परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महाएल्गार मोर्चात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ताकदीने सहभागी होणार- जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके
परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)
समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.१७) महाएल्गार मोर्चाचे आयोजन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बीड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व येथील तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके व सचिव प्रा मधुकर शिंदे यांनी केले आहे.
समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, आमदार धनंजय मुंडे व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार मोर्चाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व तेली समाजाच्या वतीने श्री शनी मंदिरात बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत बीड येथील महाएल्गार मोर्चात ताकतीने सहभागी होवून मोर्चा यशस्वी करण्याचे ठरवण्यात आले. तसेच या मोर्चात सिरसाळा , नागापूर व शहरातील तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असून यासंदर्भात तयारी मोठी तयारी करण्यात येत आहे. शहरातील सर्व ओबीसी बांधवांनी महाएल्गार मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा मधुकर शिंदे व सर्व तेली समाजाने केले आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी, तेली समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा