MB NEWS:मराठवाडा मुक्तीसंग्रामातील चळवळीचे केंद्र असणारे लातुरातील श्री बलभीम वाचनालय

 मराठवाडा मुक्तीसंग्रामातील चळवळीचे केंद्र असणारे लातुरातील श्री बलभीम वाचनालय





लातूर, दि.२३ (अभय मिरजकर) - मराठवाडा मुक्तीसंग्रामातील लातुरामधील चळवळीचे एक प्रमुख केंद्र म्हणजे श्री बलभीम वाचनालय होय. व्यायामशाळा आणि वाचनालय सुरू करण्याचे ठरवले गेले. हैद्राबाद संस्थानामध्ये पोलीस अ‍ॅक्शन झाली आणि त्यानंतर जागा कमी पडू लागली म्हणून व्यामशाळा बंद करण्यात आली. स्वातंत्र्याचा उद्देश पूर्ण झाल्यामुळेही कदाचीत व्यायामशाळा बंद करून केवळ वाचनालय सुरू राहिले. राजकीय, सामाजिक, साहित्यीक, कला अशा सर्व अर्थांनी चळवळीसाठी कार्यरत असणारे केंद्र म्हणजे श्री बलभीम वाचनालय होय.

१०० व्या वर्षाकडे वाटचाल सुरू असणार्‍या श्री बलभीम वाचनालयाची स्थापना ३ फेब्रुवारी १९३० मध्ये करण्यात आली. तर प्रत्यक्षात उद्घाटन १९३२ मध्ये करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून दिली ती राजा नारायणलाल लाहोटी यांनी. जिल्हा ‘अ’ दर्जा असणारे हे  एकमेव ग्रंथालय आहे.

५०० पेक्षा अधिक सभासद संख्या आणि ७२ हजारापेक्षा अधिक असणारी ग्रंथसंपदा हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य आहे. दररोज किमान २०० पेक्षा अधिक वाचक या ग्रंथालयात वाचनासाठी येतात. सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ८ ही या वाचनालयाची वेळ आहे. सहा कर्मचारी या ग्रंथालयाच्या कार्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यात येणारी सर्व दैनिके, प्रमुख सर्व साप्ताहिके, मासिके या ठिकाणी वाचनासाठी उपलब्ध आहेत. मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी ग्रंथसंपदाही या ठिकाणी उपलब्ध आहे.

लातूरमधील सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे काम या श्री बलभीम वाचनालयाने केलेले आहे. साधे वर्तमानपत्र वाचणार्‍यांवरही कडक नजर ठेवली जायची असा तो स्थापनेचा काळ असताना लातूरातील युवकांनी धाडस करून वाचनालयाची उभारणी केली. हेच कार्य धाडसी आणि कर्तत्वाचे होते. स्वातंत्र्य संग्रामामध्ये वाचनालयेच चळवळीची केंद्रे होती. लातुरातील श्री बलभीम वाचनालयही त्यास अपवाद नव्हते. त्यामुळे याचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या हस्ते करण्यात आले होते. वैâ. नारायणराव औसेकर वकील यांच्या नेतृत्वाखाली श्री बलभीम वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यासाठी वैâ. वैद्य, वैâ. आयाचित, वैâ. पाठक आणि इतरांनी सहभाग घेतलेला होता. तर वैâ. दिनानाथ सावे यांनी वाचनालयाची इमारत बांधून दिलेली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, राघवेंद्र दिवाण, देविसिंग चौव्हाण यांच्यासह अनेकांच्या सततच्या वावरामुळे हे राजकीय आणि सामाजिक चळवळीचे केंद्र बनलेले होते.

हैद्राबाद संस्थानामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य करणार्‍या केवळ मोजक्याच संस्था होत्या त्यामध्ये श्री बलभीम वाचनालयाचा समावेश होता. त्यामुळे रझाकारांची पहिली नजर येथील व्यायामशाळा आणि वाचनालयावर होती. निजामी वरवंटा या व्यायामशाळेवर आणि वाचनालयावरही फिरला. व्यायामशाळेची नासधूस करण्यात आली, साहित्य पळवण्यात आले, पुस्तके जाळण्यात आली. टेबल, खुर्ची, पुस्तके पळवण्यात आली. या सर्व संकटांवर मात करूनही श्री बलभीम वाचनालय नंतरच्या काळातही सुरूच राहिले.

स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ,  देवीसिंह चव्हाण, दिगंबरराव शिवणगीकर यांच्यासह नंतरच्या काळात शिवराज पाटील चाकूरकर, बापूसाहेब काळदाते, माणिकराव सोनवणे, राजा म्हैसकर, राजाभाऊ उदगीरकर, शामराव अपसिंगेकर, डॉ. अलूरकर, डॉ.ग.भा. पटवर्धन, विलासराव देशमुख, राजा नारायणलाल लाहोटी, भाऊसाहेब सावे, चंद्रशेखर बाजपाई, विष्णूपंत पांडे, किसनराव आयाचित, रामभाऊ डोंगरे, वसंतराव गोविंदपूरकर, देवीदासराव जमदाडे, वसंतराव भोयरेकर, त्रिंबकराव नाईक, पां.गं. पटवर्धन प्रदिप राठी, विष्णूदास भूतडा, जी.एस. पाटील, चंद्रकांत देऊळगावकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतलेला आहे. सध्या या वाचनालयाचे अध्यक्ष रमेश बियाणी, सचिव सुर्यकांत वैद्य, कोषाध्यक्ष विश्वनाथ होळकुंदे आणि त्यांचे सोबती येथील कारभार पाहात आहेत.

वाचनालयाच्या इमारतीसाठी अनेक खटपटी करण्यात आलेल्या आहेत. गोविंद स्वामी आफळे यांची किर्तने तिकीट लाऊन आयोजीत करण्यात आलेली होती. हिंदी, मराठी चित्रपटांच्या माध्यमातूनही पैसे उभा करण्यात आले. बँकेकडून कर्ज घेऊन त्या जागेत कांही वर्षांसाठी बँकेची शाखा सुरू करण्यात आली व त्याच्या भाड्यामधून कर्जाचा भरणा करण्यात आला.

श्री बलभीम वाचनालयाच्या वतीने शारदोत्सवाचे आयोजनही लातूरकरांसाठी साहित्यीक आणि सांस्कृतीक मेजवाणी होती. राज्यातील अनेक प्रमुख मान्यवर याठिकाणी व्याख्यानासाठी येऊन गेलेले आहेत. वत्तृâत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य वाचन, गायन, नाट्य स्पर्धा अशी मेजवाणी लातूरकरांना श्री बलभीम वाचनालयाच्या माध्यमातून मिळालेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !