कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक

मानसिंग शाहुराव राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन 



कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक 

परळी वैजनाथ ता. १५ प्रतिनिधी 

सिरसाळा येथील मानसिंग शाहुराव राठोड (वय ९९ वर्षे) यांचे बुधवारी (ता १५) पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी चार वाजता सिरसाळा येथील शिवाजीनगर तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राख सावडण्याचा विधी शुक्रवारी (ता १७) सकाळी ७:३० होणार आहे. त्यांच्या पश्चात उत्तम राठोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ पांडुरंग राठोड,  सेवानिवृत्त कृषी अधिकारी रोहीदास राठोड यांच्यासह चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !