इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आज हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

 आज हरितालिकेचा दिवस... जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

       भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे, असे म्हणतात. हरितालिका हे देवी पार्वतीचेच एक नाव त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते. 

       हिंदू पंचांगानुसार, आज हरितालिकेचा  व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर  आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात.

       हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.

चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.

● हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य 

तुम्ही जर हरितालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे. 

● पूजेची मांडणी 


• पूजेची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडावे.


• रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. 


• चौरंगावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन महादेवीची पिंड ठेवावी अथवा शंकरपार्वतीची प्रतिमा ठेवावी.


• महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर गणेश मूर्ती/सुपारी ठेवावी. गणेशमूर्तीसमोर वाटीत गूळखोबरे ठेवा.


• गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवा.


• मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवा आणि पूजेभोवती रांगोळी काढा.

शुभमुहूर्त 

पंचांगानुसार, पुजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी सुरु होईल आणि 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणजेच पूजेसाठी 2 तास 31 मिनिटांचा मुहूर्त असणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी पूजेसाठी संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असेल.

● या गोष्टी लक्षात ठेवा


• महिलांनी फराळ करू नये केवळ फलाहार करावा.


• पूजा केल्यानंतर संध्याकाळी पूजेस धूपदीप ओवाळून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.


• दुसऱ्या दिवशी पूजेवरील निर्माल्य काढून पिंडींना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकू, फुले आणि बेलपत्र अर्पण करा. 


• धूप, दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. 


• गणपती, हरितालिका आणि भगवान महादेवाची क्रमाने आरती करावी. 


• आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा आणि मंत्रपुष्पांजली म्हणून फुले-बेलपत्र अर्पण करा.


• विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी.


• 

(टीप : वरील सर्व बाबी एमबी न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एमबी न्यूज कोणताही दावा करत नाही.) 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या