पोस्ट्स

सप्टेंबर २८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१२८ जणांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार

इमेज
पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी व्हीसीद्वारे सहभाग घेऊन केले सर्व उमेदवारांचे अभिनंदन! जालन्यात १२८ अनुकंपा उमेदवारांना शासन नियुक्तीचे आदेश वितरित जालना ।दिनांक ०४।  मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना आज शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी व्हीसीद्वारे यात सहभाग घेऊन शासकीय नोकरी मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.   अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असलेल्या या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्ती (गट-क व गट-ड) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात  मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एकुण १२८ उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले, असा सुर कार्यक्रमातून उमटला.   ...
इमेज
वरिष्ठ व निवड श्रेणी मंजुरीसाठी विशेष शिबीर सर्व जिल्हाला आयोजित करण्याची  शिक्षण उपसंचालकांना मराठवाडा शिक्षक संघाची  मागणी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: विभागातील जालना बीड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यांतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी व प्रमाणित करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील लेखापरीक्षकांना आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ आदेशित करावे याकरिता शिक्षण उपसंचालक श्री प्रकाश मुकुंद (शिक्षण उपसंचालक कार्यालय) यांना सर्वच जिल्ह्यांत विशेष शिबिराचे आयोजन करावे यासाठी आज दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ निवेदन देण्यात आले. मागील काही महिन्यापुर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र,पुणे यांनी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. हजारोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. ज्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी हे पत्र दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या पाठपुराव्यामुळे देण्यात आले मात्र विभागातील जिल्ह्यात अजूनही ह...

शैक्षणिक उपक्रम....

इमेज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे बालसभा उत्साहात  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बालसभा घेतली. या सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि अभिजीत कैलास मुंडे याची निवड करण्यात आली होती. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.  सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले.  इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सर्व शिक्षक वृंदांच्या स्वागतानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु आनंदी विष्णू मुंडे हिने आपले विचार व्यक्त केले तर कु गायत्री भागवत मुंडे हिने लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि यापुढे अशा बाल सभा दर ...

दिलासादायक......!

इमेज
टीईटी' परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; परीक्षा परिषदेकडून पात्रताधारकांना दिलासा राज्य परीक्षा परिषदेने महा टीईटी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. आता ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरू शकतील. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनांसह अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्ज भरण्यास राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ९ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. परिषदेच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी 'टीईटी' घेण्यात येणार आहे. त्यासाठी १५ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रकिया सुरू आहे. ...

५ ग्रामपंचायत बांधकामास १ कोटी १५ लाख निधी मंजूर

इमेज
  धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळी मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बांधकामास निधी मंजूर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून परळी मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बांधकामास १ कोटी १५ लाख निधी मंजूर परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील आणखी ५ ग्रामपंचायतींचे रुपडे पालटणार असून, स्वतःची ग्रामपंचायत इमारत नसलेल्या ५ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायत बांधकामास राज्य सरकारच्या वतीने एकूण १ कोटी १५ लाख रुपये निधी ग्रामविकास विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहेत.  धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मतदारसंघातील स्वतःची इमारत नसलेल्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने परळी तालुक्यातील मरळवाडी (२० लाख), लाडझरी (२५ लाख), रेवली (२५ लाख), तसेच अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक (२५ लाख) व निरपणा (२० लाख) याप्रमाणे निधी मंजूर केला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वी आणखी ४...

आवर्जून या - सावरगांव ग्रामस्थांचे आवाहन

इमेज
आपला दसरा, आपली परंपरा..भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी  आवर्जून या - सावरगांव ग्रामस्थांचे आवाहन पाटोदा । दिनांक ३०। राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर  दसरा मेळाव्याची तयारीने पूर्ण झाली आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा आदर्श ठेवून राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी व ना. पंकजाताईंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी मोठया संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सावरगांव घाट ग्रामस्थांनी केले आहे.       येत्या २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, त्या अनुषंगाने 'आपला दसरा, आपली परंपरा' जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी झाली असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपर...

पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडेंनी दिला धनादेश

इमेज
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडेंनी दिला धनादेश मुंबई, दि. ३० - राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवाना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज मंत्रालयात सुपूर्द केला. राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीत मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता राज्यभरातील अनेक संस्थांकडून मदतीचे ओघ सुरू आहे. राज्यावर आलेल्या या संकटाला आर्थिक मदतीचा हातभार लावणं आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासा...

आपला दसरा हा कार्यक्रम नसून आपली परंपरा....

इमेज
राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद व जनशक्तीचे विराट दर्शन घेण्यासाठी मी भगवान भक्तीगडावर येतेयं - ना. पंकजा मुंडे श्वासात श्वास असेपर्यंत दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ देणार नाही संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना भगवान भक्ती गडावरून देणार मदतीचा हात बीड।दिनांक ३०।  राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेली दसऱ्याच्या सिमोल्लंघनाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे सुरू आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ही परंपरा श्रद्धा व निष्ठेने जपण्याचा प्रयत्न केला. मुंडे साहेबांच्या पश्चात सर्वांच्या आग्रहास्तव आपण ही परंपरा सुरू ठेवली आहे. श्वासात श्वास असेपर्यंत आपण ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. राष्ट्रसंत भगवान बाबांचे आशीर्वाद  आणि आपल्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी मी येत आहे, आपणही या असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.      अठरापगड जातीसह  गोरगरीब, वंचित, उपेक्षित घटकांतील लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात हजेरी लावत असतो. सध्या पूर परिस्थितीने व अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे मो...

यशस्विताचा गौरव..... कौतुकाची थाप

इमेज
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत वरद लांडगे प्रथम; विनोद सामत यांच्या हस्ते गौरव  परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील न्यू हायस्कूल शाळेतील विद्यार्थी चि. वरद श्रीराम लांडगे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर प्रकारामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेची व शहराची  मान उंचावली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल  वैद्यनाथ को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन विनोद  सामत यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.   क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हाभरातून अनेक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. दमदार सराव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वरद लांडगेने प्रभावी कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेत 50 मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकारात जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. या यशाबद्दल वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद  सामत यांनी वरद लांडगे याचा आपल्या निवासस्थानी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत पेढा भरवून सत्कार करत त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली.    यावेळी बोलताना वैद्यनाथ बँकेचे ...

Aarti.....

इमेज
  Navratrotsav : भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ समाजकार्याच्या आघाडीवर – बाजीराव भैया धर्माधिकारी परळी (प्रतिनिधी) – भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित देवीची आरती उत्साहात व भक्तिभावाने परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवीचे विधीवत पूजन करून धार्मिक वातावरणात आरती पार पडली. ParliVaijnath : या प्रसंगी बोलताना बाजीराव भैया धर्माधिकारी म्हणाले की, “भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ हे परळी शहरातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असून, भोजराज पालीवाल  मार्गदर्शनाखाली मंडळाने आरोग्य शिबिरे, रोगनिदान शिबिरे तसेच महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित करून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, “श्री भोजराज पालीवाल हे ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख असून, त्यांनी आजपर्यंत जनतेच्या प्रश्नांवर विविध आंदोलने करून आवाज उठवला आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले. सुनील शिरसाठ यांनी बाजीराव भैया धर्माधिकारी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांचे ...

जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

इमेज
Red alert : in : Jalna district : जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोय Pankaja Munde : पालकमंत्री ना. पंकजा मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष जालना ।दिनांक २९। जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत सात हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरात सापडलेल्या लोकांना अन्न धान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय केली. केवळ माणसानांच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधनाला देखील प्रशासनानेच वाचवले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी याबद्दल कलेक्टर व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. Heavyrain : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्तीत नागरिकांना त्रास होवू नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या भागात पाण्यामुळे धोका निर्...

किसान सभेच्या नेतृत्वात बळीराजा एक

इमेज
झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जागं करण्यासाठी बळीराजा सज्ज किसान सभेच्या नेतृत्वात बळीराजा एक परळी / प्रतिनिधी....यंदाच्या खरीप पूर्व आणि खरिपात झालेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, शेतीपिक, माती आणि शेतमजूर यांचे अतोनात हाल झाले असून अद्याप देखील दगडाचे काळजी असलेल्या मस्तवाल सत्ताधारी आणि प्रशासन यांना या प्रश्नी कसलाच कळवळा नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी उद्या मंगळवार दि 30 रोजी संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयावर आपला टाहो फोडून आक्रोश करणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील शेकडो गावातील शेतकरी मोठ्या संख्येने किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आहेत. अनेक तालुक्यातील गावागावात शेतकरी, शेत मजूर,कामगार, युवक एकत्र येत या आक्रोश मोर्च्याची तयारी करत आहेत. राज्यात अनेक भागात खरीप पूर्ण एप्रिल-मे मधील अवकाळी आणि खरिपाच्या जुलै-ऑगस्ट मध्ये झालेली अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात राज्यात आणि जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन शेती, शेती पीक, शेती अवजारे, पशुधन यांची मोठी हानी झाली. पिढ्यानपिढ्या भरपाई होणार नाही असे शेतीचे नुकसान झाले असून सरकारने सप्टें...

संभाव्य पूर परिस्थिती : नागरिकांनी काळजी घ्यावी...

इमेज
जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग; परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर परळीवैजनाथ: प्रतिनिधी...     जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसरात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आवक २ लाख ७५ हजार १६८ क्युसेक सुरू आहे .पुढील धोका टाळण्यासाठी जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडून २७ दरवाज्यातून टप्प्याटप्प्याने २ लाख २७ हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. या अनुषंगानेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.परळी तालुक्यातील पाच गावांतील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पाच गावांतील नदीकाठावरील नागरिकांचे स्थलांतर.... परळी तालुक्यातील  पोहनेर/डिग्रस/तेलसमुख/बोरखेड, ममदापुर या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याबाबत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाला एका पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. दिनांक २२.९.२०२५ रोजी पासून तालुक्यात अतिवृष्टी व पुरजन्य परिस्थिती झाली आहे, तसेच आज दिनांक २८२८.९.२०२रोजी माजलगाव / जायकवाडी धरणातील पाणी गोद...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली....!

इमेज
  गोविंद देशमुख यांना पितृशोक:  दिनकरराव देशमुख सिरसाळकर यांचे निधन   सिरसाळा, प्रतिनिधी....      सिरसाळा येथील सर्वपरिचित  दिनकरराव देशमुख सिरसाळकर यांचे आज शनिवार दि.२७ रोजी सुमारे रात्री १०.४५ वा. अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षे  वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे.         दिनकरराव देशमुख सिरसाळकर  हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.या दरम्यान आज दि.२७ रोजी  त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय सुस्वभावी,संयमी व मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.अनेक वर्षे त्यांनी चिन्मयमुर्ती संस्थान  उमरखेड येथे सेवेकरी म्हणून गुरुसेवा केली. त्यामुळे त्यांचा सर्वदूर परिचय होता. सिरसाळा येथील प्रतिष्ठित व्यावसायिक भास्करराव देशमुख यांचे ते भाऊ तर गोविंद देशमुख यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने देशमुख परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.   आज अंत्यसंस्कार      दरम्यान  दिवं...