युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:व्हायरल माहिती खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत

 व्हायरल माहिती खरी की खोटी?; जाणून घ्या 'फॅक्ट चेक' करण्याची सोपी पद्धत




  सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. त्यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खोटे किंवा चुकीचे मेसेजेस व्हायरल होणं. आपल्यालाही इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप (WhatsApp) अशा सोशल मीडियावर (Social Media) दिवसभरात अनेक फॉरवर्डेड मेसेजेस (Forwarded Messages) येत असतात. काही जण त्याकडे लक्षही बघत नाहीत. तर, काहीजण ते मेसेजेस वाचतात आणि त्यातल्या मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करताच मेसेज पुढे पाठवून देतात. असं अनेक लोकांनी केलं, की ते मेसेजेस आपोआपच व्हायरल होतात.


काहीवेळा अशा मेसेजेमधली माहिती चुकीची असली, तरी निरुपद्रवी असते; मात्र अनेकदा कोणत्या तरी समाजाच्या भावना दुखावणारे, नोकर भरतीबद्दल चुकीची माहिती सांगणारे, फसव्या योजनांच्या जाळ्यात ओढून घेणारे किंवा अशीच काहीबाही माहिती देणारे मेसेजेसही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवत असतात. हे लक्षात घेऊन सर्व युझर्सनी आपल्याला आलेले मेसेजेस खरे असल्याची खात्री पटल्याशिवाय कोणालाही पाठवू नयेत, असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र, हे मेसेजेस खरे आहेत की नाही, हे ओळखायचं कसं?


व्हॉट्सअॅपच्या वेबसाइटवर FAQ दिलेले आहेत. त्यातून आपल्याला फेक न्यूज कशा ओळखायच्या याबद्दलच्या टिप्स मिळतात. त्याशिवाय आता भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोनेही (Press Information Bureau) फॅक्ट चेकचं (PIB Fact Check) टूल सादर केलं आहे. त्याच्या सहाय्यानं नागरिकांना आपल्याला आलेल्या मेसेजेस, बातम्या आदींची सत्यता पडताळता येते. आपल्याकडे आलेली माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेकसाठी पाठवल्यानंतर आपल्याला ती माहिती खरी आहे की खोटी याबद्दल नेमकी माहिती कळवली जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या