कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक

मानसिंग शाहुराव राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक परळी वैजनाथ ता. १५ प्रतिनिधी सिरसाळा येथील मानसिंग शाहुराव राठोड (वय ९९ वर्षे) यांचे बुधवारी (ता १५) पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी चार वाजता सिरसाळा येथील शिवाजीनगर तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राख सावडण्याचा विधी शुक्रवारी (ता १७) सकाळी ७:३० होणार आहे. त्यांच्या पश्चात उत्तम राठोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ पांडुरंग राठोड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी रोहीदास राठोड यांच्यासह चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.