इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 ना. पंकजा मुंडे यांनी नागपुरात घेतला नागनदी प्रकल्पाचा आढावा

सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरयोग्य करण्याच्या दिल्या सूचना

नागपूर ।दिनांक १३।

राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नागनदी प्रकल्पाचा आढावा घेत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शहरातील उद्याने (गार्डन), स्टेडियम व शेतीसाठी वापरयोग्य करण्याचे निर्देश देऊन कामाचे वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे अमलबजावणीच्या सूचना केल्या.


  मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात सदर आढावा बैठक झाली. यावेळी पर्यावरण विभागच्या प्रधान सचिव वनिता सिंगल, मनपा आयुक्त आणि प्रशासक  डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अति. आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्याय, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, विजय देशमुख, अधीक्षक अभियंता श्रीमती डॉ. श्वेता बॅनर्जी, श्री मनोज  तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, श्रीकांत वायकर, नागनदीचे तांत्रिक सल्लागार मो. इजराईल, प्रोजेक्ट मॉनेटरींग कॉन्सीलचे प्रकल्प व्यवस्थापक अबु, उपप्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्रीनिवास राव, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ अजित सवदी, प्रोक्युरमेंट तज्ज्ञ पूर्णचंद्र  राव यांची उपस्थिती होती. 


  सर्वप्रथम ना. पंकजाताई मुंडे यांचे स्वागत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागनदी प्रकल्पाची पूर्ण माहिती दिली. नागनदी प्रकलपावर केंद्र राज्य, आणि मनपा यांच्या सहभागातून एकून 1926.99 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र सरकारतर्फे 1156.14 कोटी, राज्य सरकारतर्फे 481.73 कोटी, मनपा 289.02 खर्च करणार आहे. या प्रकल्पावर जपानची जायका कंपनी मदत करीत आहे.

नागनदीवर एसटीपी वाढ करणे आणि अद्यावतीकरण, पाण्याची गुणवत्ता राखणे, नदीमधील प्रदुषण कमी करणे, उत्तर आणि मध्य भागात सिवरेज लाईन नेटवर्क बदल करणे, नवीन सिवरेज लाईन टाकणे, प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करणे, जैवविविधता सुधारणे, लोकांचे आरोग्य सुधारणेसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिकातर्फे 5 वर्षात पाच पॅकेजमध्ये नागनदी पुनरुजीवन करण्यात येणार असल्याचेही  डॉ. चौधरी यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या