उष्मघातापासून बचाव, लक्षणे व उपाययोजना

 उष्मघातापासून बचाव, लक्षणे व उपाययोजना



 

            बीड, दि. 12 (जि. मा. का.)   सध्या वातावरणात होणारा बदल म्हणजे वाढते तापमान हे होय. वाढत्या ताममानामुळे उष्मघाताची बाधा होण्याची दाट शक्यता असते. परिणामी उष्मघातामुळे मृत्यू देखील होऊ शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी पुढीलप्रमाणे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.


                               उष्मघात टाळण्यासाठी जनतेने घ्यावयाची काळजी


        उन्हाळयामध्ये पांढ-या रंगाचे किंवा फिकट रंगाचे सैलसर कपडे घालावेत. बाहेर फिरतांना डोक्याला रुमाल बांधावा व डोळयावर गॉगल घालावा जेणे करुन डोके व डोळयाची काळजी घेता येईल. बाहेर जाताना पिण्याचे पाणी बॉटल सोबत ठेवावी व नियमित पाणी पित रहावे. उन्हाळयामध्ये दुपारनंतर बाहेर फिरणे टाळावे. बाहेर उन्हात काम करणारे शेतकरी, मजूर वर्ग यांनी आपली कामे सकाळी व संध्याकाळी करावीत. दुपारी काम करणे टाळावे. उन्हाळयामध्ये दिवसभर सतत पाणी पिणे,अथवा द्रव पदार्थाचे नियमित सेवन करावे. तीव्र स्वरुपाचा ताप येणे, थकवा येणे, डोके दुखणे, नाडीचे डोके मंद होणे, चक्कर येणे, उलटी होणे हातापायात गोळे येणे, काही रुग्णामध्ये पोटाच्या स्नायुत मुरडा येणे, खुप घाम येणे ही लक्षणे असतात. खुप घाम आल्यामुळे रक्तामधील द्रव पदार्थ कमी होतात. त्यामुळे रक्ताचा घटटपण वाढून महत्वाचे अवयव ज्यामध्ये मेंदु, -हदय,किडणी यांना रक्त पुरवठा सुरळित होत नाही. त्यामुळे रुग्णाना –हदय विकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब, -हदय विकार, मधुमेह इत्यादी आजार असणा-यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या रुग्णांनी दिवसभरात द्रव पदार्थाचा आहार पाणी नियमित पिणे, उन्हात न फिरणे त्याचबरोब आरोग्य विषयक काही तक्रार असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


      उष्मघातामुळे ज्याप्रमाणे मृत्यू होवु शकतात त्याचप्रमाणे वाढत्या तापमानामुळे –हय विकाराचा झटका येण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. त्यामुळे उन्हामध्ये न फिरणे, घरात खेळती हवा ठेवणे, पंखे, कुलर, ए.सीचा वापर करावा.


         वायु प्रदुषाणामुळे बालकामध्ये आणि गरोदर मातांमध्ये आरोग्य विषयक तक्रारी निर्माण झाल्यास असे रुग्ण ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे बाहय्, अंतरुग्ण म्हणून आल्यास वेगळी नोंद ठेवावी.


      बीड जिल्हयातील सर्व नगरपरिषदांनी वर्दळीच्या ठिकाणी निर्जतुंक पाणी पिण्यासाठी पाणपोई लोकसहभागातुन उपलब्ध करुन द्यावी, शहरातील उद्याने दिवसभर चालु ठेवावेत, दुपारच्या कालावधीमध्ये भर उन्हात सभा घेण्याच्या परवानग्या देऊ नये, सभा सकाळी व सायंकाळच्या वेळेत घेण्यास परवानग्या द्याव्यात. तसेच जास्त वर्दळीच्या ठिकाणी सर्व नगरपरिषदमध्ये AIR OUALITYINDEX मशीन बसावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी वातावरणीय बदल आणि मानवी आरोग्य जिल्हा टास्क फोर्स या बैठकीमध्ये दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !