अबांनगरीत लोककला संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय परिषद उत्साहात
अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर,आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग आयोजित एक दिवसीय लोककला संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली त्यात उद्घाटक म्हणून पं.उद्धव आपेगावकर यांनी संगीताचे महत्त्व विशद केले.आपला सांकेतिक प्रवास त्यांनी लोककलावंत अभ्यासक संशोधक आणि प्राध्यापकांना सांगून एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. याप्रसंगी बीजभाषक म्हणून पुणे येथील डॉ.संजय देशमुख तर लोकवाद्य प्रदर्शनाचे उद्घाटक बीडच्या केएसके महाविद्यालयाचे उपप्राचार्य,आणि नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर हे उपस्थित होते.उद्घाटन समारंभाच्या
अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते. लोककला या अभिजात कलां एवढ्याच श्रेष्ठ असून लोककलावंतांनी कोणत्याही प्रकारची कमीपणाची भावना बाळगू नये. स्वतःला अप्रतिष्ठित समजू नये.
कारण लोककला याच मराठी रंगभूमीच्या पाया आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या कला मानवी जीवन सुसंस्कृत बनवण्याचे आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करत आहेत. असे मत आपल्या भाषणातून व्यक्त करत,राष्ट्रीय परिषदेचे आयोजन लोककलांनी सादर करण्याच्या उपक्रमाचे आयोजकाचे विशेष कौतुक डॉ.संजय देशमुख यांनी केले. लोकवाद्य ही शास्त्रीय वाद्यां एवढीच महत्त्वाची आहेत. लोकवाद्यांमुळे प्रशिक्षकांना रोजगाराच्या ही संधी उपलब्ध होतात. असे मत डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी भरविण्यात आलेल्या लोककला वाद्यांमध्ये बीड येथील पवन शिंदे ,कोरडे, हे आणि हे वादक उपस्थित होते.
आपल्या सादरीकरणाने त्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. लोककला परिषदेच्या निमित्ताने, ओवी ते लावणी तसेच उखाणे घेणे असा लोककलावंतांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
त्यात थोरले व धाकटे देवघर येथील चंद्रकांत गोस्वामी,वामन गोस्वामी,विश्वंभर, गोस्वामी,नंदकुमार तनगूल, पत्रकार राहूल देशपांडे,प्रा.प्रसाद हिवरेकर,सागर दिक्षित,उमा दीक्षित,उर्मिला गोस्वामी आदींनी लळिते सादर केली.राम मंदीर जगत जननी भजनी मंडळातील संगीता कुलकर्णी,ज्योती कन्सुरकर,जया मुडेगांवकर,प्रतिभा वडगावकर, अर्चना जोशी (उखाणे)यांसह पंधरा जणींचा भजनात सहभाग होता.श्री जाधव आणि संचाचे गोंधळ गीत, सचिन एडके यांचा पोवाडा, कु.सृष्टी आचार्य हिची लावणी आणि कु.प्रिया राठोड हिच्या बंजारा नृत्याचे सादरीकरण झाले.यावेळी संशोधक वाचक गोवा ,के एस.के.महाविद्यालय बीड,वर्धा येथील संशोधक,प्राध्यापक सहभागी झालेले होते. याच परिषदेमध्ये ऑनलाईन पद्धतीने डॉ. सतीश पावडे (वर्धा) यांंनी भरत नाट्य शास्त्रातील लोकधर्मी वृत्ती आणि लोककलांचा सहभाग यासह भरताचे नाट्यशास्त्रातील लोकाभिमुखता या विषयावर पावडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ गणेश चंदनशिवे लोककला विद्यापीठ मुंबई ,यांनी संतांनी रचलेल्या गोंधळ या कलेचा इतिहास सांगून गोंधळ गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुंबईच्या लोककला विद्यापीठातील डॉ.मोनिका ठक्कर यांनी गुजराती लोककला प्रकारांचा सखोल आढावा उपस्थित प्रेक्षक श्रोत्यांसमोर मांडून गुजराती लोकगीतांचे गायन केले तसेच गुजराती लोककलेतील स्त्री भावना त्यांनी व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. डॉ वैशाली गोस्वामी कुलकर्णी (नांदेड) यांंनी दासोपंत कृत लोककला आणि दासोपंतांच्या साहित्यातील लोकधर्मी वृत्ती याविषयी सविस्तर माहिती देऊन समाजाभिमुख लोककला प्रकारांचा दासोपंतांनी मांडलेला आलेख संशोधकांसमोर मांडला. डॉ.साईश देशपांडे (गोवा)यांंनी गोव्यातील लोककला प्रकारांची माहिती देऊन उपस्थित संशोधकांना भारावून सोडले.
या परिषदेत डॉ.शैलजा बरुरे प्रा.रमेश सोनवळकर, प्रा.वहिदा पठाण प्रा.सैमुद्दीन यांच्यासह अनेक प्राध्यापकानी आपल्या संशोधन लेखातून विविध लोककला प्रकारांचा आढावा त्याचा इतिहास त्याचे उपयोजन विविध पैलूंनी उपस्थितांसमोर मांडले. परिषदेच्या आयोजक डॉ.संपदा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात लोककला संवर्धन काळाची गरज आहे, केवळ संशोधनापेक्षा वेगवेगळ्या व्यासपीठांवरून लोककलावंतांच्या सादरीकरणाला संधी मिळण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करून लोककला परिषदेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल डाॅ.बा.आं.म.विद्यापीठ आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचे आभार मानले. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.थारकर यांनी स्वागतपर भाषण केले.
राष्ट्रीय परिषद एकूण चार सत्रात संपन्न झाली.प्रत्यक्ष लोककलांचे मंचावर सादरीकरण हे याचे वैशिष्ट्य होते. लोककलांच्या सादरीकरणाबद्दल आणि या अनोख्या आयोजनाबद्दल डॉ संपदा कुलकर्णी यांचे सर्वांनी अभिनंदन केले.कृष्णा मस्के, पियुष सावरे,नेहा बोंडगे उर्मिला मस्के,वैशाली मगर आणि भार्गव रामदासी या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या लोककला विषयक भित्तिपत्रकाचे प्रकाशन या प्रसंगी झाले.
उपस्थितांचे आभार प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.या परिषदेचे संचालन प्रा.ममता राठी आणि प्रा.सागर कुलकर्णी यांनी केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.रमेश सोनटक्के अंतर्गत गुणवत्ता हमी मंडळाचे डॉ.गंगाधर अकलोड,उपप्राचार्य प्रा.जितेंद्र देशपांडे, प्रा.श्रीकांत जवळगावकर,डॉ. राम बडे,डाॅ.निलेश होदलुरकर यांनी तर तांत्रिक सहाय्य प्रा. बी.के.भाबरदोडे, प्रा. ज्ञानेश्वर वडजे डॉ. संकेत तोरंबेकर यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरण चक्रे,डाॅ.भारती गडदे,प्रा.महेंद्र देशपांडे आणि सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा