MB NEWS-कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना कराव्यात* *जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश*

 *कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाय योजना कराव्यात*



*जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालक मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश*


*नागरिकांनी मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे*


*जिल्ह्यास अधिक लस उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालकांना पालकमंत्र्यांच्या मोबाईल वरून थेट सूचना*



बीड,  दि. ३०::-कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.


कोरोना (Covid-19 ) आणि लसीकरणा बाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे पालक मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते बैठकीसाठी आमदार संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे , प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा , अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर , निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


पालक मंत्री धनंजय मुंडे म्हणाले , जगातील अनेक देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालेला आहे इंग्लंड मध्ये रुग्ण संख्येची वाढ 50 हजारापर्यंत गेली, तसेच अमेरिका इजराइल आधी देशांनी "नो मास्क" धोरण रद्द करून पुन्हा मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. ही स्थिती पाहता बीड जिल्ह्यातील परिस्थितीला पुन्हा नियंत्रणात राखण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी केली जावी.


मंत्रीमहोदय पुढे म्हणाले जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटे तील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधे ,इंजेक्शन्स , वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


*बीड जिल्ह्यासाठी अधिक लस उपलब्ध कराव्यात आरोग्य संचालक अर्चना पाटील यांना पालक मंत्री धनंजय मुंडेंच्या थेट सूचना*


बैठकीमध्ये आढाव्यादरम्यान जिल्ह्यात आठवड्यास 10 हजार लस उपलब्ध होत असल्याचे दिस दिसून आले. जिल्ह्याची क्षमता 1 लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लस उपलब्धतेचे प्रमाण वाढावे. यासाठी मंत्रीमहोदयांनी बैठकीतून थेट राज्याच्या आरोग्य संचालकांना दूरध्वनी करून सूचना दिल्या.


याच बरोबर लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार परळी -आष्टी आदी ठिकाणी सिटीस्कॅन नियंत्रणाची उपलब्धता, आष्टी सह ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन निर्मितीची व्यवस्था, शिरूर येथे सामाजिक समाज कल्याण हॉस्टेल मध्ये असलेल्या रुग्णालयात 100 बेड ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव करणे आणि तातडीने मंजुरी देणे बाबत संबंधित अधिकाऱ्यांना पालक मंत्री श्री मुंडे यांनी निर्देश दिले.


जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी नी जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय स्वरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि लोखंडी सावरगाव येथील महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत जिल्ह्याची 40 किलो लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय यासह कोवीड रुग्णालयांमध्ये अजून 91 किलोलिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमता प्रस्तावित करण्यात आली असून कोरोना तिसऱ्या लाटे साठी जिल्हा यंत्रणांना सुसज्ज केल्या जात आहेत असे सांगितले


मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार म्हणाले कोरोना डोक्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करताना पेडियाट्रिक डॉक्टर्स ची आवश्यकता कमतरता असल्याने इतर डॉक्टर्सना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे जिल्ह्य रुग्णालय आणि स्वाती वैद्यकीय महाविद्यालय येथे 100 बेडचे पेडियाट्रिक आयसीयू सज्ज ठेवण्यात आले आहे यासह 560 आय सी यू बेड विविध शासकीय रुग्णालयात सुसज्ज आहेत


आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य व सुरक्षा यंत्रणेवर ताण येत येतो याचा विचार करून पुढील काळात जवळ असलेल्या चौसाळा ,  राजुरी, चार्हाठा येथे 

कोरोना उपचारांसाठी ऑक्सीजन बेड को बीड सेंटर सुसज्ज केले जावे. जिल्हा रुग्णालयातील सिंगल स्लाईस सिटीस्कॅन यंत्रणाचे रूपांतर अत्याधुनिक केले जावे ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यात यावे असे सांगितले.


आमदार बाळासाहेब आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेडची आवश्यकता असून आष्टी येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तातडीने व्हावा, आणि व्हेंटिलेटर ची उपलब्धता व्हावी असे सांगितले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले . तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे , स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे आणि  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी माहिती सादर केली. बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे सभापती कल्याण आबुज तसेच  श्री शिवाजी शिरसाट उपस्थित होते. 

बीड जिल्हा जिल्ह्यातील जवळपास सात लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आले असून यापैकी दुसरा डोस दिलेले पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 63 हजार आहे आज  जिल्ह्यात 263, व्हेंटिलेटर 208 बायोपॅप मशीन आणि १०२० कॉन्सन्ट्रेट उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटे दरम्यान सर्वात जास्त 17000ॲक्टिव रूग्ण 1 ते 7 मे 2021 दरम्यान दिसून आले त्यावेळी २२०० बेडची आवश्यकता भासली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !