23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

Motivational Story: धूर भरल्या डोळ्यांत,साकारले सोनेरी स्वप्न >>>✍️लेखक- ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर

 धूर भरल्या डोळ्यांत,

साकारले सोनेरी स्वप्न

डोंगर उतारावर पत्र्याचं झप्पर.... पुढे गवताने शेकारलेलं खोपट..... आठ-दहा दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीने आजू-बाजूला चिखलाने झालेली चिकचिक... समोर शेळ्या-जनावरासाठी केलेलं गवताच आणखी एक छप्पर.... त्यात कोप-यात लाकूड-फाटा जमवून स्वयंपाकासाठी आणून ठेवलेलं जळण.... तेही पावसाचा वसारा येऊन आर्धवट भिजलेलं..... 

..... नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली.... पावसामुळे अनेकदा रात्री वीज गायब होते..... म्हणून सुमनबाईने यरवाळीचं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली... पत्र्याच्या छप्परापुढील गवताच छप्पर हेच सुमनबाईचं 'किचन'! आर्धवट भिजलेला लाकूडफाटा चुलीजवळ आणून ठेवलेला.... गवताचं खोपट गळकचं असल्याने सगळीकडे ओलावा... त्यात सुमनबाईने स्वयंपाकाची तयारी केलेली.... ज्वरीच्या पिठाचा डबा, पाण्याची चरवी (विशिष्ट भांड) जवळ घेतलेली. चूल पेटविण्यासाठी रद्दी कागदाचे तुकडे जवळ घेतलेले.... अर्धवट भिजलेल्या जळणातील बारीक काड्या-मुड्या चुलीत घातल्या, मध्ये कादाचे तुकडे टाकून चूल पेटविण्याची धडधड सुरू..... कागदाने कसाबसा पेट घेतला.... ओल्या काटक्याचा धूर झाला.... काही पेटलेल्या काटक्याचा थोडा विस्तवं तयार झाला.... तो फूकून सुमनबाई चूल पेटविण्याची कसरत करीत होती .... खोपटं भरून धूर गवताच्या खोपटातून वर जात होता.... धुराने सुमनचे डोळेही भरलेले.... त्यातून पाणी ओघळायलेले..... इतक्यात सुमनबाईकडील इवलासा बटनाचा मोबाईल वाजू लागला.... पदराने डोळे पुसत सुमनबाईने मोबाईल उचलला.... तिच्या भावाची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा फोन होता. "आत्या.... आत्या.... आपला मनोज पीएसआय झाला. आताच रिझल्ट आलाय....." सुमनबाईला काय बोलावं तेच कळना... धुराने भरलेल्या डोळ्यांतील पाण्यात आनंदाचे आश्रू ओघळू लागले.... कंठ दाटून आला.... "आत्या.... ऐकलंस का?" पुन्हा ज्ञानेश्वरीचा प्रश्न..... सुमन फक्त.... "हूं..." इतकंच म्हणू शकली.... तिने अनेक दिवस पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं. पुढच्या खोपटात तिचे पती माधव जनावराला कबडा घालत होते.... ती चूल अर्धवट पेटलेली तशीच ठेवून तटकन उटली... डोळे चोळतच जनावराच्या खोपटाकडे धावली.... "आवं ऐकलं का? पोरगं पीएसआय झालं....." माधवरावाने ऐकलं आणि हातातला कडबा जनावराकडे हिबाळून खोपटाच्या एका बाजूला असलेल्या बाजावर टेकले... सुमनबाई त्यांच्या बाजूला जाऊन बसली.... दोघांनाही पुढे काही बोलावं लागलं नाही. बाहेर रिमझिम पाऊस टिपटिपत होता.... इकडे सुमनबाई आणि महादेव यांचे डोळे आनंदाने झरत होते.

संबंधित बातमी Click:■ *किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड*

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पोकर्णी (वाळके) या गावात सुमनबाई आणि माधव करे हे अल्प भूधारक दांपत्य राहते. डोंगर उतारावर थोडीशी जमिन. तिथेच राहण्यासाठी केलेला पत्र्याच्या छप्पराचा आसरा..... अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपला मुलगा मनोज याला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण अहमदपूर येथील होस्टेलवर.... माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथे. तर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास छत्रपती संभाजीनगर येथे.... आई-वडील कष्ट करीत होते. मनोज जिद्दीने तुटपुंज्या साधन सामग्रीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होता. त्याच्या वयाची गावातील तसेच नातेवाईकाची मुलं शिक्षण अर्धवट सोडून कामाधंद्याला लागली होती. दोन पैसे घरात आणत होती. मनोज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणा-या वेगवेगळ्या परिक्षा देत होता. खडतर संघर्ष सुरू होता. अभ्यासापेक्षा, कष्टापेक्षा नातेवाईक, गावातील लोकांचे टोपणे जास्त त्रासदायक वाटत होते. करत पोरगं झालय.... अन् मायबापाला आजून राबावं लागत.... कुटवरबी शिक्षण असतयका.... आपल्या गरीबाच्या लेकराने कामधंदा बघावा..... असे टोमने सुमनबाई, माधव आणि मनोज यांना झेलावे लागत होते. या टोपण्याला कंटाळून मनोज गावाकडेच यायचं टाळत होता. आणखी जिद्दीने अभ्यास करीत होता. आई-वडील गुमान सहन करीत होते..... एक दिवस यश येईलच... असा त्यांना विश्वास होता.  तो सार्थक ठरला. या वर्षी महाराष्ट्र  लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या पदाच्या परिक्षेत मनोजने यश मिळवले. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परिक्षेचा निकाल 1 ऑगस्ट रोजी लागला. आई-वडिलांच्या कष्टाचे आणि मनोजच्या जिद्दीचं सोन झालं.

खूप खूप अभिनंदन.

 *लेखक- ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?