प्रासंगिक लेख...........
धन्य तुकोबा समर्थ !
✍️ शब्दांकन:- बब्रुवान शेंडगे पाटील
जगद्गुरु तुकाराम महाराज ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा २०२५ चे औचित्य साधून श्रीक्षेत्र देहू येथे सर्व वारकरी फडकरी श्रीक्षेत्र भंडार डोंगर संस्थान भामचंद्र डोंगर संस्थान घोरडा संस्थांचे पदाधिकारी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दानशूर व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९/०३/२०२५ ते १७/०३/२०२५ रोजी भव्य दिव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (वैकुंठ गमन तुकाराम बीज) चे औचित्य साधून शांती ब्रह्म हभप गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा देहु संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष ह भ प काशीद महाराज यांच्या शुभहस्ते भंडारा डोंगरासह तुकाराम महाराज मंदिर तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधना केली आहे त्या सर्व तपभूमीवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात येणार असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन ह भ प पांडुरंग महाराज घुले संस्थापक अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू यांनीही केले असून भंडारा डोंगराचा कार्यक्रम शंभर एकर मध्ये संपन्न होत आहे या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कीर्तनकारांची कीर्तने संपन्न होऊन या भव्य दिव्य कार्यक्रमात मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातील कुठ चिंतनकार महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन सेवा दिनांक १३/०३/२०२५ रोजी संपन्न होणार आहे या सर्व कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाचे निमंत्रक तथा आयोजक ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये विस्ताराने माहिती सांगितली आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ३७५ सदेह वैकुंठ गमन सोहळा त्रिशतुकत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व तुकाराम बीज कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराजांच्या चरणावर ही पुष्पांजली अर्पण करूया.
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे थोरपण अनेकांना मान्य होते ते देव मान्य संत मान्य राज मान्य आणि समाज मान्य संत होते तत्कालीन संतांनी महाराजांचा गौरवच केला त्या संत मालिकेत त्यांची पट्ट शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर होते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वारकरी संप्रदायातील कार्याची चिंतन केले तर ते भागवत धर्माच्या कळसस्थानी होण्याचा बहुमान त्यांच्या वाट्याला येतो म्हणूनच तर त्यांच्या पट्ट शिष्य बहिणाबाई चौधरी यांनी तुका झालासे कळस भजन करा सावकाश असा सार्थ गौरव महाराजांचा केला. कळस या पदाचे चिंतन करत असताना कळस दर्शना जसे आबाल वृद्धांना सहज शक्य होते तसे तुकोबारायांचे वाङ्मय हे सर्व मनाला स्पर्श करते महाराजांचे एका दुसरे वचन ओटावर येत नाही असा मनुष्य सापडणार नाही महाराजांच्या अध्यात्माच्या प्रांतात कळसा इतकी उंची गाठली असा त्यांच्यानंतर परमार्थिक उंचीचा संत झाला नाही म्हणून तुका झालासे कळस या शब्दात बहिणाबाईंनी त्यांना गौरविले आहे तुकाराम महाराजांच्या अभंगातून समतेचा संदेश मिळतो या संतांचे अनंत उपकार मराठी माणसावर आहेत म्हणूनच त्यांचे अभंग चिरंतन टिकणारे आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांना शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करताना त्यांच्या कर्तुत्वाचा सर्व अंगांना स्पष्ट करणे शक्य नाही पुढच्या अनेक पिढ्यांना महाराजांच्या या इतिहासाची तथा कार्याची ओळख व्हावी म्हणून सखल वारकरी संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज दशमी समितीच्या वतीने त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती येणारे मंदिर उभारण्याचा संकल्प केला आहे सुमारे २०० कोटी रुपये खर्चाची ही दिव्य वास्तू महाराजांच्या अक्षर वाङ्मय विश्वास चिरंतन रूपाने प्रबोधित करीत राहणार आहे व महाराजांच्या विचाराचा वारसा चिरंतन रूपाने माध्यम ठरणार आहे म्हणून नियोजित श्री संत तुकाराम महाराज मंदिर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ची प्रतिकृती वाचकांच्या माहितीसाठी देत आहे या मंदिराला भाविक भक्तांनी आर्थिक मदत करावी
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरत.
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्याची जनजागृती करण्यासाठी अशाच प्रकारे चार ठिकाणी दिव्य भव्य गाथा पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताहाची आयोजन केले आहे यामध्ये त्यांचे श्री गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज ओतूर व अन्य ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासंबंधी ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम आपल्याशी आ संवाद करणार आहेतच जगद्गुरूंच्या कार्याला वंदन करून त्रोटक गोष्टींची चिंतन करून शब्दाला विराम देतो.
माघ शुद्ध पंचमी शके १६३० अर्थात 1608 साली महाराजांचा जन्म झाला चंद्रगुप्त यांचे दक्षिण भारतात असलेले एक घराणे कालांतराने महाराष्ट्रात जावळी खोऱ्यात स्थायिक झाले व आदिलशहाच्या पदरी सरकारमध्ये ा मोर्यांना जावळीपर्यंतची देशमुखी मिळाली यास मोरे घराण्यातील एक कर्तबगार पुरुष श्री विश्वंभर बाबा भाऊबंदगीच्या नादातून देहू गावी आली व स्थायिक झाले हेच तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज होत श्री ज्ञानोबारायांच्या समाधी स्थानी श्रीक्षेत्र आळंदी व परिसरातील भक्तीमय वातावरणाचा योग्य तो परिणाम होऊन ते वारकरी संप्रदायाचे पाईक झाले व पंढरीची वारी निष्ठेने चालू लागली पुढे वृद्धपकाळल्याने त्यांना पाई वारी कष्टदायक झाली त्यामुळे पांडुरंगाची ओढणी व्याकुळ झाले विश्वंभर बाबाच्या एकनिष्ठ भक्तीने श्री पांडुरंग मूर्ती रूपाने देहूत प्रकट झाले. तीच स्वयंभू मूर्ती आज देहूच्या मंदिरात विराजमान आहे तेव्हापासून श्रीक्षेत्र देहू प्रति पंढरी मानली जाऊ लागली व त्या परिसरातील भाविक या क्षेत्राची शुद्ध वारी करू लागली ती प्रथा आजही हव्यात चालू आहे
विश्वंभर बाबांना हरी व मुकुंदा अशी दोन मुले क्षत्रवर्तीने निजामशाहीत नोकरीस राहिली व एका युद्धामध्ये धारातीर्थी पडली त्यावेळेसच्या प्रत्येक प्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली पण हरीची पत्नी त्यावेळी गरोदर होती ती सती गेली नाही तिला झालेला पुत्र शंकर चा पदाची पदाजीचा काना कानाचा विठ्ठल विठ्ठलाचा बोलोबा बोलोबा चे सुपुत्र म्हणजे आपले जगद्गुरु तुकाराम महाराज अशी आठ पिढ्यांची परंपरा विश्वंभर बाबा पासून पांडुरंगाची वारी व कुळाचार महाराजांच्या वंशात अखंड अखंड चालू होता बोलोबांना महाजनकीचा सरकारी मान होता. एकंदर पाहता घराण्यात लक्ष्मी नांदत होती बोलोबांना सावजी तुकोबा कानोबा अशी तीन मुले झाली पैकी वडील भाऊ सावजी हा स्वभावताच विरक्त वृत्तीचा होता त्यातच त्याची पत्नी या निमित्ताने कायमचा निघून गेला यावेळी बोलोबा वयोवृद्ध झाले त्यामुळे व्यापाराची सर्व जिम्मेदारी महाराजांवर आली त्या काळाच्या प्रथेप्रमाणे महाराजांचे वयाच्या दहाव्या वर्षीच प्रथम विवाह झाला मात्र पत्नीला दम्याच्या विकाराने आजारी असल्याने तेराव्या वर्षी महाराजांचे दुसरे लग्न पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची लाडकी कन्या आवडी उर्फ जिजाई यांच्याशी झाले प्रथम पत्नीपासून महाराजांना संतोबा नावाचा पुत्रही होता पण पुढेही दोघेही मरण पावले श्रीमंत सावकार घराण्यामध्ये सुखी जीवन जगत असत सुखी जीवन जगत असताना महाराजांचे नियतीचे फासे उलटे पडत गेले व त्यातूनच महाराष्ट्राला एक दिव्य संत लाभला वयाच्या सतराव्या वर्षी पुढील वारले पाठोपाठ मातोश्री ही गेल्या पहिली पत्नी व पुत्रही वारला त्यातच १६३०ला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले त्यात भर म्हणून मोगली गिधाडांनी प्रजेची लचके तोडून अत्यंत निष्ठुरतेने लूट केली व प्रजा देशोधडीला लागली या नैसर्गिक आपत्तीत महाराजांचे लौकिक जीवन भरडून निघाले व सावकार पुत्र तुकाराम एक दरिद्री नारायण म्हणून दुर्बल झाला श्रीमंतीची वाताहात झाली या सर्वांचा परिणाम महाराजांच्या तरुण वयावर होऊन त्यांनी भामचंद्राचा रस्ता धरला व पुन्हा म्हणून संसाराकडे पाहिले नाही तेल मिठाचा व्यापार करणारे महाराज आता दिन रजनी हाची धंदा ! गोविंदाचे पोवाडे!! म्हणून हरिनामाचा व्यापार करू लागले अवघ्या जगाची दुष्काळग्रस्त वैफल्य जीवन पाहून त्यांनी सावकरकीच्या वह्या स्व:हस्ते
इंद्रायणी मध्ये विसर्जित करून आपली मोह पाशातून कायमची सुटका केली व उपकारापुरता आकाशा एवढा तुका अवतीर्ण झाला
तुकाराम महाराजांनी जगाला महान तत्व दिले त्याचे नाव वैराग्य
‘वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली’
गाथा हा पाचवा वेद जगाला दिला शिवरायांसारखा धर्मज्ञ राजांसमोर सोने रुपये दिवट्या छत्री घोडे आधी ऐश्वर्य समर्पण करण्यासाठी येतो तरी तो नजरांना परत करून आम्हाला आनंदी करायची असेल तर’आम्ही तेने सुखी !मना विठ्ठल विठ्ठल मुखी!! येर तुमचे वित्त धन!! मृतिके समान!!
मराठी सारस्वताचा अभ्यास केल्यास असे आढळून येते की तीन ठिकाणी जगद्गुरु यांचा उल्लेख आहे पहिले जगद्गुरु कृष्णवंदे जगद्गुरु द्वितीय जगद्गुरु श्रीमंत शंकराचार्य जो की प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार मानला जातो आणि तृतीय जगद्गुरु म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख होतो. महाराजांच्या जीवन कार्याची सिंहावलोकन केले तर त्यांचे जीवन विशेष अद्वितवाने आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही येरवी निजधामालां गेल्यावर परत येणे अशक्यच परंतु महाराज चार वेळेस निजधामावरून परत आलेले आहेत प्रथम भागीरथीबाई मुलगी हिच्यासाठी दुसऱ्या वेळेस गवर शेठ व वाणी यांच्यासाठी तिसऱ्या वेळी श्री संत जगनाडे महाराज व चौथ्या वेळेस श्री संत निळोबारायांसाठी निजधामावरून आले व स्वतः विना व टाळ देऊन अनुग्रह देऊन गेले तोच विना आजही वारकरी घराण्यात पूजेत ठेवलेला असता गायात पहावयास मिळतो एकंदर चार वेळेस निजधामावरून परत येणे या गोष्टी महाराजांच्या जीवनात सहजच भगवत कृपेने घडल्या म्हणून वारकरी संप्रदायात महाराज कळस्थानी आहेत आज महाराष्ट्रात व अन्य प्रांतात त्यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमन अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचे दिव्य भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे श्रीक्षेत्र देहू येथे भंडारा डोंगर गाथा मंदिर संस्थान देहु संस्था वारकरी फडकरी गडकरी तुमच्या आयोजनातून भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे थोडक्यात महाराजांच्या जीवन कार्याचे सिंहावलोकन केले तर धन्य तुकोबा समर्थ! तेने केला हा पुरुषार्थ असे म्हणावे लागेल!!
संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीज निमित्त सर्व भाविक भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा
आपला संत चरणरज
✍️ शब्दांकन:- बब्रुवान शेंडगे पाटील. ८०१००२७६४४
(लेखक हे जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा