गेल्या 30 वर्षापासून जलसाक्षरतेसाठी जनआंदोलन उभे करणारे जलदूत :मेजर एस.पी. कुलकर्णी
अबांजोगाई (वसुदेव शिंदे)...
जल हे जीवन आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही. ते सर्वांचे पोषण करते. राष्ट्राची भरभराट करते .म्हणून जगाच्या उज्वल भविष्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे , जिरवणे व मुरवणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे .
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त आहे .आज पाणी आहे परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते तेव्हा लोकांनी आता पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब वॉटर बँकेच्या माध्यमातून वाचवला पाहिजे .म्हणजेच प्रत्येकाने पाण्याचा साठा करणे ही काळाची गरज आहे. आमच्या लहानपणी प्रामुख्याने १९७०च्या दशकात पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे गावातील आड , विहीर, बाराव हेच भागवायचे. पावसाळ्यात पाण्याचा साठा करण्यासाठी या साधनांच्या साह्याने पाणी साठवले जायचे. गावातील लोक पोहराच्या साह्याने पाणी काढायचे. त्यात श्रम लागायचे त्यामुळे आपोआपच लोक पाण्याचा वापर जपून, काटकसरीने ,नियोजनपूर्वक करायचे . त्यांना पाणी आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे .त्यामुळे पाण्याची किंमत आपोआपच त्यांना कळायची. म्हणून पाण्याचा वापर ते जपून करायचे. परंतु पुढच्या काळात प्रगती झाली व खेड्यांमध्ये सुद्धा बारव संस्कृती लयास गेली. नळाद्वारे घरात पाणी येऊ लागले , त्यामुळे माणसाचे श्रम कमी झाले .पाण्याचा वापर वारेमाप झाला. जमिनीतील पाण्याचा बोर च्या साह्याने मोठ्या प्रमाणात उपसा काढला गेला .७० च्या नंतर पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली.
आज परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लोकसंख्या वाढत आहे. म्हणजे पाण्याची गरज वाढते .पाणी कमी पडते तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला पारंपारिक ऊर्जा स्रोताची संस्कृती रुजवावी लागेल . आता बारव ,आड विहिरी यांच्यातील पाण्याची जागा प्लास्टिक ने घेतली आहे .त्या प्लास्टिक पासून बाराचे पुनरुज्जीवन करावे लागेल. गावातील प्रमुख लोकांनी वर्गणी गोळा करून श्रमदानाने बारवा चे पुनरुज्जीवन करावे लागेल . पूर्वीची बारव संस्कृती जी संपुष्टात आली होती तिचा उदय करावं लागेल. गावातील तरुणांनी एकत्र येऊन आता वॉटर बँका तयार कराव्या लागतील .त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करून बारवाचे पुनरुज्जीवन करावे लागेल. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागेल. वाहून जाणारे पाणी जागेवर मुरवावे लागेल. आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पाण्यासाठी टंचाई होत आहे. पाणीसंकट रोखण्यासाठी पुन्हा आपल्याला पारंपारिक जलस्त्रोतांची जपणूक करावी लागेल. त्यासाठी गावातील बारवाचा सर्वे करावे लागेल. व त्याचे पुनरुज्जीवन करावे लागेल. साधारण आठव्या शतकापासून पाण्याच्या जलसाठा यासाठी बारवाची निर्मिती झालेली दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी नंतरच्या काळात बारवाचे पुनर्जीवन मोठ्याप्रमाणात केलेले दिसले. प्रामुख्याने मराठवाड्यातील पाणी समस्यांसाठी बारवाची मोठ्या प्रमाणात निर्मिती झालेली दिसून येते. नव्हे मराठवाड्याची संस्कृती हीच बारव्याच्या आधारे विकसित झालेली आहे .परंतु पुढच्या काळात या जलव्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणून आज मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ह्यात प्लास्टिकच्या विळखा तुन बारवाचे पुनरुज्जीवन करावे लागेल .यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. प्रामुख्याने २०१६ पासून मराठवाड्यात पाणी टंचाई भासत आहे. पाण्यावाचून जनावरे ,माणसे मृत्युमुखी पडत आहेत .हे संकट निसर्ग निर्माण नसून मानवनिर्मित आहे .बारव लोकोपयोगी प्रकल्प आहे. त्याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने ही गावागावात बारवाचे सर्वे करावेत. व त्याचे पुनरुज्जीवन करावे .
आम्ही राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने" माय अर्थ माय ड्युटी" अभियान अंतर्गत गेल्या पाच वर्षात बारवाचे पुनरुज्जीवन केले. त्या ठिकाणी जाऊन श्रमदान केले. व त्या बारवांना पुनरुज्जीवन दिले आहे .पुढील काळात या संदर्भात जनजागृती करून काही गावात जाऊन काही बरवाचे सर्वे करून त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत .व बारव्याच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. म्हणजे बारव पुनरुज्जीवन करण्यासाठी लोक चळवळ उभी करणार. व संकटांचा सामना करण्यासाठी तरुणांची म्हणजेच स्वयंसेवकांची फळी निर्माण करणार . छात्र सैनिक गावोगावी जाऊन वॉटर बँक तयार करण्यासाठी , बारवाचे पुनर्जीवन करण्यासाठी जनजागृती करणार. बारव पुनरूज्जीवन ही संकल्पना पाणीटंचाई कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे...
*बारव पुनरुज्जीवन*
मराठवाडा ही संतांची तसेच ती शूरवीरांची भूमी आहे.त्याचप्रमाणे ती बारव संस्कृतीची भूमी आहे. ज्याप्रमाणे नदी मातृक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे बारव मातृक संस्कृती होती साधारणतः आठव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत होती. परंतु पुढे कालांतराने बारव संस्कृती मागे पडली व हळूहळू पाण्याची टंचाई भासू लागली. पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात त्यांनी बारवाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी त्याचे पुनर्जीवन केले व त्यांनीही असंख्य बारवाची गावागावात निर्मिती केली. जेणेकरून गावातील पाणी गावातच जिरवावे यासाठी त्याला धार्मिकतेचा आधार देत प्रामुख्याने मंदिराशेजारी बारवांची निर्मिती केली. पण पुढे ही संस्कृती नष्ट झाली. आज बऱ्याच गावात बारवामध्ये कचराकुंडी केली आहे. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या बारबांची जागा कचराकुंडीने घेतली आहे व पाण्याची टंचाई भासत आहे .ज्याप्रमाणे आपण जलस्वराज्य योजना राबवून शेतातील पाणी शेतातच मुरविले त्याचप्रमाणे गाव पाणीदार करण्यासाठी बारावांचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा वाचवणे हाच राष्ट्रधर्म आहे. पाणी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे .तिचे रक्षण करणे गरजेचे आहे. तेव्हा या निवेदनाद्वारे शासनाला आम्ही विनंती करतो की गाव पाणीदार करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बारव पुनर्जीवन योजना सुरू करत मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल व अहिल्याबाई होळकरांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढी काम करेल. हे वर्ष मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने मराठवाड्यात आपण ह्या योजनेद्वारे उपक्रम सुरू करावा. जेणेकरून पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल अशी मागणी योगेश्वरी संस्थेच्या जयहिंद ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
*पाणी व्यवस्थापन ही काळाची नसून श्वासाची गरज आहे*
विविध उपक्रमांतर्गत योगेश्वरी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने जलसाक्षरता काळाची गरज याविषयी जल चळवळीचे कार्यकर्ते मेजर एस पी कुलकर्णी यांनी काम केले आहे. जल हे अत्यंत पवित्र आहे. ते राष्ट्राची भरभराट करते. त्यासाठी त्याचा थेंब अन थेंब वाचवणे ही खरी राष्ट्रभक्ती आहे. मानवाला वाणी आणि पाणी फुकट मिळाले म्हणून त्याची किंमत नाही. परंतु प्रामुख्याने १९६० पासून पाण्याचे दुर्भिक्ष भासू लागले आहे. मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणून पाणी समस्या जगासमोर आहे. नव्हे पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १९७२ च्या दुष्काळात पाणी ७० ते ९० फुटावर होते. परंतु मानवाने पृथ्वीची केलेली चाळणी तसेच पाण्याचा न केलेला संचय, सिमेंट काँक्रीट ची जंगले निर्माण केली,पर्यावरणामध्ये म्हणजेच निसर्गामध्ये ढवळाढवळ केली परिणामी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आज आम्हाला पावसाचा प्रत्येक थेंब वाचवणे हा राष्ट्रधर्म समजून काम करावे लागेल. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे तिचे रक्षण करणे ही काळाची नसून श्वासाची गरज आहे. नसता येणारा काळ भीष्ण असेल. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल. पावसाचा प्रत्येक थेंब वाचविणे, आडविने ,जिरविणे हीच देशसेवा समजून काम करावे लागेल. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयराव चौधरी म्हणाले आपण एनएसएसच्या माध्यमातून जलसैनिक निर्माण करत आहोत. शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवक हा संवेदनशील होतो. स्वयंशिस्त निर्माण होते. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करतो. या ठिकाणी पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले काम केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा