इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-⬛ *' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!* ● *परळी सकाळच्या थंडीने गारठली; दाट धुक्याने दृष्यमानता कमी* ●

  ⬛  *' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!*


● *परळी सकाळच्या थंडीने गारठली; दाट धुक्याने दृष्यमानता कमी* ●


छायाचित्रे: अनुपकुमार कुसुमकर


परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......

        गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि.१६)  शहरासह सर्वत्र थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती.एक प्रकारे " पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली " असा कवितेतील प्रत्यक्ष अनुभव परळीकरांनी अनुभवला.

         गेल्या चार पाच दिवसापासून  थंडीच्या लाटेने जनजीवन गारठले आहे. तापमानाचा पारा सरासरीने निच्चांकी येत खाली आला आहे. यासोबतच आज रविवारी सकाळच्या दाट धुक्यात परळी शहर हरवले. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. पहाटे पासूनच थंडीचा जोर सुरू झाला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अंगातील थंडी गेलेली नव्हती.कालही गारवा होता. आज तर पहाटेच्या वेळी धुक्यात शहर हरवल्या सारखे दिसत होते.धुक्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी होती. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या.थंडीत कुडकुडत बसावे लागत असल्याने अनेकांनी आपल्या रस्त्यालगत  शेकोट्या पेटविल्या होत्या.वैद्यनाथ मंदिर रोड,बस स्टँड , रेल्वे स्टेशन, अंबाजोगाई रोड, थर्मल काॅलनी, नेहरू चौक,टॉवर जवळील हॉटेलमध्ये दाट धुके, गुलाबी थंडीत गरमागरम  चहा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

@@@

 बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर होउ शकतो. परिणाम  .....!

    पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.

@@@

निराश वातावरणाची जाणीव....!

          अल्हाददायक वातावरण हे निसर्गाच्या बदलाने बदलते. आपल्याकडे नेहमी धुके पडत नाही त्यामुळे धुके पडल्याचे वेगळेपण अनुभवावयास मिळाले. परंतु सूर्यप्रकाशामुळे शरीराला डी जीवनसत्त्व मिळते. सूर्यप्रकाश हा मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेव्हा सूर्यदर्शन कमी होते आणि धुके पडते तेव्हा नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या नैराश्यात वाढ होते. एवढेच नाही तर वातावरणही थोडे निराश असते. त्यामुळे सामान्य व्यक्‍तीही थोडी निराशच असते असे मानसशास्त्रीय कारण प्रत्यक्ष स्वरुपात आजच्या दिवशी पहायला मिळाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या