पोस्ट्स

कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक

इमेज
मानसिंग शाहुराव राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन  कॉ. पांडुरंग राठोड यांना पितृशोक  परळी वैजनाथ ता. १५ प्रतिनिधी  सिरसाळा येथील मानसिंग शाहुराव राठोड (वय ९९ वर्षे) यांचे बुधवारी (ता १५) पहाटे सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी चार वाजता सिरसाळा येथील शिवाजीनगर तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राख सावडण्याचा विधी शुक्रवारी (ता १७) सकाळी ७:३० होणार आहे. त्यांच्या पश्चात उत्तम राठोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ पांडुरंग राठोड,  सेवानिवृत्त कृषी अधिकारी रोहीदास राठोड यांच्यासह चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
इमेज
हिंद की चादर ' गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी शताब्दी क्षत्रिय अशासकीय समितीच्या बीड जिल्हा सदस्यपदी घमंडसिंग सुरज सिंग जुनी  निवड परळीवैजनाथ / बाबा शेख... महाराष्ट्र शासनातर्फे 'हिंद की चादर' गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समिती गठीत करुन अशासकी सदस्यांची निवड केली जात आहे.यात बीड जिल्हा सदस्यपदी घमंड सिंग सुरज सिंग जुनी  निवड करण्यात आली आहे. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहादत व त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, जसे की नगर कीर्तन, कथा आणि किर्तन, यांच नियोजन करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भेटी देऊन मार्गदर...

पत्रकारांचे कौटुंबिक स्नेहमिलन

इमेज
विपरीत वातावरणीय बदलांना विविध गोष्टी कारणीभूत; सकारात्मक बदलांची नितांत गरज - मयंक गांधी पत्रकार परिषद घेऊन ग्लोबल विकास ट्रस्टकडून श्वेतपत्रिकेचे विमोचन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)     मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने जागतिक तापमानात वाढ झाली असल्याने विपरीत पर्यावरणीय बदल दिसून येत आहेत. मराठवाडा किंवा अनेक भागांमध्ये झालेली अतिवृष्टी किंवा पावसाची अनियमितता याला अनेक गोष्टी कारणीभूत असून, या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेली श्वेतपत्रिका ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात आली. सिरसाळा येथील कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे बुधवार (15) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस जलनायक मयंक गांधी यांनी संबोधित केले. यावेळी डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्यासह भूगर्भ शास्त्रज्ञ देवेंद्र जोशी यांची उपस्थिती होती.     यू.एन.डी.आर.आर, आराईझ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, तृप्त धारा निर्मल आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिका - आपत्तीचे विश्लेषण आणि भविष्यकालीन उपाययोजना" ही पत्रिका जाहीर ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
महाएल्गार मोर्चात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ताकदीने सहभागी होणार- जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके  परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)            समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.१७) महाएल्गार मोर्चाचे आयोजन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बीड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व येथील तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके व सचिव प्रा मधुकर शिंदे यांनी केले आहे.                    समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता मंत्री छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, आमदार धनंजय मुंडे  व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार मोर्चाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथ...

पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी- चंद्रकांत चव्हाण, नवनाथ मंत्री

इमेज
मराठवाडा पदवीधर मतदार संघात एक लाख मतदार नोंदणीचे मराठवाडा शिक्षक संघाचे उदिष्ट पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी-  चंद्रकांत चव्हाण, नवनाथ मंत्री छत्रपती संभाजीनगर.(प्रतिनिधी) :- मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी काळात होणाऱ्या पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु असून मराठवाडा शिक्षक संघ पुर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार आहे. एक लाख पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे उदिष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समोर ठेवले आहे. त्यासाठी मराठवाडा विभागातील पदवीधर आसलेले शिक्षक, प्राध्यापका सह इतर सर्व क्षेत्रात कार्यरत आसलेल्या पदवीधर कर्मचारी व पदविधारक बांधवाची मतदानासाठी नाव नोंदणी करून घ्यावी व पदविधारकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करावी असे अवाहन जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, महानगर सचिव नवनाथ मंत्री यांनी केले आहे. याबाबत मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली माहिती अशी की, सदरील होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांच्या अध्यक्षतेख...

हार्दिक अभिनंदन!!!!!

इमेज
युवक नेते सचिन कागदे  यांना राज्यस्तरीय समाजरत्न  पुरस्कार जाहीर परळी / प्रतिनिधी – येथील  नगरपरिषद गटनेते  सचिन ईश्वर कागदे यांची “माणूसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” तर्फे  दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय समाजरत्न  पुरस्कारासाठी निवड झाल्याची गौरवशाली घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.  सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात सतत जनतेच्या भल्यासाठी, समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सचिन कागदे यांच्या कार्याचा गौरव करत फाऊंडेशनने त्यांची राज्यस्तरीय सन्मानासाठी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परळी शहराचा मान उंचावला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परळीतील युवकांना संघटित करून सामाजिक एकजूट निर्माण करणे, सामाजिक प्रश्न सोडविणे, वंचितांना आधार देणे शैक्षणिक तसेच गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये माणूसकीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्यशैलीत नेहमीच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता दिसून येते. समाजरत्न  पुरस्कार वितरण समारंभ ...

परळी वैजनाथ:महावितरणची महत्त्वाची माहिती

इमेज
  आज सकाळी 10 ते दुपारी 2 : वीज पुरवठा राहणार बंद  परळी वैजनाथ,प्रतिनिधी...       दिनांक 12/10/2025 रोजी परळी शहराला सप्लाय असणाऱ्या ओल्ड पावर हाऊस उपकेंद्रामध्ये मेन्टनन्स करण्याकरिता सकाळी 10:00ते दुपारी 02:00 या वेळेत खालील भागाचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.   *मोंढा मार्केट, टावर एरिया, बस स्थानक, एकमिनार चौक,वैद्यनाथ मंदिर परिसर,नेहरु चौक, तळ परिसर, आझाद नगर, सुर्वेश्वर नगर, पेठ मोहोल्ला, गणेशपार भाग, पद्मावती नगर, बसवेश्वर कॉलनी,  बरकत नगर एरिया तसेच चांदापूर, वसंत नगर,राम नगर, नंदागौळ इत्यादी भाग बंद राहणार आहे.       *महावितरण, परळी.*