✍️ ज्ञानेश्वर खंदारे , औरंगाबाद यांनी लिहलेला विशेष श्रद्धांजलीपर लेख

परिवर्तनवादी, समतेच्या विचारांनी चालणारा चारठाणकरांचा वाडा पोरका!

मरावे परी, कीर्ती रुपी उरावे I

आपण आयुष्य किती जगलो, यापेक्षा कसे जगलो. कुणासाठी जगलो, याला जीवनात अत्यंत महत्त्व असते. नानासाहेब देशपांडे चारठाणकर हे जुन्या पिढीतील एक नामांकित नाव. त्यांचं निधन 19 मार्च 2025 रोजी झाले. त्यांच्या निधनामुळे चारठाणा परिसरातील, पंचक्रोशीत तर दुःख झालेच, पण अख्खा परभणी जिल्हा हळहळला. अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याची अनेक कारणे आहेत. ते ब्राह्मण समाजातील उच्च वर्णीय होते. पण मी ब्राह्मण आहे. उच्चवर्णीय आहे. असं त्यांनी कधीच मनात आणलं नाही. ब्राह्मण समाजापेक्षा त्यांच्या वाड्यावर महार , मांग,  चांभार , कुंभार , सुतार या समाजाचा वावर जास्त असायचा. त्यांच्या वाड्याच्या दारापासून ते देवघरापर्यंत अस्पृश्य समाजाची लोक बिनधास्तपणे वावर करीत असत. गावात कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही समाजाचे तंटे असो की भांडणे असो त की अन्यवाद-विवाद असो त नानासाहेबांच्या वाड्यावर च मिटत असत. त्यांच्या विचाराची गावात किंमत होती. त्यांच्या शब्दाला मान होता. म्हणून त्यांनी जो निर्णय दिला, न्याय दिला तो अंतिम असायचा. चारठाणा गावात आज पोलीस ठाणे झाले आहे. औरंगाबाद हैदराबाद हायवेवर चारठाणा फाट्यावर आज पोलीस ठाण्याची दिव्य आणि भव्य पांढऱ्या शुभ रंगाची इमारत उभी आहे. एक जमाना होता . एक काळ होता. नानासाहेबांची बैठक रुम हे पोलीस ठाणेच होते. दलित शोषित कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार यांची कोणतेही प्रश्न असो त , ते नानासाहेबांच्या वाड्यावर सुटायचे. शासकीय निमशासकीय खात्यात त्यांचा आदरयुक्त दरारा होता. सन्मान होता. परभणी जिल्ह्यातील अनेक खात्यात काम करणारे अधिकारी त्यांना खूप मानायचे. त्यांचे कोणतेही काम असो, शब्द खाली पडू देत नसत. एवढी त्यांची गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात किंमत होती. आज आमदार खासदार यांचे कोणी ऐकत नाही. त्यांच्या चिठ्ठीला अधिकारी केराची टोपली दाखवतात. अशावेळी नानासाहेबांची आवर्जून आठवण होते. त्यांचे स्मरण होते. माझा जन्म चारठांनचा. पण त्यांचा आणि माझा कधी संपर्क आला नाही. येण्याचं कारण नाही. पण त्यांच्याविषयी मला बरीच माहिती होती. मी अनेकदा त्यांना जवळून पाहिल होत. पण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचे कधी संधी मिळाली नाही. कारण त्यावेळी मी अत्यंत लहान होतो. शशिकांत देशपांडे हे माझे वर्गमित्र. लहानपणी शशिकांत हे माझ्या घरी नेहमी यायचे. ते ब्राह्मण आणि मी दलित. पण मन शशिकांत यांनी दलित आणि ब्राह्मण असा भेद कधीच मानला नाही. ते आजही मानत नाहीत. कारण त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले होते. परिवर्तनवादी, समतेच्या विचारांनी चालणारा हा वाडा होता. म्हणून या वाड्याची, वाड्याच्या प्रमुखाची, वाड्यातील प्रत्येक माणसाची सर्वत्र इज्जत होती. ती आजही आहे. ज्यांना वडील नाहीत, त्यांना वडिलांची किंमत काय असते हे जरा विचारून बघा i 

शशिकांत यांचे आज वडिलांचे छाया छत्र हरवले आहे. त्यांच्यावर प्रचंड असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तथागत भगवान बुद्ध त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो, अशी बुद्धाच्या चरणी वंदना करतो. 

✍️ ज्ञानेश्वर खंदारे , औरंगाबाद.                       9049592005

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार