादा लावत होता. एवढंच नव्हे, तर पैसे नाही दिले तर शेती नावावर करून घेईन अशी थेट धमकी देत होता.या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दहा हजाराचे पाच लाख देण्यासाठी सावकाराचा तगादा   खाजगी सावकाराकडुन हात उसणे घेतलेले दहा हजार रुपये परत केले तरी त्या दहा हजार रुपयांचे व्याज पाच लाख रुपये झाले असल्याचे सांगत त्यासाठी तुझी जमीन आमच्या नावावर कर म्हणत मारहाण करुन दिलेल्या त्रासाला कंटाळुन ५५ वर्षीय शेतकर्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दि.४ ऑक्टोबर रोजी घडली.याप्रकरणी खाजगी सावकारकी करणार्या दोघांविरुद्ध सं...

बी सी ए चा विद्यार्थी अभिषेक शिवराज नागरगोजे याची उत्तुंग भरारी

इमेज
विद्यापीठस्तरीय अविष्कार  स्पर्धेत  वैद्यनाथ कॉलेजचे यश बी सी ए चा  विद्यार्थी अभिषेक शिवराज  नागरगोजे याची  उत्तुंग भरारी   परळी (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार २०२५ चे आयोजन दि.३ व ४ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले होते .या स्पर्धेत बीड , धाराशिव , जालना , आणि छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे एकूण ६२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता .सदरील स्पर्धेत वैद्यनाथ कॉलेजमधील बीसीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी अभिषेक शिवराज नागरगोजे याने    बीड जिल्ह्याचे नेतृत्व करत तृतीय क्रमांकाचे पारितोषक संपादन केले.  या विद्यार्थ्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि खरेदी सहाय्यक या विषयावर आपले स्वतः तयार केलेले मॉडेल  विद्यापीठ नियुक्त अविष्कार समिती आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केले. या स्पर्धेतील यशामुळे त्याची राज्यस्तरीय अविष्कार २०२५ करिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघात निवड झालेली आहे. या यशाब...

दुपारी ४ वा.होणार पथसंचलन...

इमेज
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज परळीत विजयादशमी उत्सव:शहरातून पथसंचलन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालुका परळी वैजनाथ यांच्या वतीने आज रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने हा उत्सव विशेष उत्साहात साजरा केला जात आहे. कार्यक्रमाचे ठिकाण चिंतामणी फाउंडेशन स्कूल, तोतला मैदान, परळी वैजनाथ असे असून पथसंचलनाचा मार्ग चिंतामणी फाउंडेशन स्कूल — डॉ. हडबे हॉस्पिटल — सोनार लाईन — राणी लक्ष्मीबाई टॉवर — गणेशपार — नांदूरवेस — सरकारवाडा — आंबेवेस — तळ नगरेश्वर चौक मार्गे पुन्हा चिंतामणी फाउंडेशन स्कूल येथे समारोप होणार आहे. सर्व हिंदू बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.