MB NEWS- आजचा अग्रलेख >>>>न्यायदेवता बनली डोळस !
न्यायदेवता बनली डोळस !
रामशास्त्री बाण्याचा आदर
धडधडीत, स्पष्ट दिसत असतानाही न्याय नाकारला गेला, अन्याय झाला की न्यायदेवता ‘आंधळी’ आहे असे हिणवले जायचे, ‘अंधा कानून’ असे संबोधले जायचे. पूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी, तिच्या एका हातात तराजू आणि दुस-या हातात तलवार असायची. परंतु आता न्यायदेवतेच्या रूपात बदल करण्यात आला आहे. आता तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली आहे, एका हातात तराजू आहे, मात्र दुस-या हातातील तलवार काढून घेण्यात आली असून त्याऐवजी संविधानाची प्रत देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. या बदलांमधील सर्वांत प्रमुख व ऐतिहासिक बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. न्यायदेवतेची मूर्ती म्हटले, तर आपल्या डोळ्यांसमोर येते ती डोळ्यांवर पट्टी बांधलेली, एका हातात तलवार आणि दुसर्या हातात तराजू असलेली एक मूर्ती. काल्पनिक कथांपासून ते अगदी बॉलीवूडच्या चित्रपटांपर्यंत न्यायदेवतेची हीच मूर्ती पाहायला मिळते. मात्र, या मूर्तीचे स्वरूप आता बदलण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. या बदलांमधील सर्वांत प्रमुख व ऐतिहासिक बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. न्यायदेवतेची मूर्ती म्हटले, तर आपल्या डोळ्यांसमोर येते ती डोळ्यांवर पट्टी बांधलेली, एका हातात तलवार आणि दुसर्या हातात तराजू असलेली एक मूर्ती. काल्पनिक कथांपासून ते अगदी बॉलीवूडच्या चित्रपटांपर्यंत न्यायदेवतेची हीच मूर्ती पाहायला मिळते. मात्र, या मूर्तीचे स्वरूप आता बदलण्यात आले आहे.
न्यायदेवतेची मूर्ती प्रामुख्याने इजिप्त, ग्रीक व रोमन साम्राज्यामध्ये दिसून येते. या साम्राज्यातूनच न्यायदेवतेच्या मूर्तीचा जगभरात स्वीकार करण्यात आला. या मूर्तीला न्यायाचे प्रतीक मानले जाते. डोळ्यांवर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार, अशी न्यायदेवतेची मूर्ती चित्रित केली जाते. न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू व तलवार आणि तिच्या डोळ्यांवर असणारी पट्टी हे न्यायव्यवस्थेच्या नैतिकतेचे प्रतीक मानले जाते. डोळ्यांवर असणारी पट्टी निःपक्षपातीपणा दर्शवते. यातून हे सूचित होते की, न्याय हा पक्षपात न करता, संपत्ती, शक्ती किंवा सामाजिक स्थिती याकडे दुर्लक्ष करून, सर्वांच्या बाबतीत समान आहे. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे; जे संतुलन आणि निष्पक्षतेचे प्रतीक आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन मूर्तीमध्येदेखील तराजू कायम ठेवण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या हातातील तलवार हे शक्तीचे प्रतीक आहे; जी तलवार नवीन मूर्तीच्या हातामधून हटवण्यात आली आहे. न्याय दिल्यानंतर त्या न्यायाची अंमलबजावणी व्हावी हे दर्शविण्यासाठी न्यायदेवतेच्या हाती तलवार असते. आता नवीन मूर्तीमध्ये तलवारीची जागा भारतीय संविधानाला देण्यात आली आहे.
न्यायालयात कोट्यवधी प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत पडून आहेत. आता न्यायदेवता डोळस बनल्याने तिच्या ते लक्षात येईल आणि प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील अशी आशा आहे. भारतीय न्यायालयाने ब्रिटिशकालीन परंपरा मागे टाकून नवी पद्धत स्वीकारण्यास सुुरुवात केली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कायद्यात बदल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती बसवण्यात आली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा आणि वारशाच्या पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच अंध असू शकत नाही. तो सर्वांना समान लेखतो. न्यायदेवतेच्या एका हातात तलवारीऐवजी संविधान पाहिजे. त्यामुळे न्यायदेवता संविधानानुसार न्याय करते असा संदेश जाईल. "
न्यायदेवतेच्या डोळ्यांवर यापुढे पट्टी दिसणार नाही. तसेच हातात तलवारीऐवजी संविधान दिसेल. अनेक वर्षांपासून न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये दिसत असलेली विदेशी रोमन झलक आता इतिहासजमा होणार याचा भारतीयांना आनंद आहे. भारतातील न्यायदानाच्या प्रक्रियेतील रामशास्त्री बाण्याचा आदर केला जातो. भारतातील न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणल्याबद्दल सरन्यायाधीशांचे अभिनंदन आणि आभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा