परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
मराठवाडा पदवीधर मतदार संघात एक लाख मतदार नोंदणीचे मराठवाडा शिक्षक संघाचे उदिष्ट
पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी- चंद्रकांत चव्हाण, नवनाथ मंत्री
छत्रपती संभाजीनगर.(प्रतिनिधी) :- मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी काळात होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु असून मराठवाडा शिक्षक संघ पुर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार आहे. एक लाख पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे उदिष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समोर ठेवले आहे. त्यासाठी मराठवाडा विभागातील पदवीधर आसलेले शिक्षक, प्राध्यापका सह इतर सर्व क्षेत्रात कार्यरत आसलेल्या पदवीधर कर्मचारी व पदविधारक बांधवाची मतदानासाठी नाव नोंदणी करून घ्यावी व पदविधारकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करावी असे अवाहन जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, महानगर सचिव नवनाथ मंत्री यांनी केले आहे.
याबाबत मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली माहिती अशी की, सदरील होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना यांनी वरील उदिष्ट समोर ठेवून मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करून घेण्याचे अवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. नाव नोंदणी दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करून घेण्यात येत आहे. त्यासाठी मतदार हा १ नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा पदवीधर आसला पाहिजे. तहसील कार्यालयातून नमुना अर्ज क्र.१८ घ्यावयाचा आहे. व तो पुर्ण माहिती भरून त्यासोबत कोणत्याही विद्यापिठाच्या पदवीचे प्रमाणपत्र अथवा शेवटच्या वर्षाच्या गुण पत्रकाची सत्यप्रत, आधार कार्ड अथवा मतदार ओळखपत्राची झेरॉक्स जोडावी व अर्जावर पासपोर्ट चिटकवावा. व सदरील अर्ज मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांच्याकडे अथवा तहसील कार्यालयात स्वतः नेव्हून द्यावा व त्याची पोच घ्यावी असे आव्हान यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, महानगर सचिव नवनाथ मंञी प्रा. डॉ उमाकांत राठोड, प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. डॉ. पुरूषोत्तम जुन्ने, योगेश खोसरे, नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, मनोज चव्हाण, विनोद केनेकर, गोरे के.एस., विलास चव्हाण, दिपक वाघ, भास्कर पवार, रावसाहेब बोरसे, प्रा. डॉ. पद्माकर पगार, अजित जाधव, बाळू पवार, संतोष राठोड, विलास चांदणे, विलास भुतेकर, राजपूत पी. व्ही. , अरूणा चौधरी, शितल कवडे, सविता हिंगे, मानसी भागवत ,स्वाती बोंडे , रेखा साकळे, सोनाली गव्हाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा