शेतकरी कीर्तन महोत्सव...
शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखा- कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
परळी / प्रतिनिधी
रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेतीचा पोत खराब होत असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखावा, असे आवाहन बीड जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केले.
शेतकरी कीर्तन महोत्सवात 'शेतकरी योजना, शेती उद्योग आणि शेंद्रीय शेती ' या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रासायनिक खत, पवारण्या याच्या अती वापरामुळे शेतीमधील कीटकांची जीवन साखळी विस्कळीत झाली आहे. शेतीमध्ये काही जीव जंतू हे शेतीला लाभदायक असतात तर काही हानीकारक असतात. हानीकारक किकांना खाण्याचे काम काही किचकट करतात. त्यातूनच शेतीचा समतोल राखला जाती. कधी कधी हानीकारक असणाऱ्या कीटकांची संख्या वाढते तेव्हा किटक नाशक फवारणीचा पर्याय असतो. पण अलिकडे किती गरज आहे याचा विचार न करता भरमसाठ किटक नाशक फवारले जातात. परिणाम उपयुक्त आणि हानीकारक दोन्ही तऱ्हेचे किटक संपत आहेत. त्यातून नैसर्गिक जीवन साखळी विस्कळीत होत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेताचा पर्याय निवडला तर अधिक लाभ होऊ शकतो. रासायनिक खतांचा वापर टाळला तर कदाचित थोडे उत्पादन कमी होईल. पण त्याच वेळी खर्चही कमी होईल, असेही साळवे म्हणाले.
यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची सर्व प्रक्रियाही त्यांनी समजावून सांगितली... यावेळी जिल्हा कृषी अधिकारी, धारूर तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह बीड कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
●●●●●●●●●
खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी अडचणीत-एकनाथ महाराज माने यांचे अनुभवाचे बोल
खत-बीयान्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मजूर मिळत नाहीत. एकंदर शेतीचा खर्च वाढत आहेत. शेतमालाचे भाव मात्र त्या पटीत वाढत नाहीत. म्हणून शेतकरी अडचणीत आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने हे सर्व अनुभवतो आहे, असे वांगी संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. एकनाथ महाराज माने यांनी सागितले. शेतकरी कीर्तन महोत्सवातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकरी कीर्तन महोत्सवाचे तिसरे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वारकरी जेवढे आहेत तेवढे शेतकरी आहेत. संकटात असताना शेतकरी भजन - कीर्तनातून आपले दु:ख हलके करतात. तोच या कीर्तनातून होत आहे. गावातून येणाऱ्या भाकरी आणि त्याची होणारी सामोहिक पंगत ही जातीय सलोखा बळकट करणारे उपक्रम आहेत, असेही माने महाराज म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा