प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लाॅग: "बालाघाटातील स्वर लेणं : संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे"

 "बालाघाटातील स्वर लेणं : संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे"

"हळव्या मनाचा अत्यंत संवेदनशील माणूस, माणसांचे मधुकण गोळा करणारा अवलिया,प्रतिभासंपन्न गायक,विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख निर्माण करणारे उपक्रमशील शिक्षक अर्थातच बालाघाटातील स्वर लेणं  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे .......!"

"संगीतात सूर, ताल आणि लय मिसळण्याची कला करणारे अनेक असतात. पण प्रा.शंकर सिनगारे  म्हणजे माणुसकीचे गाणे गुणगुणत चैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या गायकी मध्ये स्वरांची  नजाकत फार सुंदरतेने दिसते.

"कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासून...

माझे गीत तुला तेथेही काढील शोधून !"

माणुसकीचे भान जपणारे  गझलकार सुरेश भट यांच्या ओळींची आर्तता प्रा. शंकर सिनगारे यांच्या गायनात आढळते. प्रा.शंकर सिनगारे  "गायन अलंकार"  पदवीने सन्मानित असून प्रख्यात संगीत गुरू आदरणीय पंडित शिवदासजी देगलूरकर गुरुजी  यांचे शिष्य आणि "ह.भ.प. दशरथ महाराज सिनगारे" बर्दापूरकर यांचे सुपुत्र आहेत. प्रा.शंकर सिनगारे यांना संगीत क्षेत्रातील गायन अलंकार या विशेष पदवीने गौरविण्यात आले आहे.अंबाजोगाई येथील "जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माधयमिक विद्यालयातील" उपक्रमशील शिक्षक प्रा.शंकर सिनगारे यांनी संगीत क्षेत्रातील ही मानाची पदवी ग्रहण केली आहे.

स्वच्छ नितळ मनाचा  माणूस संगीत विशारद,गायन अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांना त्यांचे वडील हभप दशरथ महाराज बर्दापूरकर यांच्या कडून हा सांगीतिक वारसा लाभला आहे. संगीत शिक्षक श्री. एस. डी. पांचाळ गुरुजींनी त्यांना संगीताचे प्राथमिक धडे दिले. पुढे अंबाजोगाई येथील प्रख्यात संगीत गुरू पंडित शिवदासजी देगलूरकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण घेतले.

प्रा. सिनगारे यांनी एम. ए. संगीत पदव्युत्तर पदवी पूर्ण करून संगीत विषयात "नेट" पदवी प्राप्त केली आहे.  अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत गायन अलंकार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व पंडित शिवदास देगलूरकर गुरुजींकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. आजही त्यांचे मार्गदर्शन शंकर सिनगारे यांना लाभते आहे.

            समस्त सिनगारे परिवार हा कलेचा समृद्ध वारसा लाभलेला परिवार आहे. संगीत क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवुन कलेची साधना करत सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी होणारे हे कुटुंब आहे.

दि. ६ मे २०२३ रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, नवी मुंबई आयोजित "दीक्षांत व  पुरस्कार वितरण समारोह" आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष "माननीय श्री. बालासाहेब सूर्यवंशी "तर प्रमुख पाहुण्या म्हणून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद "च्या कुलगुरू डॉ.अमी उपाध्याय" या होत्या. त्याचबरोबर मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री. देवेंद्रजी कुलकर्णी, मंडळाचे सचिव माननीय श्री. किशोर देशमुख सर ,मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सुनील उकीरे सर,मंडळाचे प्रबंध परिषद सहाय्यक माननीय श्री. ॲड. खर्चे साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते आमचे सन्मित्र प्रा.शंकर सिनगारे यांना "गायनअलंकार" ही पदवी देऊन गौरविण्यात आले....!

सदरील पदवी प्रदान समारंभाचे आयोजन "अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, नवी मुंबई "च्या वतीने भव्य दिव्य असे केले होते .सर्व काह व्यवस्थितपणे,

नियोजित, सुसंगतपणे , आणि दर्जेदार केलेले होते.प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनपर मनोगताने वातावरण मंत्रमुग्ध झाले  होते. शब्द-सुर एकत्र येऊन सभागृह भावविभोर झालेले होते. 

कलावंतांची निर्मिती म्हणजे अनुभूती व माणूस यांच्यातील दुवा होय.  अनुभूती ही एखाद्या वायुलहरी प्रमाणे तरल व चंचल असते. तिला दृश्य व रम्य कलाकृतीच्या स्वरूपात बद्ध करून तिच्याद्वारा मानवाला पूण:प्रत्ययाचा  आनंद देण्याचे काम कलावंत करतो. त्यामुळे  काहीकाळ पर्यंत ती अनुभूती सामान्य माणसाला मिळू शकते. एखाद्या गायकाने जीव ओतून सादर केलेली बंदिश रसिक प्रेक्षकाला जीवंत अनुभूती मिळवून देते. त्यातच आपण आनंदाच्या शिखरावर लगेच पोचतो. कलावंत नसता तर हा आनंद आपल्याला कुठून मिळाला असता.महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त  सौ. दीपा स्वामी आणि श्री. दिलीप स्वामी यांच्या स्नेहमयी-सहकार्याने त्यांची ही वाटचाल सुरू आहे.स्वामी परिवाराच्या संस्कारात जडण-घडण झालेले प्रा. शंकर सिनगारे अत्यंत विनयशील आहेत. प्रा.शंकर सिनगारे  यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंजुश्री शंकर सिनगारे यांची मोलाची साथ त्यांना लाभली आहे."सुरमयी आणि श्रीमयी या दोन कलावंत कन्या त्यांच्या संसार वेलीवर फुलल्या आहेत.स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर शाळेत"अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमात सुरमयीस तृतीय क्रमांक प्राप्त झाला."श्रीमयी ची शाळा बालक संस्कार मंदिर, अंबाजोगाई येथे वार्षिक स्नेहसंमेलनात श्रीमयीस बक्षीस मिळाले व आमच्या वहिनी प्रा.शंकर सिनगारे यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंजुश्री शंकर सिनगारे यांनी सादर केलेल्या "जागतिक महिला दिनानिमित्त" सादर केलेल्या कलाविष्कारास पारितोषिक मिळाले.मायेचा निर्मळ झरा आई पद्मिनीबाई  आणि सात्विक जीवन जगणारे वडील हभप दशरथ महाराज सिनगारे  यांनी हे संगीतरत्न घडविले आहे.उषाताई आरसुडे यांचा जिव्हाळा त्यांना लाभला आहे.दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या त्यांच्या  भगिनी  सारिका सिनगारे स्पेशल एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत.लहान बंधू पखवाज वादक ओमप्रकाश सिनगारे  यांचेही सांप्रदायिक क्षेत्रात योगदान आहे. अशा या कलावंत परिवाराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..!

आम्ही सन्मित्र प्रा.शंकर सिनगारे यांच्या समवेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत आणि करीत आहोत. भीमयुगकार रानबा गायकवाड लिखित आणि सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित भीमयुग या क्रांतिकारी नाटकांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,आयोजित केंद्रीय युवक महोत्सवात प्रख्यात रंगकर्मी प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे अभिनित-दिग्दर्शित 'ऐन आषाढात, पंढरपूरात'या एकांकिकेसाठी संगीताची तांत्रिक बाजू सांभाळून गीत गायन सुध्दा केले आहे. शास्त्रीय गायन करून  शास्त्रीय नृत्यकार डॉ. विनोदी निकम यांच्या समवेत अनेक स्पर्धा, कार्यक्रमात साथसंगत केली आहे.अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय,नाट्यशास्त्र विभागाचे गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे ,डॉ. संपदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे धडे घेत असताना अनेक मित्र लाभले. संगीतात अभिरुची असल्याने युवक महोत्सवात विविध प्रकारच्या संगीत कला प्रकारात शंकर सिनगारे सहभागी होत असत.या कला प्रांतात मला भेटलेला निर्मळ नितळ मित्र म्हणजे  शंकर सिनगारे .

 उस्मानाबाद येथील आर. पी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आमची घट्ट मैत्री झाली.गप्पा-टप्पा, मैफल,सांस्कृतिक कार्यक्रम यांतून  आमची मैत्री दृढ होत गेली. जो धागा जुळला तो कधी तुटला नाही. कधी विरला नाही. तो स्नेह वाढतच गेला. भाषा, नाटक,संगीत, कविता,गज़ल, माणसे, समाज, काय काय म्हणून सांगू. असंख्य विषयांवर आम्ही बोलत असतो. अजून बोलणे संपलेले नाही. प्रवास चालूच आहे.प्रा.शंकर सिनगारे  यांची सर्जनशील संगत सर्वांनाच आवडते.

 या माणसाचे हसणे विशेष आहे. असे हसणे सर्वांना जमत नाही. मनातून हसतात. त्यात  निरागसता आणि आनंदाची सरमिसळ होऊन नवेच रसायन तयार होते.अशी मनापासून प्रेम करणारी माणसं आपली श्रीमंती वाढवितात.

 सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो.प्रा. शंकर सिनगारे यांनी शालेय जीवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपली कला सादर केली. गायन, हार्मोनियम वादन करून बर्दापुर आणि परिसरात विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले.

 विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून काम करताना अध्यापना बरोबरच संगीत, साहित्य, रंगभूमी, कला, सिनेमा, यामध्ये विद्यार्थ्यांची अभिरुची कशी वाढेल  याकडे त्यांचे लक्ष असते. येणाऱ्या काळात आपले विद्यार्थी सांगितिक क्षेत्रात आघाडीवर कसे राहतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

 अध्ययन कार्यासोबतच आपल्याकडे असणार्‍या कलेचा वापर करून हा शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवत आहे. आजच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण इतिहासजमा होत चालले आहे की काय, अशी परिस्थिती सर्वत्र दिसते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळावे याकरिताच पालकांचा आग्रह असतो. अशा परिस्थितीत प्रा  शंकर सिनगारे केवळ ज्ञानार्जनच नव्हे तर त्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या कलागुणांना वाव मिळावा याकरिता अविरत परिश्रम घेत आहेत.

 संगीत कलेचा प्रभावीपणे उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीचे ज्ञान देत आहेत.शिक्षक असण्यासोबतच ते कलाप्रेमी असल्याने विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देणारे उपक्रम राबविण्यावर ते अधिक भर देतात. यातूनच अभ्यासक्रमाबाहेरील काही उपक्रम ते राबवितात. ते उत्तम गायन आणि हार्मोनियम वादन करतात. त्यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध होत असल्याचेही अनुभवायला येते.  अभ्यासक्रमातील अनेक कवितांचे त्यांनी चाल लावून सार्वजनिक ठिकाणी गायन केले.त्यांनी गायिलेल्या देशभक्तीपर गीतांनी स्फुरण मिळते.   विद्यार्थ्यांना त्यांनी गायन शिकवले आहे.विविध गायन स्पर्धेत सहभागी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अनेक पारितोषिके त्यांनी संपादित केली आहेत. नाटकाची ही त्यांना आवड असल्याने अनेक नाट्यपदे त्यांनी गायिली आहेत. नाटकाला लाइव्ह संगीत साथ त्यांनी केली आहे.

 संगीत विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रा. शंकर सिनगारे यांना इंडियन नेट-सेट असोसिएशनच्या  राज्यस्तरीय" विद्याभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विविध  मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.या सन्मानामुळे मला पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले, असे त्यांचे ठाम मत आहे."      

     आदरणीय गुरुवर्य पं.शिवदासजी देगलूरकर हे  त्यांचे गुरु आहेत.त्यांच्यामुळेच आपण आपल्या क्षेत्रात कार्यरत आहोत असे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या जडणघडणीमध्ये अनेक गुरुबंधूचे पण योगदान आहे असे ते मानतात.त्यामध्ये जेष्ठ गुरुबंधू श्री. जयंत केजकर यांचे मार्गदर्शन,गुरुकुलामध्ये देवेंद्रजी कुलकर्णी सोबत केलेला रियाज, श्री शशिकांत देशमुख यांच्या सोबत कार्यक्रमाचे आयोजन नियोजन तसेच अर्चना कुर्डूकर, मोहिनी देव, वृषाली देव, वृषाली कोरडे, श्रीदेवी पवार,अभय कुलकर्णी,शैलेश पुराणिक, अंजली कुलकर्णी, पराग देसाई, ओंकार देगलूरकर, आसावरी देगलूरकर, विश्वजीत धाट ,दत्तात्रय कुलकर्णी,गोविंद पायघन,महेंद्र सोळंके, मनोहरजी मुंडे,राजकुमार ठोके, गौतम भालेकर, अजय बुरांडे, महेश भस्मे, प्रसाद कुलकर्णी, बालू गंगणे, रमेश सरवदे ,शारदापुत्र डॉ. विनोद निकम, यांच्यासोबत केलेला सांगीतिक परीक्षांचा अभ्यास, रियाज  व विविध स्पर्धा, कार्यक्रम यातून त्यांची वाटचाल सुरू आहे!

           तसेच  बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक,सचिव मा.राजकिशोर (पापा) मोदी साहेब यांचा  कृपाशीर्वाद त्यांना कायमच लाभतो. संस्था अध्यक्ष श्री. भूषण मोदी साहेब तसेच कार्यकारी संचालक श्री. संकेत भैय्या मोदी  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे .प्रा. शंकर सिनगारे  कायम त्यांच्या ऋणात राहू इच्छितात. त्यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य सी. व्हि. गायकवाड सर व सर्व सहकारी शिक्षक/शिक्षिका-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सतत त्यांना प्रेरणा देतात, कौतुक करतात! त्यांचा मित्रपरिवार पण मोठा आहे. त्याच्यापासून त्यांना खूप प्रेरणा मिळते असे त्यांचे मत आहे. त्यामध्ये प्रा.  डॉ. सिध्दार्थ तायडे, डॉ. बबन मस्के,श्री.बी . आर्. इंगळे,डॉ. रमेश इंगोले,डॉ. संजय जाधव,पत्रकार रानबा गायकवाड, कवी बा. सो. कांबळे, विकास वाघमारे,सिद्धेश्वर इंगोले,अजित किंबहुणे, हरिष कुलकर्णी, गायक बळीराम उपाडे,रमेश चिंचोळे, गजुदादा चिंचोळे, श्री. कांचन रेनापुरे, अश्विन जाधव, विजय केंद्रे, अनंत लोमटे, अंगद लोमटे, सचिन कर्णावट, सुनिल जावळे, अशोक राऊत,लहू कांबळे, संतोष पोटभरे,स्वप्नील सिध्दांती ,तुळशीदास सोळंके, श्री. राहूल कुलकर्णी ,जय स्वामी, श्री.दयानंद जमशेटे, श्री.अनंत मुरमुडे, उल्हास केंद्रे ,प्रा.विनायक घुले,मिलिंद मस्के,राजेंद्र डापकर, अनंत आडसुळे ,प्रमोद आडसुळे,तुकाराम जाधव आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.ज्या समाजातून आपण येतो त्याचे आपण देणे लागतो. त्यांच्यासाठी काहीतरी विधायक कार्य करायचं असा त्यांचा मानस आहे.

 आपला शिक्षकी पेशा सांभाळत कला जोपासत त्यांनी केलेला त्यांचा प्रवास प्रेरक आहे. कलेच्या माध्यमातून सतत नावीन्याचा शोध प्रयोग करणारा हा अवलिया कलाप्रेमी शिक्षक  विद्यार्थ्यांसाठीही प्रेरक ठरत आहे.


      ✒️ 

  प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे

      ९८२२८३६६७५

(लेखक सिने-नाटय- अभिनेता-लेखक-दिग्दर्शक-समीक्षक  तथा कला-साहित्य-संस्कृतीचे  अभ्यासक आहेत)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !