MB NEWS- आषाढी एकादशीनिमित्त शामसुंदर महाराज सोन्नर यांचा विशेष लेख >अवघी दुमदुमली पंढरी.

••••••••••••••••••••••••••••

अवघी दुमदुमली पंढरी....

                ✍️- शामसुंदर महाराज सोन्नर

••••••••••••••••••••••••••••  बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल l

  करावा विठ्ठल जीवभावे ll

आषाढी वारीनिमित्ताने असे विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण भारून गेले आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी होणा-या या वर्षीच्या वारीत दुपटीने वारकरी पंढरपुरात  दाखल झाले आहे. एक अनुपम्य सूखसोहळा वारकरी अनुभवत आहेत.

----------------------------------------------------------



टाळी वाजवावी गुढी उभारावी l

वाट ती चालावी पंढरीची ll

असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपुरच्या यशीत पोहचले आहेत. वाखरीच्या घोड्याच्या गोलरिंगणाचा सोहळा पार पडला आहे. विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून  शीतळ, पाण्याहून पातळ कनवाळू भक्तजण प्रतिपाळक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद कळस पाहिल्या बरोबर वारक-यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारक-यांची  वारी सलग दुस-यांदा चुकली होती. त्यामुळे 

चुकलिया माय l बाळ हूरहुरा पाहे l 

अशी अवस्था वारक-यांची झाली होती.

इतर दैवत आणि त्यांचे भक्त यांच्यात आणि विठुराया आणि त्यांच्या भक्तात एक महत्वाचा फरक आहे. इतर दैवंताच्या भेटीसाठी केवळ भक्त व्याकुळ होतात. इथे मात्र जितके भक्त पाडुरंगाच्या भेटीसाठी उत्सूक असतात आणि विरहाने जितके व्याकूळ होतात तीच अवस्था तितकीच अस्वस्थता आणि उत्सूकता विठुरायाच्या मनात दिसते. 

पंढरपुरात पोहचे पर्यंत 

माहेराच्या मुळा लेकी असावली l

पाहतसे वाटूली माऊलीची ll

अशी अवस्था वारक-यांची असते. तर पंढरपूरातून परत निघाल्यानंतर

कन्या सासू-याशी जाय l

मागे परतोनी पाहेll

अशी व्याकुळता दिसते. ही वारक-यांची अवस्था आहे. यापेक्षा वेगळी अवस्था पाडुरंगाची नसते. वारकरी परत निघतात तेव्हा पाडुरंग किती कासावीस होतात याचे वर्णन नामदेव महाराज यांनी करून ठेवले आहे. वारकरी परत निघतात तेव्हा पाडुरंग म्हणतात पतितपावन म्हणून माझा डांगोरा आहे,  पण हे सगळं मोठेपण तुमच्यामुळे आहे.

पतित पावन मी तो आहे खरा l 

तुमचेनी बरा दिसतसें ll

आता आषाढी वारी संपवून तुम्ही गावाला निघालेले आहात पण माझ्या जिवाला मात्र हूरहूर लागलेली आहे.

तुम्ही जाता गावा हुरहूर माझ्या जीवा l भेटाल केधवा मज लागि ll

अशी व्याकुळता व्यक्त केल्यानंतरही वारकरी जेव्हा आपल्या गावाकडे निघतात तेव्हाची अवस्था नामदेव महाराज मांडतात- 

धावोनिया देव गळा घाली मिठी l स्फुन्दुन गोष्टी बोलतसे ll

 तिही त्रिभुवनी मज नाही कोणी l

 म्हणे चक्रपाणी नामयासी ll

भगवंताची ही अवस्था आहे तर वारकरी तितकेच पाडुरंगाच्या ओढीने व्याकूळ झालेले असतात. ऊन, वारा, पाऊस याचा मारा झेलत, सगळ्या शारीरिक, मानसिक, संसारिक व्यथा-वेदना विसरून पंढपुरात पोहताच

भाग गेला शीण गेला l 

अवघा झालासे आनंद l 

अशी अनुभूती त्याना येते. म्हणूनच  तुकाराम महाराज म्हणतात-

उदंड पाहिले  उदंड ऐकिले l

उदंड वर्णिले तीर्थ महिमे ll

ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर l

ऐसा विठेवर देव कोठे ll

 तुकाराम महाराज म्हणतात मी खूप तीर्थ पाहिली, खूप तीर्थाचे वर्णन ऐकले. पण अशी चंद्रभागा असा पाडुरंग आणि असे त्याचे भक्त कुठेच दिसले नाहीत. किंबहुना तुम्हाला कुणाला असे तीर्थक्षेत्र दिसले का? असे आव्हानच तुकाराम महाराज देतात. इतकेच नव्हे भाविकाला तुकाराम महाराज सल्ला देतात की बाबा तुला खरच सुखाची तळमळ असेल तर तू एकदा पंढरपूरला जा.

सुखालागी करीशी तळमळ l

तरी तू पंढरीशी जाय एक वेळ ll

महाराज सांगतात मग तुला केवळ सूख नाही मिळणार तर तूच सूखरूप होऊन जाशील, असा विश्वास महाराज देतात. काहीजण पंढरपूरला दक्षीणकाशी म्हणतात. पण तुकाराम महाराज केवळ काशीच नाही तर वारानसी म्हणजे काशी, गया, द्वारका ही सर्व तीर्थ ऐकत्र केली तरी  पंढरीची बरोबरी करू शकत नाहीत असे ठामपणे सांगतात. 

वारानसी गया l पाहिली द्वारका l

परी न ये तुका l पंढरीचा ll

किंबहुना एकट्या चंद्रभागेला नुसतं डोळ्यांनी पाहिले, तरी सर्व तीर्थ घडतात, असा विश्वास देताना तुकाराम म्हणतात- 

अवघीच तीर्थे घडली एव वेळा l

चंद्रभागा डोळा देखलिया ll

 इतकच नव्हे तर सर्वच संतांनी पंढरपूराला "भू वैकुंठ" असे म्टलेले आहे. निळोबाराय म्हणता -

चंद्रभागा वाळवंट l भूवैकुंठ पंढरी ll

आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर पाऊल ठेवणा-या माणसाची इच्छा असायची की वैकुंठाला गेले पाहिजे. पण निळोबाराय सांगतात चंद्रभागेचे वाळवंटच वैकुंठ आहे. 

निवृत्तीनाथ महाराज तर त्याही पुढे जाऊन सांगतात- 

पंढरपूर हेच एकमेव वैकुंठ आहे. इतर नुसता बोभाटा आहे.

एक पंढरी वैकुंठ l

येर अवघे बोभाट ll

आता हे पंढरपूर वैकुंठाच्या बरोबरीचे कसे काय झाले याचे उत्तर देताना एकनाथ महाराज सांगतात-

वैकुंठीचे वैभव पंढरीशी आले l

भक्ते साठविले पुंडलिके ll

अशा प्रकारे पुन्हा पुन्हा पंढरपुरालाच वैकुंठ म्हणून सिद्ध करण्याची किंबहुना वैकुठापेक्षाही पंढरपुराचे महत्व अधिक पटवून देण्याची धडपड संतानी का केली असेल? त्याचे कारण आहे, वैकुंठ आणि स्वर्ग या पारलौकीक सुखाची लालूच आणि नरकयातना आणि जन्ममृत्यूचा धाक दाखवून समाजाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. वारकरी संतांनी स्वर्ग आणि वैकुंठ या पारलौकीक सुखालाच तुछ ठरवून टाकले. त्यातूनही कुणाला वैकुंठाला जाण्याची इच्छा झालीच तर पंढरपूर हे वैकुंठच असल्याचे ठामपणे ठसविण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वैकुंठाला पर्याय पंढरपूर दिले.  एकाही वारकरी संतांनी भगवंताकडे स्वर्ग अथवा वैकुंठाला जाण्याची आपेक्षा केली नाही. नामदेव महाराज यांनी तर स्पष्ट शब्दांत वैकुंठ नाकारला. नव्हे त्याला तुछ ठरविले. नामदेव महाराज म्हणतात- 

वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी l

वास दे पंढरी सर्वकाळ ll

म्हणजे अनादी काळापासून जो वैकुंठाचा डोलारा उभा केलेला आहे त्याची थोरवी नामदेव महाराज एका झटक्यात उतरवून पंढरीत राहण्याचा हट्ट धरतात. नामदेव महाराज यांना विचारले की वारकरी संत परंपरेपूर्वी तर अध्यात्मिक वाटचाल करणाराला स्वर्ग आणि वैकुंठालाच जाण्याची इच्छा होती. आता तुम्ही मात्र तिकडे पाठवू नका असं म्हणता! असं का?

मग नामदेव महाराज सांगतात की जे वैकुंठाला जाऊ इच्छितात त्यांना तेथे काय आहे ते माहिती नसेल..... तिथल्या कल्पिलेल्या गोष्टींचा त्यांना मोह होत असेल. मग नामदेव महाराज यांना विचारले,  बरं जे वैकुंठाला जाऊ इच्छितात त्यांना तिथे काय आहे, हे माहीत नाही म्हणता मग तुम्हाला तरी वैकुंठाबद्दल माहिती आहे का? असे विचारले असता नामदेव महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात, हो मला माहिती आहे. वैकुंठ हे जुनाट जोपडी आहे. 

वैकुंठ खोपट जुनाट झोपडी l

तेथे आडाआडी घालू नको ll

वैकुंठ ही जुनाट झोपडी असल्याने त्याच्या विषयी आम्हाला कोणतेही आकर्षण नाही, असे सांगून ज्या वैकुंठाची लालूच दाखवून भोळ्याभाबड्या लोकांचे शोषण केले जात होते, त्या वैकुंठाला  तुच्छ लेखून त्याचे आकर्षण संपवून टाकण्यासाठी आम्हाला पंढरपूरातच ठेव असे सांगताना नामदेव महाराज 

वास दे पंढरी सर्व काळ l

वैकुंठा प्रमाणेच दुसरे स्वर्गाचे आकर्षण दाखविले जाते. इथे जीवंतपणी सर्व सुखाचा त्याग केला तर स्वर्गात उच्च भोगभोगायला मिळतात असे वर्णन केले जायचे. त्याला तुकाराम महाराज मोठा धक्का देतात. तुकाराम महाराज सांगतात स्वर्गात जे अमर होऊन राहिले आहेत ते तिथे कंटाळले असून मृत्यूलोकांत येण्याची इच्छा आता ते  व्यक्त करू लागले आहेत. 

स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा l

मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा ll

म्हणजे पारलौकीक सुखाचा जो डोलारा निर्माण केला होता, त्याला सहज धक्का देऊन त्याचे आकर्षण कमी करून सुधारणावादाची रुजवात संतानी केल्याचे आपल्याला पहायला मिळते.

मी अशी कीर्तनातून मांडणी करू लागतो  तेव्हा काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही हिंदू असून आपल्याच स्वर्ग-वैकुंठाबद्दल तुछतेची भावना समाजात निर्माण करता. असा एक तरी इतर धर्मातला माणूस आहे का? जो आपल्या धर्मातील पारलौकीक सुखाबद्दल तुछ भावना निर्माण करतो. तेव्हा मी असे विचारणाराला सांगत असतो की, एक तर वैकुंठ आणि स्वर्गाला मी नव्हे तर संतांनी तुछ लेखलेले आहे. आणि इतर धर्मातील पारलौकीक सुखाला त्या धर्मातील लोक कमी लेखतात का? असं एक तरी उदाहरण आहे का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,  कोणत्याही धर्मातील खरे विचावंत आपल्या धर्माची चिकित्सा करतात.

एक खरे आहे की, जवळपास सर्वच धर्मात पारलौकीक सुखाच्या संकल्पना रंगविल्या आहेत आणि त्या पारलौकीक सुखाची लालूच दाखवून त्या त्या धर्माचे ठेकेदार सामान्य भाविकांची दिशाभूल करतात. आज मुसलमान धर्मात जे धर्मांध तरुण इस्लामच्या नावाखाली आत्मघातकी अतिरेकी कारवायामध्ये सहभागी व्हायला तयार होतात, त्यांच्याही मनावर बिंबविलेले असते की, इथे जर तुम्ही धर्मासाठी मेलात तर तुम्हाला जन्नतमध्ये जागा मिळेल. काय असंत जन्नत आणि स्वर्गामध्ये? जन्नतमध्ये असतात "हूर". हूर म्हणजे अत्यंत देखण्या तरुणी. आणि स्वर्गात काय असत? अपसरा! म्हणजे काय तर देखण्या स्रीयाच! म्हणजे  इथे जीव द्यायचा आणि परलोकात भोग भोगायचे. पण सर्वच धर्मातील चिकित्सक लोक अशा पारलौकीक सुखाचा फोलपणा उघडा करतात. आमचे नामदेव महाराज जसे वैकुंठाला झोपडी म्हणतात, तसेच इस्लाममधील जन्नत बद्दल मुस्लीम धर्मातील प्रसिद्ध शायर गालिब म्हणतात- 

हमे मालूम है जन्नत की हकीकत क्या है l

दिल बहलानेके दिये गालिब ये खयाल अच्छा है l

गालिब म्हणतात जन्नतमध्ये काय आहे,  हे आम्हाला चागलं माहिती आहे. पण मनाच्या समाधासाठी ते सर्व ठीक आहे. 

म्हणजे पारलौकीक सुखाची आशा दाखवून जे समाजाचे शोषण  होत होते त्याला तुच्छ लेखून संतांनी वैकुंठाला पंढपूर हा पर्याय देऊन टाकला.

वैकुंठ आणि स्वर्गसुखाबरोबर मोक्ष आणि मुक्तीची लालूच दाखविली जात होती. तो मोक्ष मिळविण्यासाठीही अत्यंत कडक अशी कर्मकांडे सांगितलेलीहोती. तप साधना सागितलेली होती. मात्र वारकरी संतांनी मोक्ष मिळविण्यासाठी सुद्धा इतर कर्मकांडाची गरज नाही,  तर नुसतं पंढरपूरात येऊन सावळ्या विठूरायाच्या मंदिराचा नुसता कळस पाहिला तरी मोक्ष मिळेल, असा विश्वास तुकाराम महाराज यांनी  दिला आहे.

तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस l

तात्काळ हा नाश अहंकाराचा ll

अन्य ठिकाणी तर मोक्षालाही तुच्छ करून टाकलेले आहे. या भक्ती सुखाच्या आनंदासाठी आम्ही मोक्षपद तुच्छ करून टाकले आहे. किंबहुना पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा कोणताही धाक आम्हाला नाही हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-

मोक्षपद तुच्छ केले या कारणे l

आम्हा जन्म घेणे युगायुगी ll

मोक्षाची लालूच दाखविली जात असतानाच जन्म-मृत्यूच्या  फे-याचे खूप मोठे दु:ख आहे, असे सांगून  त्यातून सुटका करून घेण्यासाठी वेगवेगळी कर्मकांडे सांगितलेली आहेत. पण वारकरी संतांनी जन्म मृत्यूचे भयही झुगारून दिले. आम्ही युगयुगे जन्म घेऊ, असे सांगून तुकाराम महाराज  त्या धाकातून लोकांची मुक्तता करतात. त्यासाठी कितीही वेळा आपल्याला सुखाने गर्भवासाला घालावे, आपण त्याला घाबरत नाही, असे महाराज म्हणतात-

तुका म्हणे गर्भवासी l

सुखे घालावे आम्हाशी ll

या गर्भवासाचे भय धरणार नाही, त्यातून मुक्त करावे, अशी याचना करणार नाही, असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-

न ये काकुळती गर्भवासासाठी l

न धरी हे पोटी भय काही ll

अशा त-हेणे मोक्षाचे आकर्षण आणि गर्भवासाच्या कथित दु:खाचे भय वारकरी संत झुगारून देतात. त्यानंतर लालूच असते ती मुक्तीची! पण पंढरीचे वारकरी कधी मुक्तीची अपेक्षा करीत नाहीत. त्यातून कुणाला मुक्तीची अपेक्षा असलीच आणि तो कितीही पापी असला, कोणत्याही जातीचा असला तरी त्याने केवळ विठ्ठल मूर्ती पाहिली तर तो मुक्त होतो, असे एकनाथ महाराज सागतात-

हीन दीन पापी होतुका भलते याती l

पाहता विठ्ठल मूर्ती मुक्त होती ll

 थोडक्यात काय तर वैकुंठ, स्वर्ग, मोक्ष, मुक्ती या सर्व गोष्टीसाठी पंढरपूर हाच सोपा पर्याय दिला.

 पंढरपूर या भूवैकुंठाची वारी ही समता, स्वातंत्र्य बंधुत्व या मानवी मूल्यांची पाय वाट ठरत आहे. केवळ वारीत दिसणारा हा बंधुभाव, विवेकी विचार, चारित्र्यसंपन्नता ख-या अर्थाने समाजामध्ये रुजेल, तेव्हा संतांनी पाहिलेले आनंदी समाजाचे स्वप्न साकार झाले, असे म्हणता येईल. तो दिवस यावा यासाठी सतत संत विचारांचा जागर करुया!



         ✍️

ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर

          ✍️

संपर्क सूत्र: 98926 73047



###############################

  ■ लेखक ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, व्याख्याते म्हणून ओळखले जातात. त्यांची चिंतनपर पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. पत्रकार, कवी म्हणूनही त्यांची ख्याती आहे.

                                                 -संपादक

###############################


🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:*दुर्दैवी! अंबाजोगाई येथील विद्यार्थ्याचा सोलापूरच्या तलावात बुडून मृत्यू*

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन

Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला