MB NEWS:गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?

 गारपीट ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?





● गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते .


● आता तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे विशेषच आहे. त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.


● गारा पडण्याचे दोन कारणे आहे.

1) हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी 

2) हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं.

 अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.


● बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे.


● वारे येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात.


● हे वारे फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. 


● त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात.  हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते.


● ती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. 


● ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.


हवामान अभ्यासक पंजाबराव डख आपल्या गावरान भाषेत सांगत असतात..

गारपीट ही जास्त प्रमाणात डोंगरी भागात किंवा तलावाच्या , धरणाच्या परिसरात होण्याची शक्यता असते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !