MB NEWS:सातबारा बदलला; ई-लोगोचा सात-बारा*



----------------------------------- 

*सातबारा बदलला; ई-लोगोचा सात-बारा*

----------------------------------- 


पुणे – जमिनीच्या मालकी हक्काशी संबधित महत्त्वाचा पुरावा असलेला सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात (7/12) बदल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आता, नागरिकांना नव्या स्वरुपातील सातबारा उतारा मिळणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आजची परिस्थिती लक्षात घेऊन सातबारा उताऱ्यामध्ये बदल करण्यात येत आहे. 50 वर्षानंतर पहिल्यांदाच सातबारा उताऱ्यामध्ये बदल होत आहे. नव्या स्वरुपात येणाऱ्या सातबारा उताऱ्यामध्ये शासनाचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क असणार आहे तसेच शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे.

राज्याच्या जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-व्रिकी करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहेत आणि घडत आहेत. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. यासाठीचा प्रस्ताव जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई-फेरफार प्रकल्प विभागाकडून राज्य शासनाकडे सादर केला होता.

 महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसुल विभागाचे अप्पर सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, महसुल विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप उपस्थित होते. या बैठकीमध्ये सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास मान्यता देण्यात आली.

वॉटरमार्क आणि ई लोगोचा वापर…

सातबारा उतारा हा वाचनास अधिक सोपा आणि सुटसुटीत व्हावा, यासाठी सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.ऑनलाइन सातबारा उताऱ्यामध्ये सुरक्षिततेसाठी वॉटरमार्क आणि ई महाभुमीचा लोगो वापरण्यात येणार आहे. नव्या स्वरुपातील ऑनलाइन सातबारा उताऱ्याची येत्या दोन दिवसात अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

असा असेल नवा सातबारा…

– आता गाव नमुना सातबारा व 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क असणार आहे.

– शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.

– शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार.

– बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे.

– क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12ची आवश्‍यकता नाही, अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.

– गावाचे नावासोबत एलजीडी कोड (लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे.

– लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.

– खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.

– मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता, कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे.

– नमुना 7 वर नोंदवलेले परंतु, निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.

– नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार *सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !