पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Congratulations!!!!!

इमेज
  प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांना 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' प्रदान ----------------------------------- अंबाजोगाई:  येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक विद्यालयातील प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना गृह विज्ञान विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' देऊन सन्मानित करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. विजय फुलारी, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, ज्येष्ठ कृषीतज्ञ विजयअण्णा बोराडे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, डॉ. भारत खंदारे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचीही उपस्थिती होती. अंबाजोगाई येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मा. राजकिशोर (पापा...

वाका येथे सकाळी ९ वाजता अत्यंविधी

इमेज
अनंत मुंडे यांना मातृशोक; किसाबाई मुंडे यांचे निधन  परळी / प्रतिनिधी.... मराठवाडा साहित्य परिषद परळीचे कार्याध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक संघाचे शहर प्रसिध्दी प्रमुख अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने आज शनिवार दि.२३ रोजी रात्री ९ वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९५ होते.        किसाबाई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या मुखात सतत हरिनामाचे नाव असे. त्यांच्या पश्चात अनंत मुंडे सर यांच्या सह आठ पुत्र आहेत. त्यांचा पार्थिवावर आज रविवार दि.२४ रोजी सकाळी त्यांच्या गावी वाका ता.परळी येथे सकाळी ठीक ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा वर्धापन दिन

इमेज
मराठवाडा विकासात विद्यापीठीय शिक्षणाचा सिंहाचा वाटा - डॉ. प्रा. माधव रोडे         परळी, प्रतिनिधी.....  जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा 67 वा वर्धापन दिन 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी,डॉ माधव रोडे यांनी मराठवाड्याच्या विकासात विद्यापीठीय शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले. विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर,  प्रमुख पाहुणे व व्याख्याते डॉ.माधव रोडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी, डॉ  पी एल कराड, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ रामेश्वर चाटे, इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बाबासाहेब शेप यांची उपस्थिती होती. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून कार...

प्रथम स्मृतीदिन : विनम्र अभिवादन: विशेष प्रासंगिक लेख.....

इमेज
  कै.गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) : एक कष्टमय प्रवासाचा तेजस्वी प्रकाश             "जगण्यासाठी फक्त जन्म घेणे पुरेसे नसते, आयुष्याला अर्थ द्यायला लागतो त्याग, कष्ट आणि जबाबदारीचा आधार."             कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांचा जन्म १ ऑगस्ट १९३० रोजी धारासुर, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथे झाला. त्यांचे वडील रामभाऊ व्यंकोबा मुंडीक आणि आई मधुराबाई रामभाऊ मुंडीक हे कुटुंब सन्मानाने जीवन जगणारे होते. मामाकडे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कष्टमय जीवनाची सुरुवात तेलंगणामधील कोल्हारी, ता.बोच जि. आदिलाबाद येथे केली.फक्त १३ वर्षांचे असतानाच त्यांनी निजामाबाद येथे सुवर्णकार कारागीरीचे काम शिकले व  सुरू केले. वयाच्या कोवळ्या वळणावर जेव्हा इतर मुले खेळण्यात रमलेली असतात, तेव्हा गंगाधररावांनी कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कामात स्वतःला झोकून दिले.              सिंगापूर ता. बोच, जिल्हा आदिलाबाद येथे वडिल रामभाऊ मुंडीक यांनी  १६ एकर शेती घेतलेली होती. ...

प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन

इमेज
कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त कीर्तनाचे आयोजन प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त रविवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांची कीर्तनसेवा होणार आहे.     परळी वैजनाथ येथील सराफा मार्केट मधील सर्व परिचित सुवर्णकार व्यावसायिक रमेश मुंडीक धारासुरकर यांचे वडील कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला असुन प्रेमभक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रमेश मुंडीक धारासुरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर, परळी वैजनाथ येथे रविवार, दि.२४/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ श्री.ह.भ.प. बाळु महाराज जोशी उखळीकर यांचे किर्तन दु. ११ ते १ होईल.या किर्तनास व भोजना...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !

इमेज
  खळबळजनक घटना: बीड जिल्ह्यात पुन्हा एका आश्रमशाळा कर्मचाऱ्याची आत्महत्या ! दोन संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून परळी तालुक्यात एका कर्मचाऱ्याने लावून घेतला गळफास परळी वैजनाथ, प्रतिनिधी...             बीड जिल्ह्यातील केजच्या आश्रम शाळेवरील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आले होते .याबाबत आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या.त्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली असुन परळी तालुक्यात एका युवक कर्मचाऱ्याने स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. नोकरीमध्ये संस्थाचालकांकडून गेले अनेक वर्षापासून सातत्याने होणारा मानसिक छळ, अगोदर केज आणि त्यानंतर परळी तालुक्यातील संस्थाचालकांनी  पैसे न भरता अनुकंपावर नोकरी करतो म्हणून सातत्याने मानसिक त्रास दिला. यातूनच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.             परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवाशी वसंत नगर...

BIRTHDAY WISHES:अभिष्टचिंतन लेख>>>अनंत कुलकर्णी

इमेज
  प्रेरणादायी व्यक्तिमत्व : अशोक जैन “कुछ लोग शोहरत के लिये जीते हैं, कुछ लोग दौलत के लिये जीते हैं, और कुछ लोग होते हैं ऐसे, जो औरों के लिये जीते हैं…!” प रळी शहराची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक ओळख निर्माण करताना अनेक मान्यवर व्यक्तींचे योगदान आहे. याच परळी नगरीतून उदयाला आलेले, प्रसिद्धीपासून दूर राहूनही समाजाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन. “मेहनत का फल तो हर किसी को मिलता है, मगर सच्चाई का साथ देने वाले को इज्ज़त का भी फल मिलता है।” समाजकार्याची ओळख अशोक जैन अनेकांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला. जीवनातील संकटात अडकलेल्या अनेकांना त्यांनी हात दिला, उभे केले. समाजसेवेचा वारसा जपत ते नेहमीच कार्यरत राहिले. त्यांचा एक ठाम विश्वास आहे – “कामातून माणसाला ओळख झाली पाहिजे, प्रसिद्धीमुळे नाही.” म्हणूनच ते प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होतात पण नेहमी सवंग प्रसिद्धीपासून दूर राहतात. सामाजिक भान आणि दृष्टी       अशोक जैन यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येक माणसात काही ना काही क्ष...
इमेज
  परळी तालुक्यात खळबळजनक घटना:एका युवकाची कोयत्याने हत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळी तालुक्यातील जळगव्हाणच्या रत्ननगर तांडा येथील रहिवासी भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची प्राथमिक  माहिती समोर  आली.या घटनेने पुन्हा एकदा परळी तालुक्यात खळबळ माजली आहे.       या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.यांच्यात घरगुती वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. यातूनच ही हत्या झाली.अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे बोलावले. त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली, जोरदार बाचाबाची झाली,  हाणामारी सुरु झाली यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेच...

खिशातील चिठ्ठीतून होणार उलगडा....!

इमेज
  न्यायालयातच सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या ; घटनेने न्यायालयीन परिसरात खळबळ  घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी भेट देत केली पाहाणी  वडवणी/ प्रतिनिधी  वडवणी न्यायालयीन क्षेत्रात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयातील  सरकारी वकील ॲड. विनायक चंदेल (वय अंदाजे ४५ वर्षे) यांनी सहा.अभियोक्ता कार्यालयाच्या खिडकीला शालच्या साहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडवणी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मयत वकिलाच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. मात्र त्या चिठ्ठीमध्ये नेमका काय मजकूर आहे हे अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेऊन तपासाची दिशा पुढील दिशा ठरणार आहे. मयत ॲड. विनायक चंदेल यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण न्यायाल...

Congratulations!!!!! राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश!

इमेज
नीट-पीजी मध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या अकराशेत पटकावले स्थान : डाॅ.प्रज्वल उखळीकरची १०९५ रॅन्क मिळवत यशाला गवसणी   परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....       वैद्यकीय उच्च शिक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षेत (नीट- पीजी) चि.डाॅ. प्रज्वल दिनकरराव उखळीकर (जोशी) याने देशातील पहिल्या अकराशे यशस्वितांमध्ये स्थान मिळवले आहे. नीट- पीजी 2025 परीक्षेत त्याने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले असुन लाखोंच्या स्पर्धेत १०९५ वा रॅन्क मिळवत यशाला गवसणी घातली आहे.या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणार्‍या नीट-पीजी 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी २.४२ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.ही परीक्षा ३ ऑगस्ट रोजी देशभरातील ३०१ शहरांमधील १०५२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होत...

लंडन येथे पार पडला दिमाखदार सोहळा.

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांना 'कोहिनूर ऑफ इंडिया' पुरस्कार प्रदान   लंडन येथे पार पडला दिमाखदार सोहळा मुंबई।दिनांक १९।  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना त्यांच्या खात्यातील उत्कृष्ट कामाबद्दल 'कोहिनूर ऑफ इंडिया' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.  'लोकमत ग्लोबल इकाॅनाॅमिक कन्व्हेन्शन' ही जागतिक परिषद पार पडली. ज्यांनी आपल्या कार्यातून देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे अशा व्यक्तींना  'कोहिनूर ऑफ इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या कुशल व अभ्यासू मार्गदर्शनखाली पर्यावरण व पशुसंवर्धन विभागात उल्लेखनीय काम करून एक नवा आयाम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.  लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमत चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते. चर्चासत्रातही सहभाग -------- महिलांनी मूल्यसंस्कार, देशाची समृध्द संस्कृती आणि वारसा...

नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा

इमेज
  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला! नागापूर ' वाण  प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा परळी वैजनाथ | प्रतिनिधी .........     परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  ' वाण  प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.१८) सायंकाळी ६.४५ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.      परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे.  धरण क्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली.         परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या  तालुक्यातील   नागापूर येथील  ' वाण  प...

अशी असणार परळीतील प्रभागरचना.....

इमेज
  परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या प्रभागांचे असे असणार प्रारुप ;अधिसूचना जारी ,हरकती व आक्षेप नोंदवा ! परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...   परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या प्रभागांचे प्रारुप प्रशासनाने एका अधिसूचननने जारी  केले असुन अधिसूचनेद्वारे परळी वैजनाथ नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात येईल. याबाबत नागरिकांनी हरकती व आक्षेप नोंदवा  असे आवाहन करण्यात आले आहे. अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, परळी वैजनाथ नगरपरिषद यांचेकडे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात, या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. अशी आहे प्रारुप अधिसूचना --------------------      परळी वैजनाथ नगरपरिषद बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे- एकूण सदस्यांची संख्या -३५ दोन सदस्यीय प्रभागांची संख्या १६ तीन सदस्यीय प्रभागांची संख्या ०१ एकूण प्रभागांची संख्या- १७

गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश

इमेज
परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून;धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश परळी वैद्यनाथ (दि. १८) - परळी वैद्यनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.  रविवारी मध्यरात्री कौडगाव - कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली.  ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली आता श्री मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ दहिफळे, ...

अखेर शोध सुरु असलेल्या युवकाचा सापडला मृतदेह.....!

इमेज
बचावकार्यात सकाळी तिघांना वाचवले:पुरात वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...        परळी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने कवडगाव हुडा येथील लिंगी नदीला आलेल्या पुरात चार चाकी मधून प्रवास करणारे चार युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आल्यानंतर तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते मात्र एक जण बेपत्ता होता सकाळपासून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते अखेर आज दुपारी एक पंधरा वाजण्याच्या सुमारास या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे            कौडगाव हुडा (ता. परळी वै.) येथे पूरात अडकलेल्या चार जणांपैकी तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आले मात्र एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौडगाव हुडा परिसरात आलेल्या पूराच्या पाण्यात काल मध्यरात्रीपासून चार युवक अडकले होते. यामध्ये तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाला यश आले असुन एका युवकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1. अमर मधुकर पोळ (वय 22, रा. डिग्रस) 2. राहुल संपत्ती पोळ (वय 32, रा. डिग्रस) ...

तुफान पाऊस....... पर्जन्यसंकट

इमेज
परळी तालुक्यातील चार युवक पाण्यात गेले वाहून कौवडगाव (ता. परळी) | सकाळी 8 वाजता मिळालेली माहिती : पाण्यात अडकलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा जीव वाचवण्यात यश; एकजण अद्यापही बेपत्ता कौवडगाव (ता. परळी) येथे काल उशिरा पाण्यात अडकलेल्या चार तरुणांपैकी तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, बल्लाळ नावाचा एक तरुण अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, अमर पौळ या तरुणाला तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर राहुल पौळ आणि नवले यांनाही प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व नागरिकांचा सक्रिय आहे. सध्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे शोधमोहीमेस अडथळे येत असून, बल्लाळ याचा ठावठिकाणा लागलेला नाही.  सविस्तर बातमी लवकरच....
इमेज
लाखो पुरुष नर्सिंग विद्यार्थी, पुरुष परीक्षार्थी, पुरुष नर्सिंग ऑफिसर्स होणार कायमचे बेरोजगार! राज्य समन्वयक अनिल जायभाये बीडकर पुणे......केंद्र आणि राज्य सरकार जाणीवपुर्वक बेरोजगारांचे कारखाने तयार करत असल्याचा "मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य" यांचा तीव्र आक्षेप, आरोप असून *विद्यार्थ्यांना भविष्यात अंधारात घेऊन जाण्याचे महापाप केंद्र व राज्य सरकार करत आहे. मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांचे राज्यभरात गेली तीन महिन्यापासून *संविधानिक, लोकशाही मार्गाने आंदोलने* चालू असून *शासन* त्याकडे डोळेझाक करत असून मेल *नर्सिंग विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला* आहे तो कधीही उफाळून येऊ शकतो याची *संपूर्ण जबाबदारी शासनाला घ्यावी* लागेल. महाराष्ट्रातील *सर्व पक्षीय 288*  लोकप्रतिनिधी, *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, DMER सचिव, प्रबंधक, संचालक,सदस्य,विधान परिषद सदस्य*, लोकसभा सदस्य तसेच सर्व महाराष्ट्रातील *जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी* यांना सुद्धा समितीच्या वतीने निवेदन देत *शांततेच्या मार्गाने आजघडीला सुद्धा आंदोलन चालू* ...
इमेज
श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळा उत्साहात  परळी वैजनाथ दि. १६ (प्रतिनिधी)   श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन १० जुलै गुरुपौर्णिमा ते गुरुवार (ता.१४) आँगस्ट पर्यंत करण्यात आले होते या सोहळ्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.               स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णा फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ५१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५२ वे वर्षे होते. १० जुलै गुरुपौर्णिमेला श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते...
इमेज
अचानक आलेल्या पुरात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू  परळी वैजनाथ           शहरातील बरकत नगर भागातील रहिवासी  अमेर अजमेर पठाण हा युवक शनिवारी (ता.१६) नेहमी प्रमाणे बांधकामांवरील मिक्सर चालवण्यासाठी तालुक्यातील पांगरी येथे गेला असता बंधाऱ्यावरील वाॅल बांधकाम करत असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेला व त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.      येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बरकत नगर भागातील शाहरुख अजमेर पठाण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार अमेर अजमेर पठाण हा युवक बांधकामांवरील मिक्सरचा ऑपरेटर म्हणून काम करत असे. शनिवारी पांगरी येथील बंधाऱ्याच्या वाॅलचे काम करण्यासाठी गेला असता काम करत असताना बंधाऱ्याला अचानक पुर आला या पुरात तो वाहून गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.