पोस्ट्स

ऑगस्ट ३१, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिष्टचिंतन विशेष लेख......

इमेज
  शैक्षणिक,सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे प्रदीप खाडे             बीड जिल्ह्यातील ज्या काही युवकांनी आपला अल्पावधीतच त्यांच्या कार्यामुळे जनमाणसात ठसा उमटविला आहे.अशा युवकांपैकी एक नाव म्हणजे प्रदीप खाडे.प्रदीप खाडे हे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत तर कै.रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.यासह विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे.         शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे महान कार्य करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात 'शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे प्रवेशद्वार आहे ' तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,' शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.' म्हणजे शिक्षणात किती ताकद आहे हे या महानवांनी बहुजन समाजाला सांगितले आहे.शिक्षणाचे हे क्रांतिकारी शस्त्र लक्षात घेऊन राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी  सुध्दा समाजसुधारणे करिता शिक्षण संस्था सुरू केल्या. आणि रानावनात भटकणारा, डोंगर द- यात  शेती कर...
इमेज
  किरणकुमार गित्ते : प्रशासकीय कार्याचा गौरव आणि एक प्रेरणादायी प्रवास श्री. किरणकुमार गित्ते साहेब, परळी वैजनाथ येथील सुपुत्र आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी, यांनी आपल्या कार्यक्षमतेने देशाच्या प्रशासकीय क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. आज, ५ सप्टेंबर, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आणि उल्लेखनीय कार्याचा आपण आढावा घेऊया. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:-  गित्ते साहेबांचा जन्म परळी वैजनाथ तालुक्यातील बेलंबा गावात झाला. त्यांचे वडील, कै.दिनकरराव गित्ते साहेब, स्वतः शेतकरी असले तरी उच्च शिक्षित होते. त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले. किरणकुमार गित्ते साहेबांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून टाटा मोटर्स, पुणे येथे नोकरी सुरू केली. मात्र, देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, त्यामुळे ते खाजगी क्षेत्रात फार काळ रमले नाहीत. नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले. प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात व त्रिपुरातील योगदान:-  २००५ च्या बॅचचे IAS अधिकारी असलेले किरणकुमार गित्ते साहे...

Birthday Wishes: अभिष्टचिंतन विशेष......

इमेज
प्रशासकीय सेवेत आशेचा किरण म्हणजे "किरण गित्ते साहेब IAS "        मानवी जीवन हे अनमोल आहे.याचे वर्णन सर्व धर्म ग्रंथांनी,संतांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे.शेक्सपियर म्हणतो की हे जग म्हणजे एक रंगमंच आहे.या रंगमाचावर प्रत्येकाला वेगवेगळ्या भुमिका पार पाडाव्या लागतात.ज्या व्यक्तिला मिळालेल्या भुमिकेचे सोने करता येते.इतिहास अस्याच लोकांची नोंद घेतो.लोकशाहीत कार्यकारी मंडळाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.यात नौकरशहाचे अनन्य साधारण महत्व आहे.लोकशाहीची यशस्विता ही कर्तव्यदक्ष व प्रामाणिक नौकरशहावरच अवलंबुन आहे.त्या साठी त्या अधिका-याला आचार,विचार व उच्चार यात समन्वय ठेवता आला पाहिजे व आपल्या प्रशासनात सतत परिस्थितीची जाण व कर्तव्याचे भान असले पाहिजे.असेच परिस्थितीची जाण व कर्तव्याचे भान असणारे मोठे प्रशासकीय व्यक्तिमत्व म्हणजे मा. किरण गित्ते साहेब IAS होत.      बीड जिल्हा तसा सर्वार्थाने प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे.त्यात बारा ज्योतिर्लिं गापैकी वैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी तालुक्यात बेलंबा या छोट्या गावी एका शेतकरी कुटुंबात आई श्रीमती इंदुमतीताई व व...
इमेज
  प्रतिक्स मेकअपच्या "श्रीं"ची मान्यवर महिलांच्या हस्ते आरती सौ. माधुरी मेनककुदळे, सौ. सीमाताई कांदे, सौ. अश्विनी कुकर, सौ. आचार्य यांची उपस्थिती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नामांकित "प्रतिक्स मेकअप" स्टुडिओमध्ये स्थापन करण्यात आलेल्या "श्रीं"ची आज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. . माधुरी मेनककुदळे, सौ. सीमाताई कांदे, सौ. अश्विनी कुकर, सौ. आचार्य यांची उपस्थिती होती.           प्रेमपन्ना नगरमधील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये "श्रीं"ची स्थापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना  "श्रीं"च्या आरतीचा मान दिला जातो. आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी वैद्यनाथ बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालिका सौ. माधुरी योगेश मेनककुदळे, विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सीमाताई सौदागर कांदे (सिरसाट), वडगाव दादाहरीच्या सरपंच सौ. अश्विनीताई शिवाजी कुकर, सौ. प्रियाताई आचार्य आदींच्या हस्ते आज आरती करण्यात आली. यावेळी "ब्युटी पार्लर हे केवळ महिलांचे क्षेत्र आहे ही संकल्पना प्रतिक सुरवसे याने मोडीत क...
इमेज
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोहीम:दोन तलवारी जप्त  परळी (प्रतिनिधी) – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, तसेच सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पोलीसांनी दोन इसमांचा शोध घेतला. त्यांच्याकडून २ घातक शस्त्रे (तलवारी) जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. 211/25 व 213/25, भादंवि कलम 4/25 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जर कोणाकडे घातक शस्त्रे, तलवारी अथवा अशा प्रकारचे अवैध साहित्य असल्याची माहिती असेल, तर कृपया परळी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिक मोबाईल क्रमांक 9225092825 वर माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.
इमेज
ग्रामीण पोलीसांची कारवाई: ३ लाखाची गाडी आणि ३० हजारांची दारू पकडली परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      अवैध वाहतूक होणाऱ्या दारुवर परळी ग्रामीण  पोलीसांची कारवाई करुन  ३ लाखाची गाडी आणि ३० हजारांची दारू पकडली आहे.      पोउपनि संजय रामराव फड (वय 56 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार परळी येथून धर्मापुरीकडे जाणाऱ्या वाहनात अवैध देशी दारु वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पो. नि. सय्यद (परळी ग्रामीण) यांच्यासह पोलीस कर्मचारी व पंचांसमवेत 03 सप्टेंबर 2025 रोजी 11.30 वाजता धर्मापुरी रस्त्यावर सापळा लावण्यात आला. यावेळी  एक लाल रंगाची व्हिस्टा कार (क्र. MH26 V 3093) ही परळी कडून येताना आढळून आली. ती थांबवून तपासणी केली असता, चालकाने आपले नाव संतोष दगडुबा मस्के (वय 47, रा. संत तुकाराम नगर, वडसावित्री, परळी वैजनाथ) असे सांगितले. सदर वाहनाची झडती घेतली असता खालील मुद्देमाल मिळून आला:देशी दारू (टैंगो पंच कंपनी) – एकूण 500 बाटल्या (प्रती बॉटल ₹50) – एकूण किंमत ₹25,000/- व्हिवो मोबाईल फोन (जुना) – अंदाजे किंमत ₹8,00...

एक लाखांच्या वर दंड वसूल.....कर्णकर्कश सायलेन्सर टाकले काढून

इमेज
कर्णकर्कश आवाज दाबण्याची मोहीम: बुलडोझरने चिरडून टाकले कारवाईतील सायलेन्सर्स परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी... परळी शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या बुलेटराजांना दणका देत तब्बल 39 सायलेन्सर वर बुलडोझर फिरवला. या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत यापुढेही बेशिस्त वाहनचालकांना असाच धडा शिकवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अनेक दुचाकी वाहनधारक सायलेन्सरमध्ये बदल करतात. फटाके फुटल्‍यासारख्या मूळ सायलेन्सर काढून त्यामध्ये बदल करत कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे शहरातील महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थ्यांत भीती निर्माण झाली होती. भरधाव वेगात रस्त्यांवरून धावणाऱ्या या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर मुळे नागरिक हैराण झाले होते.  याविरोधात अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्याने शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरात विशेष मोहीम राबवत मागील महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या भागांत कारवाई करून 39 बुलेटस्वारांविरुद्ध कारवाई करून, सायलेन्सर जप्त करण्यात आले. सोबतच एक लाखांच्या वर दंड वसूल करण्यात आला. बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोझर चालवून ते न...

संवेदनशील परळीकरांचा अन्यायाविरुद्ध लढावू बाणा !

इमेज
पहा:ही आहे खरी परळीची संस्कृती व वृत्ती - लेकीच्या न्यायासाठी अन् हैवानी वृत्तीला ठेचण्यासाठी अख्खी परळी रस्त्यावर! भक्कम आधार: पीडितेच्या कुटुंबाला परळीकरांनी चालत, चालत जमा करून दिले 85 हजार रुपये ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी रेल्वे स्थानकात दिनांक 31 रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. पंढरपूरच्या कुटुंबातील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी परळीकरांनी आज(दि.३) एकजुटीने वज्रमूठ दाखवत कडकडीत बंद पाळला.तसेच लाखोच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन याबाबतचा निषेध नोंदवला.एवढेच नाही तर पिडित कुटुंबाला ८५ हजारांचा निधीही सुपूर्द केला आहे.       पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबावर परळीच्या रेल्वेस्थानकावर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वेळ आली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या परळीत घडली याची सल प्रत्येक संवेदनशील, सजग आणि सातत्याने अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा असलेल्या तमाम परळीकरांच्या मनाला खटकली. चिमुकली वरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील हैवानाला फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे या मागणीसाठ...

मोठी करवाई ; लाखोंचा गांजा जप्त

इमेज
दै. महाराष्ट्र प्रतिमाच्या "नशाविरोधी"वृत्त मालिकेला मोठे यश पोलिस उपअधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या पथकाची मोठी करवाई ; लाखोंचा गांजा जप्त परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील रेल्वे स्थानक शेजारीनअसलेल्या इराणी गल्लीमधील एका घरातून अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने छापा टाकत गांज्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत लाखोंच्या गांजासह मोटारसायकल ऐवज जप्त करण्यात आला आहे. परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी गल्लीमध्ये एका घरात गांजा असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे व पोलिसांच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इराणी गल्लीतील घरात छापा केला असता या ठिकाणी 51 किलो गांजा व काही मोटारसायकली आढळून आल्या. सदरील छाप्या बाबत बातमी लिखाण करे पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली असून रविवार दि 31 रोजी याच परिसरात असलेल्या रेल्वे स्थानकावरून चिमुकल्या मुलीस आमिष दाखवून अमानुष अत्याचार केल्याची घटनेने स्थानक परिसरात अवैध धंदे बोकाळली असल्याचे उजेडात आले होते.  पर...

दुर्दैवी घटना.....!

इमेज
निलंबित पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची गळफास घेऊन आत्महत्या! अंबाजोगाईतील घटना; कुटुंबीय गेले होते गावी अंबाजोगाई (प्रतिनिधी):  एप्रिल महिन्यात निलंबित झालेले  पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील राहत असलेल्या  घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे.        परळी तालुक्यातील नागदरा हे सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाईत वास्तव्यास होते. परभणी, लातूर, बीड येथे त्यांनी काम केले होते. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. परभणी येथे त्यांनी एका पोलिस अधीक्षकांना शिविगाळ केली होती. त्या प्रकरणात चौकशी सुरू होती. बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचा-याला शिविगाळ करून धमकी दिली होती.बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवेले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेंव्हापासून ते नैराश्यात होते. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास ...

हैवानाला फाशीच द्या: सकल मुस्लिम समाजही सरसावला!

इमेज
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या हैवानाला चार दिवसाची पोलीस कोठडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी-     परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेत केवळ वय सहा वर्षै असलेल्या पंढरपूर येथील एका चिमुकलीवर रेल्वे स्थानकातून उचलून नेऊन अघोरी पद्धतीने अतिशय क्रुरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणातील परळी येथील बरकत नगर भागातील 27 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आरोपीला आज अंबाजोगाईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.या प्रकरणात या आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परळीतील लहान मुलीवर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज आक्रमक !  सकल मुस्लिम समाज परळीच्या वतीने संभाजीनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. ३ सप्टेंबरला परळी बंदचे आवाहन  करण्यात आले आहे त्याला सकल मुस्लिम समाज परळीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.जी घटना घडली आहे त्या केसला फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी,परळी रेल्वे पोलिसांनी यापुढे रेल्वे परिसरात आपली सुरक्षा वाढवावी ...

ना. पंकजा मुंडेंचा बीडच्या एसपींना फोन

इमेज
  परळीतील चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी ना. पंकजा मुंडेंचा बीडच्या एसपींना फोन ; आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश बीड।दिनांक ०१। परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बीडच्या एसपींना दिले.अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करणारा नराधम कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नये, अशी शिक्षा त्याला झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.      रेल्वे स्थानक परिसरात बाहेरगावाहून आलेल्या एका दाम्पत्याच्या पाच वर्षाच्या बालिकेवर शनिवारी एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेबाबत ना. पंकजाताई मुंडे यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत यांना फोन करून सर्व माहिती घेतली. हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे, आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये, अशी केस तयार करून त्याला कडक शिक्षा करा असे निर्देश त्यांनी दिले. पिडित चिमुरड...

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....

इमेज
क्रूरता आणि लैंगिक अत्याचाराचे 'हैवानी' क्रुर कृत्य: चिमुकलीची हाकिकत ऐकाल तर काळीज तुटल्याशिवाय राहणार नाही !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        पंढरपूर येथील एका मजूर कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना काल दिनांक 31 रोजी घडली. या घटनेने मन सुन्न करून टाकले आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असली तरी पीडित चिमुकलीने कथित केलेली हकीकत अंगावर शहारे आणि काळीज पिळवटून टाकणारी आहे.             केवळ वयवर्ष सहा असणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना परळीच्या रेल्वे स्थानकात घडल्यानंतर याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी तातडीने बरकत नगर मधील 27 वर्षीय एका विकृत हैवानाला ताब्यात घेतले आहे. त्याला स्थळ पाहणी साठी घेऊन जाऊन या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्याला न्यायालयाने हजर केले आहे. मात्र याबाबत पीडित चिमुकलेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद हकीकत बघून काळीज पिळवटल्याशिवाय राहणार नाही. एक तर इतक्या लहान बालिकेवर अत्याचाराची कल्पनाच कोणी करू शकत नाही. मात्र या है...

हैवानी वृत्तीचा बिमोड करा: परळीकर सरसावले!

इमेज
चिमुकलीवरील 'हैवानी' अत्याचार: प्रकरण फास्टट्रॅकवर चालवा,आरोपी  हैवानाला फाशी द्या - मागणीसाठी तीन तारखेला परळी बंदचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या पवित्र परळी वैजनाथाच्या भूमीत बाहेर गावाहून आलेल्या मजूर कुटुंबातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर हैवानी गैरकृत्य करणाऱ्या आरोपी हैवानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा, तातडीने या हैवानी  वृत्तीचा बिमोड करा या मागणीसाठी तमाम परळीकरांच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.          परळी रेल्वे स्थानकात दि. 31 रोजी पंढरपूर येथून रेल्वेने आलेल्या व रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका मजूर कुटुंबातील चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाने सर्व स्तरात प्रचंड चीड व संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे हैवानी कृत्य करण्याची वृत्ती परळीत निपजत असेल तर याचा वेळीच बिमोड केला गेला पाहिजे. यासाठी तमाम परळीकरांनी एकत्रित येत...

प्रतिक्स मेकअपची सेवा दर्जेदार-सौ.अर्चना सोनी

इमेज
प्रतिक्स मेकअपच्या "श्रीं"ची सौ. अर्चना सोनी यांच्या हस्ते आरती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नामांकित "प्रतिक्स मेकअप" स्टुडिओमध्ये स्थापन करण्यात आलेल्या "श्रीं"ची आज सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चना सोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.       प्रेमपन्ना नगरमधील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये "श्रीं"ची स्थापना करण्यात आली आहे. येथील "श्रीं"ची विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना आरती करण्याचा मान दिला जातो. आज  रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सौ. अर्चना राजेंद्र सोनी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी संज्ञा सोनी, कोमल लांडगे आदींची उपस्थिती होती.      प्रारंभी प्रतिक्स मेकअपचे संचालक, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक सुरवसे व ऐश्वर्या ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. प्रतिभा सुरवसे यांनी स्वागत केले.
इमेज
  परळीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची लक्षणीय उपस्थिती श्री व सौ आशिष चौधरी परिवाराच्या हस्ते पुजा व आरती  परळी वैजनाथ/संतोष जुजगर       वीरशैव समाज परळीच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा 124 वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह बुधवार दिनांक 27 ऑगस्ट पासून  भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला आहे. मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी  श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या आशीर्वाचनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.  कार्यक्रमाच्या  प्रारंभात श्री संतश्री गुरूलिंग स्वामी व संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन  दैनिक महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे उपसंपादक श्री व सौ आशिष शंकरअप्पा चौधरी श्री व सौ अविनाश शंकरअप्पा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्...

संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना......!

इमेज
  परळीत हैवानी दुष्कृत्याने गाठली परिसीमा: पाच वर्षाच्या बालिकेवर रेल्वे स्थानकातून उचलून नेऊन बलात्कार  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी वैजनाथ येथे हैवानी दुष्कर्त्याने परिसीमा गाठली असुन आज दि. 31 रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे.         याबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अशी की, पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले. सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथ स्थानकावर आली. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून  आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते.दरम्यान तेवढ्या काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चकरा मारत होती. या...

कौतुकाची पाठीवर थाप....!

इमेज
NEET 2025 मध्ये यशस्वी झालेल्या कु. मधुरा तिळकरीचा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारा कडून गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :परळी शहरातील कु. मधुरा संदीप तिळकरी हिने NEET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या परिवारासह शहराचेही नाव उज्ज्वल केले आहे. तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एम.बी.बी.एस. या कोर्ससाठी प्रवेश निश्चित झाला आहे. या यशाचा आनंद व्यक्त करत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, परळी वै यांच्या वतीने तिचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला महादेव इटके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. सुदाम कापसे,  शिरीष चौधरी, सौ. रेणुका चौधरी, कु. मधुरा महादेव इटके,  संदीप तिळकरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. संजयभैया सेवलकर यांनीही उपस्थित राहून कु. मधुरा हिच्या मेहनतीचे व जिद्दीचे मनापासून कौतुक केले.      कु. मधुराच्या या यशामध्ये तिचे वडील आदर्श शिक्षक  संदीप तिळकरी यांचा विशेष मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने योग्य मार्गदर्शन केले तसेच अभ्यासातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रा...