सुगड हा शब्द कुठून आला?मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?


भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते, असे नाही. वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात. रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. त्यामुळेच मकरसंक्रांतीला तिळगूळ खाण्याला महत्त्व असते. मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात १४ जानेवारीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवले जातात आणि एकमेकांना "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणत शुभेच्छा दिल्या जातात. संक्रांतीचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने साजरा करतात. 

         खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा 'सुघट' असा आहे. शेती मालांनी भरलेला घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला 'सुगड' (Sugad) असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हेत अशावेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरुन त्याची पूजा केली जाते.  

सुगड पूजेसाठी साहित्य यादी 

मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं, पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगूळ-लाडू तयार करा. 

मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?

सुगड पूजा ठिकाण स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग मांडा. त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून  त्यावर पाच ठिकाणी मुठीभर तांदूळ किंवा गहू घाला. आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळावर ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या ओंब्या टाका. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून धूप, दीप लावून पूजा करा. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वाण म्हणून देतात. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !