परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

हिंद की चादर ' गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी शताब्दी क्षत्रिय अशासकीय समितीच्या बीड जिल्हा सदस्यपदी घमंडसिंग सुरज सिंग जुनी  निवड





परळीवैजनाथ / बाबा शेख...

महाराष्ट्र शासनातर्फे 'हिंद की चादर' गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समिती गठीत करुन अशासकी सदस्यांची निवड केली जात आहे.यात बीड जिल्हा सदस्यपदी घमंड सिंग सुरज सिंग जुनी  निवड करण्यात आली आहे.


गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहादत व त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, जसे की नगर कीर्तन, कथा आणि किर्तन, यांच नियोजन करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्याबरोबरच नांदेड सही नागपुर, मुंबई येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले असून देश विदेशातील समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. असल्याची माहिती घमंड सिंग सुरज सिंग जुनी यांनी दिली.

श्री गुरु तेग बहादुर यांचे सन २०२५ हे ३५० व शहीद समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. "हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब - - जी ३५० वी शहीद समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली. कार्यक्रमाचे आयोजन सिख, शिकल करी, बंजारा, लबांना,मोहियल, सिंधी समाज बांधव एकत्रितपणे करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकत्रित येऊन करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्ह्यामधून सामाजिक कार्यकर्ते तथा परळी शहरातील सर्व समाज बांधव यांची समितीच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल घमंड सिंग सुरज सिंग यांच्या वर सर्व स्तरातुन शुभेच्छा तसेच अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!