MB NEWS-● २ डिसेंबर @ : हे आहेत आजचे दिनविशेष

 ● २ डिसेंबर @ : हे आहेत आजचे दिनविशेष

@ जागतिक संगणक साक्षरता दिन
@ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन
@जागतिक गुलागिरी मुक्तता दिन
@संयुक्त अरब अमिराती स्थापना दिन
@'कूली' चित्रपट प्रदर्शित







⭕आज जागतिक संगणक साक्षरता दिन!

हा दिवस जागरूकता वाढविणे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी साजरा केला जातो.
आजच्या पिढीतील संगणक खूप महत्वाची भूमिका बजावते. जगातील सर्वात मोठ्या समस्यांवर संशोधन करण्यासाठी अगदी लहान गणिती समस्या सोडविण्या पासून, संगणक सर्व काही करते.
गेल्या १९ वर्षा पासून
'जागतिक संगणक साक्षरता दिवस' साजरा केला जातो आहे. जगाला डिजिटलीकरण महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस विशेषतः घोषित केला जातो आणि साजरा केला जातो.
संगणकाविषयी आणि त्याच्या वापराबद्दल लोकांना साक्षर करणे महत्वाचे आहे.

२००१ साला पासून जागतिक संगणक साक्षरता दिन २ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
त्या कालावधीत आधीच संगणकाचा वापर जगभर पसरत होता.
तथापी, सर्वच देशांमध्ये संगणक किंवा इंटरनेटचा प्रवेश नव्हता. अशा क्षेत्रांमध्ये विविध देशांमध्ये जवळीक येणे, विभागांमधील अंतर कमी करणे, संगणक ओळख नसलेल्यांना संगणक साक्षर करणे अशी हा दिवस साजरा करण्यामागे उद्दिष्टे आहेत. या दिवशी अनेक देश आणि संस्था किंवा शाळा संगणक वापर आणि अशा प्रकारच्या शिक्षणासाठी मोफत संगणक अभ्यासक्रम व मूलभूत ज्ञान प्रदान करतात.





⭕आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन !

दरवर्षी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा विशेषत: संवेदनशील भारतीयांसाठी एका विचित्र मानसिक अवस्थेत जातो.
कारण १९८४ साली याच आठवड्याच्या सुरुवातीला
२ डिसेंबरच्या मध्यरात्रीला मानवी हलगर्जीपणामुळे भोपाळ येथे विषारी वायूची गळती झाल्यामुळे हवा प्रचंड प्रमाणात प्रदूषित होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि ३६ वर्षांनंतरही त्याचे दुष्परिणाम तेथील जनता, जन्माला येणारी मुले भोगत आहेत.
या घटनेच्या दु:खद स्मृतींना उजाळा देत असताना सर्वसामान्य नागरिकांना प्रदूषणाच्या समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी,
तसेच अशा आपत्तीप्रसंगी काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात व्यापक जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २ डिसेंबर हा
‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने, पृथ्वीवर मनुष्य प्रजातीचा उदय आणि विकास होत असताना मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रदूषित होण्यास नेमकी कधी व कशी सुरुवात झाली यासाठी इतिहासात डोकावून थोडक्यात घेतलेला हा आढावा.

काही अभ्यासकांच्या मते, मानवाने १२ हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात केली, तेव्हापासूनच पर्यावरण प्रदूषण आणि विशेषत: हवामान बदलाची सुरुवात झाली असावी.
परंतु दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशातील क्वेन्मारी या हिमनगाच्या खोल अंतरंगातील बर्फाचे नमुने तपासले असता, शास्त्रज्ञांना त्यात बिस्मथ आणि शिसे यांचे कण मोठ्या प्रमाणात आढळले.
हे नमुने साधारण १४ व्या शतकातील असल्याचे सिद्ध झाले.
त्या काळात तिथे इन्का साम्राज्य होते आणि त्यांनी खनिकर्म उद्योग सुरू केला होता.
पुढे हे साम्राज्य स्पेनच्या राजाने ताब्यात घेतले आणि या खाणीं मधून चांदी व इतर धातू मिळवायला सुरुवात केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे प्रदूषण होण्यास तेव्हापासून सुरुवात झाली असे मानले जाते.

पुढे १८ व्या शतकात झालेले औद्योगिकीकरण,
त्या अनुषंगाने वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि अफाट वेगाने होणारे शहरीकरण हे घटक प्रदूषणाची समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरले.
गेल्या दोन शतका मध्ये रासायनिक उत्पादने करणारे कारखाने प्रचंड प्रमाणात विकसित झाले आणि उत्पादन प्रक्रिये दरम्यान निर्माण होत असलेले विविध प्रकारचे विषारी वायू, रसायने व अपघटके कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता हवेत अथवा स्थानिक जलप्रवाहात सोडली जाऊ लागली.
तेव्हापासून हवेच्या, पाण्याच्या आणि मातीच्या प्रदूषणात निरंतरपणे वाढ होत राहिली आहे.
एकूणच जगातील प्रदूषणा बरोबरच सर्व प्रकारच्या पर्यावरणीय समस्या औद्योगिक क्रांती पासून सुरू झाल्या आणि कालांतराने प्रमाणाबाहेर वाढल्या.





⭕आज जागतिक गुलागिरी मुक्तता दिन !

२ डिसेंबर हा दिवस
'जागतिक गुलागिरी मुक्तता दिन' म्हणून साजरा केला जातो. गुलामगिरीच्या समाप्तीसाठी हा आंतरराष्ट्रीय दिवस संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे आयोजित केला आहे.
१९८६ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला.
१८ डिसेंबर १९४९ च्या ५७/१९५ 'मसुदा गुलामगिरी आणि त्याचे उच्चाटन' यांच्या विरोधात झालेल्या संघर्षांचे स्मरणोत्सव २००४ साली विधानसभाने जाहीर केले.





संयुक्त अरब अमिराती स्थापना दिन

स्थापना - २ डिसेंबर १९७१

संयुक्त अरब अमिराती (U.A.E.) ची स्थापना २ डिसेंबर १९७१ रोजी करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले.
रस अल-खैमा १९७२ मध्ये त्यात सामील झाले.
१६व्या शतकाच्या सुरुवातीस येथे पोर्तुगिजांचा शिरकाव झाला. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे प्रवेश केला.
१८२० मध्ये ब्रिटिशांनी येथील राजांशी शांतता करार केला. १८५३ पासून ब्रिटिशांनीच येथील कारभार चालवला तरी त्यांना संपूर्ण सत्ता कधीच मिळाली नाही.

१९७१ मध्ये येथील शेख यांनी ब्रिटिश बरोबरचा करार रद्द केला व सहा सदस्यीय समिती स्थापन केली.
१९९१ मध्ये अमिरातिने इराक विरुध्दच्या युध्दात संयुक्त फौजांना मदत केली.
संयुक्त अरब अमिरातीची लोकसंख्या आज एक कोटीच्या आसपास आहे.
तीस वर्षा पूर्वी हीच लोकसंख्या केवळ वीस लाख होती. तेलसाठ्याच्या बाबतीत संयुक्त अरब अमिराती हा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे. त्याची अर्थव्यवस्था मध्य पूर्व आशियातील सर्वात विकसित अर्थव्यवस्थे पैकी एक आहे.




'कूली' चित्रपट प्रदर्शित

आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचें संगीत व शब्बीरकुमार यांचा सुरेल आवाज ज्या गाण्याला लाभला तो 'कूली' चित्रपट
२ डिसेंबर १९८३ रोजी प्रदर्शित झाला.
हा अमिताभ यांचा ६८ वा चित्रपट होता.
'कूली' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान २६ जुलै १९८२ रोजी अमिताभ यांना अपघात झाला व ते कोमा मध्ये गेले होते.
तेंव्हा सर्व धर्मीय लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली व अमिताभ बच्चन यांचा नवजीवन लाभले.
म्हणून दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचा शेवट बदलून अमिताभ यांना चित्रपटाच्या शेवटी सर्व लोकांचे आभार मानायला लावले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !