परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: *रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारे* *14 आॅगस्ट रोजी आॅनलाइन नोंद असलेल्या शिधापत्रिका व लाभार्थी संख्येनुसार नियतन मंजूर*

 *रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारे*


*14 आॅगस्ट रोजी आॅनलाइन नोंद असलेल्या शिधापत्रिका व लाभार्थी संख्येनुसार नियतन मंजूर*



बीड,  दि. १::-जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये अंत्योदय अन्न अंतर्गत अन्नधान्याच्या सोबत साखरेचे वितरण केले जात आहे. तसेच शासनाकडून मंजूर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेतर्गत सर्व धान्य वाटप हे केवळ ई-पॉस मशीनद्वारेच मिळेल, इतर कोणत्याही मार्गाने किंवा लेखी पावत्यांच्या आधारे कोणालाही धान्य दिले जाणार नाही 


सदरील मशीनद्वारे धान्य वाटप करताना मशीन मधून जी पावती निघते ती पावती पात्र कार्डधारकांसाठीची आहे आणि ती प्रत्येक रास्त भाव दुकानदारने लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येकाने स्वतःचा हक्क समजूनच मागून घेतली पाहिजे. या पावतीवर संबंधित कार्डधारकाला किती धान्य देण्यात येत आहे आणि त्यासाठी त्यांनी किती रक्कम दुकानदारांना द्यावी हे दिलेले असते. जर राशन दुकानदार ही पावती देत नाही अशी तक्रार प्राप्त झाल्यास व  तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल.


जिल्हास्तरावरील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचा शासनाकडून प्राप्त इष्टांक पूर्ण झाला असल्याने यापुढे जिल्ह्यात कुठल्याही रास्त भाव दुकानात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत लाभार्थी वाढविणे शक्य होणार नाही. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये यापुढे नवीन लाभार्थी यांची डाटा एन्ट्री करू नये व यादीमध्ये अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी पैकी  जमीन मालक/ लग्नानंतर स्थलांतरित स्त्री/ कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्ती किंवा कुटुंब / मयत अशी नावे आढळून आल्यास तात्काळ संबंधित तहसील कार्यालयास अथवा तलाठी यांना कळविण्यात यावे म्हणजे नवीन पात्र लाभार्थ्यांना त्यांचे ऐवजी समाविष्ट करता येईल.


तसेच एपीएल शेतकरी योजनेचा स्थानिक 96 हजार 356 लाभार्थी इतका शिल्लक असल्याने डाटा एन्ट्री करताना शेतकरी लाभार्थी शेतकरी योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे 


आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल याची जबाबदारी संबंधित रेशन दुकानदार यांची असेल. सबब सर्व पात्र नागरिकांनी तात्काळ रेशनद्वारे धान्य मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे जमा करावेत.


1. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड च्या छायांकित प्रती

2. शिधापात्रिकेमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी पूर्वी असलेल्या शिधापात्रिकेतील नावे कमी केल्याचा तहीसलदार किंवा  रेशन दुकानदार यांचा दाखला.

3. अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 व 8अ चा उतारा.

4. पूर्वीची शिधापत्रिका असल्यास शिधापत्रिकेची छायांकित प्रत.

5. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.

6. कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री यांच्या नावे केलेला अर्ज ( स्वयंघोषणापत्रसह )

7. अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्री चे दोन फोटो, त्यावर अर्जदाराची सही करून जोडावे.

8. तलाठी / मंडळ अधिकारी यांचा अभिप्राय.

9. रहिवासी पुरावा (लाईट बिल/ पीटीआर/ भाडेपत्र/आधार कार्ड इत्यादी)

10. गॅसकार्डची छायांकित प्रत.


जिल्ह्यात माहे ऑक्टोबर 2020 साठीचे नियतन दिनांक 14 आॅगस्ट 2020 रोजी आॅनलाइन (Online) असलेल्या शिधापत्रिका व लाभार्थी संख्येनुसार मंजूर करण्यात आलेले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!