MB NEWS:ग्रामस्थ नागरिकांनी जिल्ह्यात बालविवाह होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे केले आवाहन

 बालविवाह रोखण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या सक्षम कराव्यात ---जिल्हाधिकारी




ग्रामस्थ नागरिकांनी जिल्ह्यात बालविवाह होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे केले आवाहन


बीड दि. 18 :--बालविवाह प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत प्रत्यक्षात महिला व बालकल्याण विभागाचे बाल संरक्षण अधिकारी, चाइल्ड हेल्पलाइन समन्वयक आणि जिल्हास्तरीय बाल संरक्षण समिती यांच्यामार्फत बालविवाह रोखतांना नागरिक व ग्रामस्थांनी मदत करणे गरजेचे असून त्यांनी पुढे येऊन बालविवाह होऊ नये यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, बालविवाह रोखण्यासाठी गेलेले अधिकारी व समन्वयक यांच्यावर दबाव आणण्याची व सहकार्य न करण्याची भूमिका घेणाऱ्या ग्रामस्थ नागरिकांवर गुन्हे दाखल केले जावे. तसेच  गाव पातळीवर असलेल्या ग्राम बाल संरक्षण समित्या सक्षम करून त्यांच्या वेळोवेळी बैठका होतील या दृष्टीने कार्यवाही केली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 

अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह मोठ्या प्रमाणात लावले जात असल्याचे दिसून आले आहे त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ -मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती सभागृहात बालविवाह प्रतिबंध कायदा अंतर्गत जिल्हा टास्क फोर्सची  बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्यायाधिश सिध्दार्थ गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत जिल्ह्यातील बालविवाहांचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना वर अंमलबजावणी चालू केली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चाइल्ड लाईन 1098 क्रमांक ची माहिती असलेले फलक लावणेबाबत यापूर्वीच कार्यवाही केली जात असून पंचायत समिती,  पोलीस ठाणे, तहसील कार्यालय या ठिकाणी देखील या माहितीचे फलक लावले जाणार आहेत. प्रत्यक्षात बालविवाह लावणेसाठी सहभागी होत असलेल्या विविध व्यक्तींना रोखण्यासाठी सतर्क केले जात आहे. या साठी गावांमध्ये दवंडी देऊन जागृती करणे. बालविवाह होणारे मंगलकार्यालय व्यवस्थापक, जिल्ह्यातील देवस्थानांच्या विश्वस्त यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. 

एप्रिल 2022 पासून आत्तापर्यंत जिल्ह्यात 132 बालविवाहाच्या घटना घडल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणांमध्ये चाईल्ड लाईन समन्वयक व बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्फत नंतर देखील गृहभेटी देऊन सद्यस्थिती बाबत पाठपुरावा केला जात आहे. मुलींमध्ये याबाबत जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम देखील राबविले जाणार असून चाईल्ड लाईन 1098 क्रमांकाबद्दल माहिती देणे शाळेमध्ये बालविवाह विरोधी शपथ घेणे. मुलींमध्ये थ्रो बॉल खेळास प्रोत्साहन देणे, त्याच्या नियमित क्रीडा स्पर्धा आयोजित करणेबाबत यावेळी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुधीर ढाकणे, शिक्षणाधिकारी,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, नेहरु युवा केंद्र , जिल्हा शल्य चिकित्सक यांचे  प्रतिनिधी, चाइल्ड लाईनचे समन्वयक अतुल कुलकर्णी, बाजीराव ढाकणे, तसेच बाल संरक्षण समितीचे तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे तसेच सोनिया हंगे सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


0000


Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 






-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !