सशोधन, साहित्य व अध्ययन-अध्यापनासाठी मराठी भाषा समृद्ध आहे-डॉ. पी. विठ्ठल

संशोधन, साहित्य व अध्ययन-अध्यापनासाठी मराठी भाषा समृद्ध आहे-डॉ. पी. विठ्ठल

----------------------------------------

 परळी वैजनाथ...

वैद्यनाथ कॉलेज येथील अभिजात मराठी भाषा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन दि.१७ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.   "अभिजात मराठी भाषा या विषयावर डॉ. पी. विठ्ठल - भाषा संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी आपले सखोल विचार मांडले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ.पी. विठ्ठल भाषा संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, डॉ मुंजाभाऊ धोंडगे सिनेट सदस्य,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर,  महाविद्यालयाच्या प्रचार्या, डॉ ए,आर.चव्हाण, विद्यापरिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड, उपप्रचार्य, प्रा. डी के आंधळे, प्रा. हरिष मुंडे, आय क्यू ए सी चे समन्वयंक डॉ व्ही जे चव्हाण यांची उपस्तिथी होती. या कार्यक्रमात बोलतांना प्रमुख व्याख्याते 

डॉ. पी. विठ्ठल यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिचे महत्त्व आणि अभिजात भाषा म्हणून तिच्या दर्जाची प्राप्ती कशी झाली, याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मराठी भाषा भारतातील एक प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे, ज्यामध्ये अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा सामावल्या आहेत. "अभिजात" दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला जागतिक स्तरावर विशेष स्थान प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे भाषेच्या संशोधन, साहित्य निर्मिती, आणि अध्ययन-अध्यापन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत."अभिजात भाषा हा कोणत्याही भाषेचा सर्वोच्च दर्जा आहे. तो मिळाल्यामुळे भाषेच्या संवर्धनासाठी अधिक निधी, संशोधनासाठी अधिक शिष्यवृत्ती, आणि तरुणांना भाषाशास्त्रात करिअर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल," असे डॉ. विठ्ठल यांनी स्पष्ट केले. यामुळे केवळ भाषाशास्त्रात नव्हे तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर वाढवण्याची संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.व्याख्यानात तरुणांनी अभिजात मराठी भाषेच्या विविध संधींवर प्रश्न विचारले. डॉ. विठ्ठल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, अभिजात दर्जा मिळाल्यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. विशेषतः मराठी साहित्य, अनुवादक, आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या क्षेत्रात मोठी मागणी वाढणार आहे. यासोबतच, मराठी भाषेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि संशोधन करण्यासाठी देखील अनेकविध संधी उपलब्ध होणार आहेत.डॉ. विठ्ठल यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, "आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपली मातृभाषा जपणे आणि तिच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे." त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याच्या अध्ययनात सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त केले.वैद्यनाथ कॉलेज च्या प्राचार्या तथा मराठी विभाग प्रमुख डॉ ए आर चव्हाण यांनी आपल्या प्रस्तावित  भाषणात अभिजात मराठी भाषेच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या संवर्धनासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी सांगितले की, "अभिजात दर्जा मिळणे ही मराठी भाषेच्या विकासात एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा."अध्यक्षीय समारोप करतांना, डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी 'संशोधन, बोली, मराठी भाषेचे महत्त्व' यावर प्रकाश टाकला. मराठी भाषेसाठी साहित्यिकांचे  योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील डॉ. रा. ज. चाटे यांनी केले तर आभार इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेप यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड डॉ.आर. डी. राठोड, डॉ. माधव रोडे, डॉ. टी. ए. गित्ते, डॉ. व्ही.व्ही. बेडसुरे, डॉ. व्ही.व्ही. मुंडे यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम मराठी विभागामार्फत आयोजित केला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?