इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

 परळी बीड रस्त्यावर भीषण अपघात दोन जण जागीच ठार ;एक जखमी

परळी वैजनाथ,प्रतिनिधी - परळी- बीड रस्त्यावरील पांगरी गावाजवळ टिप्परने एका बुलेटला जोराची धडक देऊन उडवल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

         हा अपघात आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रक्ताच्या थारोळ्यात या गाडीवरील मोटर सायकल स्वार पडले आहेत. मयत इसम  परळी तालुक्यातील जळगाव येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण असुन या अपघातात एका चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आपघातस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

नातीवर उपचार करुन जात होते गावाकडे: काळाने घातला घाला....

 या आपघातात जळगव्हाण चे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी आहेत. परळी येथील खासगी रुग्णालयात नात श्रुती वर दुपारी उपचार करुन गावाकडे जाताना सायंकाळी हा अपघात घडला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....