परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

विपरीत वातावरणीय बदलांना विविध गोष्टी कारणीभूत; सकारात्मक बदलांची नितांत गरज - मयंक गांधी

पत्रकार परिषद घेऊन ग्लोबल विकास ट्रस्टकडून श्वेतपत्रिकेचे विमोचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

    मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने जागतिक तापमानात वाढ झाली असल्याने विपरीत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत. मराठवाडा किंवा अनेक भागांमध्ये झालेली अतिवृष्टी किंवा पावसाची अनियमितता याला अनेक गोष्टी कारणीभूत असून, या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेली श्वेतपत्रिका ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सिरसाळा येथील कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे बुधवार (15) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस जलनायक मयंक गांधी यांनी संबोधित केले. यावेळी डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्यासह भूगर्भ शास्त्रज्ञ देवेंद्र जोशी यांची उपस्थिती होती.

    यू.एन.डी.आर.आर, आराईझ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, तृप्त धारा निर्मल आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिका - आपत्तीचे विश्लेषण आणि भविष्यकालीन उपाययोजना" ही पत्रिका जाहीर करण्यात आली. याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना जलनायक मयंक गांधी म्हणाले की, पर्यावरणीय बदलांचा समतोल बदलत गेल्याने पावसाची अनियमितता तसेच अतिवृष्टीसाखे आपत्तीचे प्रसंग सतत ओढवत आहेत. यंदाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने मराठवाड्याला बेचिराख केले, मोठ्या प्रमाणावर हानी झाली. असा प्रसंग पहिल्यांदाच घडतोय असे नाही तर यापूर्वीही अनेकवेळा घडले आहेत. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असून मुख्यतः वृक्षतोड, जागतिक तापमानवाढ, पावसाचे असमान वाटप आणि जलसंधारणाच्या कामांचा अभाव अशा प्रमुख कारणांचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीही कारणीभूत असून अनेकवेळा त्यामुळेही पूरपरिस्थिती निर्माण होते. हे भविष्यात घडू नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हायला हवी, जलसंधारणाची कामे होणे गरजेचे असल्याचे मयंक गांधी यांनी म्हटले आहे.

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सिरसाळा येथील जागतिक दर्जाचे कृषिकुल पाहता यावे यासाठी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी 12 ते 03 दरम्यान आयोजित कार्यमात सहभागी झालेल्या पत्रकार कुटुंबियांनी कृषिकुल येथे असलेल्या सर्व उपलब्ध सोयी - सुविधांची पाहणी केली. माती परीक्षण प्रयोगशाळा, जलसंधारण कक्ष, देवराई, यंत्रसामुग्री कक्ष, गोशाळा तसेच विविध प्रकारच्या फळबाग प्लॉटची पाहणी केली व कृषिकुल परिसरात उभारण्यात आलेल्या कृषी महादेव मंदिरातील प्रभूंचे दर्शन घेतला. सर्वांनी एकमेकांना दीपावली निमित्त शुभेच्छांची आदान - प्रदान केली. सिरसाळा व परळी वैजनाथ येथील सर्व पत्रकारांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!