पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता

 नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता 

..............

नांदेड दिनांक 30 जून प्रतिनिधी 

नांदेड येथील महात्मा गांधी मिशन संचलित एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभियांत्रिकी विद्याशाखेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा समजल्या जाणाऱ्या  आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व ऑटोमेशन रोबोटिक या दोन विद्याशाखांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेला मान्यता दिली आहे. अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांनी दिली आहे.

        1984 मध्ये महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी नांदेड जिल्ह्यातील युवकांसाठी अभियांत्रिकी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रारंभ केला होता. अभियांत्रिकी पदवी विद्याशाखेचे पाच अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चार अभ्यासक्रम तसेच संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर) आजमितीस या अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या शैक्षणिक वर्षापासून या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन विद्या शाखांना प्रत्येकी 60  प्रवेशक्षमता वाढीव स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे. मागील 36 वर्षांमध्ये या अभियांत्रिकी महाविद्यालयातून घडलेले अनेक अभियंते जागतिक स्तरावर वेगवेगळ्या नामांकित आस्थापनामध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.अभियांत्रिकी महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत तंत्रज्ञान असणाऱ्या सुसज्ज प्रयोगशाळा, उच्चविद्याविभूषित प्राध्यापक व सपोर्टिंग स्टाफ, कॅम्पस इंटरव्यू ची सोय, भौतिक सुविधा यांची तपासणी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी करून वाढीव प्रवेश क्षमता असणाऱ्या दोन तुकड्या व दोन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. नांदेड येथेच गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाची सोय या माध्यमातून झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी व नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी आणण्यासाठी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, उपप्राचार्य डॉ. शिरीष कोटगीरे, डॉ. महमद जमीरुद्दीन यांनी विशेष प्रयत्न केले. वाढीव प्रवेश क्षमता असणाऱ्या नवीन तुकड्या व नवीन अभ्यासक्रम यांना मान्यता मिळाल्याचे स्वागत अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?