MB NEWS-ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

 ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन




पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्‍यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांकडून हळहळ व्यक्‍त केली जात आहे.



पीटीआयच्या वृत्‍तानुसार, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्‍या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्‍यांची प्रकृती खालावली होती. यानंतर  (दि.२३) रात्रीपासून त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल होतं होते. पण ती एक अफवा होती. सोशल मीडियावर विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज आणि फोटो व्हायरलं होतं होते. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.
                विक्रम गोखले यांचं पार्थिव ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 




अभिनयाची एक खासियत

विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक खास चाहता वर्ग निर्माण केला हेता. त्यांच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची एक खासियत होती. विक्रम गोखले यांच्या डोळ्यांतून त्यांचा अभिनय आणि व्यक्तीरेखा व्यक्त व्हायच्या. त्यांचा अभिनय करताना डोळे किती बोलके असायला हवे, याचा मोठा अभ्यास त्यांना होता. विक्रम गोखले यांनी मराठी-हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.


त्याचबरोबर विविध मालिका, नाटक यातही काम केलं आहे. नटसम्राट, थोडं तुझं थोडं माझं, कळत नकळत, दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात या सुखानों या, एबी आणि सीडी हे मराठी चित्रपट त्यांचे खूप गाजले. तर इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म, स्वर्ग नरक या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. अलिकडच्या काही दिवसात त्यांनी वेबसिरीजमधूनही अभिनय केला.  सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, उडान, क्षितिज ये संजीवनी, जीवन साथी या वेबसिरीज खूप गाजल्या.






विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय.
जन्म. ३० ऑक्टोबर १९४५
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक होते
विक्रम गोखले!


विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले होते. तसेच रंगभूमीवर पण त्यांनी एक मोठा काळ गाजवला.
पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले.
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार होते. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना विजया बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.


विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. 



त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत.


अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. २०१० मध्ये त्यांनी #आघात या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या #अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला आहे. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत असत. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोश, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं.


सध्या विक्रम गोखले 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका 'अग्निहोत्र' विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.



हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केले होते.
 दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला होता. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. 


कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यांनी काही काळा पुर्वीदोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे.



विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला होता. वडिल चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
२०१६ मध्ये राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे विक्रम गोखले यांना ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.
 विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

*विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके.*
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला,कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर,छुपे रुस्तम,जावई माझा भला, दुसरा सामना,नकळत सारे घडले,पुत्र मानवाचा,बॅरिस्टर,मकरंद राजाध्यक्ष,महासागर,मी माझ्या मुलांचा,संकेत मीलनाचा,समोरच्या घरात,सरगम,स्वामी.
*विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट.*
मॅरेथॉन जिंदगी,आघात (२०१० दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट),आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी,कळत नकळत,ज्योतिबाचा नवस,दरोडेखोर,दुसरी गोष्ट,दे दणादण,नटसम्राट,भिंगरी,महानंदा,माहेरची साडी,लपंडाव,वजीर,वऱ्हाडी आणि वाजंत्री,वासुदेव बळवंत फडके,सिद्धान्त.
दूरचित्रवाणी मालिका
अकबर बिरबल (दूरदर्शन - १९९०),अग्निहोत्र (स्टार प्रवाह),अल्पविराम, उडान ( दूरदर्शन - १९९०-९१),कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन)
जीवनसाथी,द्विधाता,मेरा नाम करेगा रोशन,या सुखांनो या (झी मराठी),विरुद्ध,संजीवनी (२००२),सिंहासन (२०१३).






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !