लढा न्यायाचा...आश्रमशाळांतील शिक्षकांच्या जीवनाचा संघर्ष
पगाराच्या विवंचनेत जीव गमावलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंचे वयोवृद्ध वडील आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायासाठी उपोषणस्थळी !
मी कुटुंबातील कर्ता लेक गमावलाय,इतरांवर ती वेळ नको: शासनाकडे न्यायाची मागणी
बीड, प्रतिनिधी...
शाहु-फुले-आंबेडकर आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे बीड येथे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या २५ -३० वर्षांपासून सुरु असलेल्या शाळेतील शिक्षक विनापगारी आहेत. यातच पगाराच्या विवंचनेत जीव गमावलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंचे वयोवृद्ध वडील आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायासाठी आज उपोषणस्थळी दाखल झाले.आपण या उपोषणकर्त्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मी कुटुंबातील कर्ता लेक गमावलाय, इतरांवर ती वेळ यायला नको अशा शब्दांत अतिशय दु:खी अंतःकरणाने त्यांनी शासनाकडे आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायाची मागणी केली. अतिशय भावनिक व गंभीर भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्व.धनंजय नागरगोजे यांच्या वडिलांनी आहेत शिक्षकांची वास्तविक कैफियतच मांडली.त्यांनी सांगितले की, माझा मुलगा धनंजय 17 ते 18 वर्षापासून शाळेवर काम करत होता. आज अनुदान मिळेल उद्या पडताळणी होईल ,वेतन मिळेल या आशेवर आतापर्यंत काम केलं. परंतु पगार नसल्याने तो विवंचनेत होता हे मी बिमार पडल्यानंतर स्पष्ट दिसुन आले पण त्याने तो तणाव आम्हाला जाणवू दिला नाही. मी माझ्या मुलाला गमावले आहे मात्र ही सगळी माझीच मुले आहेत. या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आता आम्ही मागे हटणार नाही.
शासनाने अनुदानाचा वेळीच निर्णय घेतला असता तर माझं लेकरू आम्हाला सोडून गेलं नसतं. आमचं कुटुंब आज उघड्यावर पडले आहे. त्यामुळे स्व. धनंजयची पत्नी राजकन्या हिला नोकरीत सामावून घ्यावे, माझा एक मुलगा कामाला घ्यावा तसेच आज धनंजयप्रमाणेच हे सगळे शिक्षक आहेत. ही माझी मुलेच आहेत. एका मुलाला तर मी गमावलं आहे.निदान इतरांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने वेतनश्रेणी लागू करून शंभर टक्के अनुदान द्यावे अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.
दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा