अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

 परळीत पुन्हा आणखी एक 'हैवानी' कृत्य: अल्पवयीन मुलीवर विकृत पद्धतीने बलात्कार

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही  एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच चार विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असुन या घटनेची हकीकत चीड आणणारी आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

      परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि संतापजनक घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, बरकतनगर भागातील एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना रस्त्यात तिला उचलून नेले. अंधारात एका आड मार्गावरील पांदणीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.  याच गल्लीत राहणाऱ्या हैवानी वृत्तीच्या चार युवकांनी ठरवून या मुलीला उचलले व तिला पांदणीत नेले. चारपैकी दोन आरोपींनी तिला पकडून तिच्यावर बलात्कार करण्यास इतर दोघांना मदत केली. एकाच वेळी दोघांनी अमानवी पद्धतीने बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेले रेल्वे स्थानकावरील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत असतानाच आणखी अशाच प्रकारच्या हैवानी कृत्याचे प्रकरण पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.अधिक तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!